अळुची भाजी खाऊन वाचलो तर…...
अण्णांचे नुकतेच लग्न झाले होते.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्ताने जेवायला बोलावले होते.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती. सर्वांना आपपल्या ताटावर बसायला आमंत्रण दिले होते.जांवयाचा मान म्हणून त्याच्या ताट्पाटा सभोवती रांगोळी घालून त्याची जागा सुशोभीत केली होती.
प्रत्येकाच्या ताटात थोडे मीठ,लिम्बाची फोड,बाजुला चिमुटभर ताज्या खोबरयाची चटणी,ताटाच्या मध्यभागी गरमागरम वाटी भरून भात,त्यावर पिवळे धमक वरण,वरणावर चमचा, चमचा साजुक तूप,वरती कडेला दोनही बाजुला वांग्याचा मसालेदार भात,आणि बटाट्याची भाजी असा थाट होता.ताटाच्या बाहेर लक्ख पितळेच्या वाटीमद्धे तांदळाची खिर,ताकाची वाटी आणि एका मोठया वाटीत घरच्याच बागेतले लोण्यासारखी मऊ शिजलेली अळुची भाजी वाढलेली होती.
ही अळुची भाजी अण्णांच्या सासुबाईची खास डिश होती.”पुंडलीक वरदे हरी विठ्ठल” अशी घोषणा केल्यावर मंडळीनी जेवायला सुरवात केली.
अण्णांना अळुच्या भाजीचा पुर्वी पासून तिट्कारा होता.जे आपल्याला आवडत नाही ते ताटातून पटकन खाऊन टाकायचे ही त्यांची संवय.त्यानुसार ते अळुची वाटी पटकन रिकामी करून टाकीत होते.सासुबाईना खूप आनंद व्हायचा आपल्या जांवयाना आपण केलेले अळु खूपच आवडले म्हणून त्या परत परत त्याना वाटीत अळु वाडायच्या.आणि अण्णा तिची पाठ फिरल्यावर पट्कन अळु फस्त करायचे.असे खूप वेळ झाल्यावर त्यांना कळेना काय करावे की सासुबाईना आता पुरे झाले मला अळु मुळात आवडत नाही आणि तुम्ही मला नका वाढू.हा त्यांना कसा संकेत देऊ?
तेव्हड्यांत काही तरी विषय बोलावा म्हणून एकाने विचारले”काय हो अण्णासाहेब तुम्ही एकूण भावंडे किती?अण्णानी ह्या संधीचा फयदा घेवून ते म्हणाले “तसं म्हटल तर आम्ही पांच भावंडे ह्या अळुवातून वाचलो तर,नाही पेक्शा चार.
प्रश्न करत्याला काय कळले असेल ते कळो पण आण्णांच्या सुबुध सासुबाईला याचा अर्थ कळला नसेल तर नवलच.तिने त्यांना अळु वाडायचे थांबवले.
बोलून चालून ती अण्णांचीच सासुबाई होती म्हणा.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
1 Comment
वंय निघून गेले.
परवां प्रो.देसाईंचा चौरयाहत्तरावा जन्म दिवस.वंय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणारया चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या आठवणीतल्या यादीत फरक असणे स्वाभावीक आहे.
भाऊसाहेब मला म्हणाले “माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतरा.गद्या पेक्शा पद्यात ऐकाला मला बरे वाटेल” असे म्हणून त्यानी मला आपल्या आठवणी सांगीतल्या.त्या मी खलील कवितेत लिहील्या.त्यांना वाचून दाखवल्यवर बरं वाटलं.
ते दिवस निघून गेले
मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.
भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्शमा याचनाचे
ते दिवस निघून गेले
ग्रुहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले
सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले
घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले
राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले
ग्रुहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले
काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले
या यादीतील स्म्रुतीना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचे
नसे कसला खंत
श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
प्रोफेसर देसाई आज जरा खुशीत दिसले.मला म्हनाले “सामंत तुम्हाला मी एक गंमत सांगतो.तुम्ही हे पाहीले आहे की नाही माहीत माही.पण मी तुमच्या काव्याच्या भाषेत सांगतो की ह्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याच्या कवितेत “फन” चे “पन” जास्त आहे बघा.
तुम्ही कदाचीत म्हणाल की मला आज काही विषय नाही म्हणून त्यांच्यावर टिका करतो पण विचार केल्यावर जरा मनोरन्जक वाटते बघा.
त्या फन साठी ते असलेल्या पैशाची चंगळ करतात दिवाळखोरी झाली तरी त्याना हरकत नसते.चंगळ काही झाले तरी सोडणार नाहीत.आहे की नाही गंमत?.त्यांची “एकोनॊमीच” म्हणे तशीच आहे.
जो तो आपला पैसा खर्च करतो.
आपल्या बुजुर्गानी मात्र काट्कसर करा आंथरूण बघून पाय पसरा वगैरे वगैरे धडे दिले.ह्या विषयावर एखादी कविता सुचते का बघा
पुढल्या खेपेला आपण भेटू त्यावेळी वाचून दाखवा.” असे म्हणून ते निघून गेले.जरा गंमत म्हणून मग मी ही कविता लिहीली.
फन
पैसा पाण्या सारखा असतो
जैसा येतो तैसा जातो
शयेन्शहा शहांजहा
ऐश आरामात रहात असे
करातून (ट्याक्स मधून)
पैशाचा ओघ होत असे
मुम्ताजसाठी ताजमहाल
बांधायला त्याला
कसलीच अड्चण नसे
बुजुर्ग सांगतात
काटकसरीचा बांध घालून
पैश्याचा अपव्यय थोपवावा
फन करून मन सूखावते
झरा आटला की पाणी संपते
पैसा घटला की सर्वच संपते.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
प्रो.देसाई एक वल्ली
प्रो.देसाईंचा माझ्या कवितेत वरचेवर संदर्भ येतो.तर हे ग्रुहस्थ कोण असावेत? हे समजण्यासाठी त्यांची ओळख करून देणे आवश्यक आहे असे मला वाटु लागल्याने हा प्रपंच.
भाऊसाहेब म्हणून मी त्यान ओळखतो.हे ग्रुहस्थ मुंबईच्या एका कॊलेज मधे गणिताचे प्रोफ़ेसर होते.त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
मिसेस देसाई आणि प्रो.देसाई यांचे लव्ह म्यारेज होते.ती त्यांची विद्यार्थीनी होती. ते म्हणतात”ती हुशार होतीच पण दिसायला पण सुन्दर होती.एकच तिला व्यंग होते की लहानपणी तिला पोलियो झाल्याने ती एका पायाने लंगडत होती ते पुढे म्हणतात “माझे प्रेम आंधळे होते
उतार वयात त्या दोघानी मुलांकडे रहाण्याचा निर्णय घेतला होता असा निर्णय कां घेतला त्याबाबत मला त्यांनी लेक्चर पण दिले होते.प्रोफेसरच ते म्हणा.ते म्हणाले “हे बघा सामंत खूप लोक आम्हाल उपदेश देत काय तर म्हणे कायमचे रहायला जाऊं नका,ईकड्चे घर(भारतातले) तुम्ही विकू नका,ताट द्यावे पण पाट देऊं नये,सध्या भंरवश्याचे दिवस नाहीत वगैरे वगैरे.
आम्ही सर्वांचे ऐकत होतो आणि आमच्या मनाचेच करणार होतो.पुढे ते सांगू लागले “त्याचं असं आहे सामंत,आम्हाल असे पण लोक भेटले आणि त्यांचे म्हणणे असे की दूरवर विचार केल्यास एकमेकाच्या अड्चणी सांभाळून राहिल्यास मुलांकडे पण दिवस जाऊ शकतात.मुले ईकडे (भारतात) रहात नसल्याने कुणाच्या तरी “दाढीला हात लाऊन कामे करून घ्यावी लागतातच.”
पुढे भाऊसाहेब सांगू लागले ” सामंत ईकडे बघा काम सांगीतले की खूप लोक पैसे देऊन सुद्धा अडवाअडवी करतात.त्यांचीही चूक नव्हती म्हणा,”अहो या वयात मुलांकडे जाऊन राहावे बघा”असा आम्हाला उपदेश देत असत.आता बघा सामंत “ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे”हेच खरं ना? आम्ही सर्व तयारी करून मुलांकडे येऊन रहाण्याचं ठरवलं.ईथे जस जसे अनुभव येऊं लागले तस तसे मी तुम्हाला विषय देऊन कविता लिहा म्हणून सांगत अलोच ना?”
तर असे हे आमचे प्रो.देसाई उर्फ भाऊसाहेब.वेळोवेळी ते मला भेटल्यावर आपले मन माझ्याकडे मोकळे करीत असत.आणि मल एखाद्या विषयावर कविता लिहायला उद्वीप करीत असत एव्हडेच.
श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
अरे संस्कार,संस्कार
“अमेरिकेत प्रथमच येणाऱ्यानी आपले जुने संस्कार न विसरता तसेच ईथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपली सुधारणा करून रहावे.ईकडच्या गोष्टीचे अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच पंचाईत करून घेतो.याची नंतर खंत करणे हे काय बरोबर नाही.”असे एकदा प्रो. देसाई मला भेटताभेटताच म्हणाले.मी त्यान म्हणालो” हे बघा भाऊसाहेब कायदा न मोडता आपल्याला हवे ते करण्यास ईकडे स्वातंत्र आहे.संस्कार म्हटलेत तर “तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा”हेच ईकडचे संस्कार आहेत”कसले संस्कार घेऊन बसलात?”असे मी त्याना म्हणालो.थोडेसे नाराज होवून मला महणाले”सामंत,बहिणाबाईची ती कविता आठवते का? अरे संस्कार संस्कार. तिने कसा तिच्या कवितेत उपदेश केला आहे तसा ह्या विषयावर तुम्ही एक कविता लिहा”
अरे संस्कार संस्कार
अमेरिकेत आल्यावर
हातात पडती डॉलर
करा त्याचा नीट वापर !!१!!
अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!!
अरे संस्कार संस्कार
शिस्त स्वच्छ्ता ईथे पाहून
तिकडे भारतात करा
त्याचे डिट्टो अनुकरण !!३!!
अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
रीत अन रिवाजाला
छोटा कधी म्हणू नये !!४!!
अरे संस्कार संस्कार
घेता कर्ज क्रेडीट कार्डावर
त्याच महिन्या अखेर
टाका फेडून सर्व उदार !!५!!
अरे संस्कार संस्कार
आहे मोठा जादूगार
असे जीवनाचा मंतर
ठेवा त्यावर मदार !!६!!
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
प्रथमच तानुली आज आजा,आजीला सोडून सियरा मौन्टनवर बर्फ़ावरची मौजमजा करायला गेली होती.आजा,आजी तिच्याबरोबर येणार नाहीत म्हणून ती खूप उदास झाली होती.”तुम्हाला थंडीचा त्रास होत असेल तर डबल डबल कपडे का नाही घालत म्हणून मागे लागली होती.प्रेमळपणा हा तानुचा उपजत गूण आहे.तानुच्या गैरहजेरीत रात्री ती स्वपनात आली.स्वपनात तिला पाहून आणि तिचा चौकसपणा पाहून तिच्या आईची बालपणाची आठवण आली.त्यानंतर जे विचार मनात आले ते कवितेच्या रुपाने देत आहे.
आजाचे गुपीत
एक होती तानुली
तिचं वय होत सहा
आणि गम्मत पहा
तिचा एक होत आजा
त्याचे वय होते सहा वर सहा
तानुली आजावर खूप प्रेम करायची
आजा पण तानुली वर खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
तिचे अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि डोळे मिटून गप्प बसायचा
तानुली म्हणायची थ्यान्क्यू आजा
आणि आजा म्हणायचा वेल्कम तानु
कधी कधी तानुली पण आजाला मदत करायची
आजा म्हणायचा थ्यान्क्यु तानु
आणि तानु म्हणायची वेल्कम आजा
आणि आजा डोळे मिटून गप्प बसायचा
एकदा तानुली म्हणाली
आजा तू डोळे का मिटतोस?गप्प का रहातोस?
आजा म्हणाला ते आहे एक गुपीत
मला गुपीत सांगशील का?
असं विचारलं तानुने
ओके तानु असं म्हटलं आजाने
ऐक
एक होती मुलगी
तिचं वय होत सहा
आणि तिचा एक होत डयाडी
त्याचे वय होत तिनावर सहा
ती डयाडीवर खूप प्रेम करायची
तिच्यावर डयाडी खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि उघडया डोळ्याने
तिच्या कडे बघत बसायचा
मग ती खूप खूप हसायची
आणि डयाडी तिला जवळ घ्यायचा
हे ऐकून तानुली हसली
अन
आजाला त्या मुली सारखी दिसली
आजाने तानुलीला जवळ घेतलं
आणि तानुलीला गुपीत कळलं
गुपीत फ़ोडताना आजाला झाली घाई
कारण ती मुलगी होती तानुलीची आई.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
1 Comment
बॊंबेचे मुंबई
तुम्हाला ऐकून नवल वातेल की बॊंबेला जे आता मुंबई म्हणतात त्याला कारण माझाच एक भाऊ आहे.
माझ्या या भावाला सुरवाती पासून राजकारणात दिलचस्पी होती.त्याच्या लाहानपणात कम्युनीस्ट विचारसरणी असणे म्हणजे सुधारक समजत असत.रशिया बद्दल त्याना खूप अभिमान असे.ईतके की रशियात पाऊस पडत असेल तर ईकडचा कम्युनिस्ट छत्री उघडतो असे उपहासाने म्हणत.
आमचा हा भाऊ आमच्या लहानपणी आम्हाला कम्युनीस्ट तत्वदद्यान सांगत असे.आमच्या ते डोक्यावरून जात असे.जस जसे आमचे बंधू वयस्कर होत गेले तस तसे हे तत्वद्न्यान मागे पडत गेले.
आता हे आमचे भाऊ हळू हळू शिवसेनेच्या तत्वद्न्यानात दिलचस्पी घेऊ लागले.असो. परत मूळ मुद्द्याकडे यायचे झाल्यास ह्या आमच्या भावाच्या “आमची मुंबई” हा उचलून धरलेला आणि लोकामधे प्रसीद्ध झालेला विषय कायदेशीरपणे वाद घालून जिकण्याचे डोक्यात शिरले.
किती कष्ट घेतले असतील त्याने? कोर्टात लढण्यासाठी आर्थीक मदत आणि हुशार वकीलांची मदत त्याने शिवसेनेकडून घेतली.हायकोर्ट पर्यंत भांडून ऐतीहासीक दाखले दाखवून केस जिंकली आणि “बॊम्बेचे मुंबई”करण्याचा कायदा करून घेतला.
मुंबई सरकारच्या ग्याझेट मधे ह्या आमच्या भावाचे नांव ठळक अक्शरात लिहीलेले दिसेल.शिवसेनेने पण त्यांचा जाहिर सत्कार केला.ठाऊक आहे का त्याचे नांव मधूकर लक्शुमण सामंत.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
नव वर्ष संकल्प.
( ,प्रतीमा उरी धरूनी मी प्रिती गीत गावे, ह्या चालीवर)
प्रतीभा उरी धरूनी
मी गीत करीत रहावे
आशय विषय विसरूनी
मी काव्य करीत रहावे
उरी गर्भ पोसूनी
असे का त्या माउलीला
कधी कुणाची पर्वा
न्हाऊं घाली स्व आसवानी
प्रेमे दाखवी तुम्हा सर्वांना
अपुल्या बाळाला
काळे,बेरे असो कसेही
तिच त्याची आई
ईतरांच्या स्तुतीसुमनांची
नसे ऐकण्याची तिला घाई
नव वर्षाचा संकल्प असे
स्मरूनी त्या आईला
निसर्ग नियमे जन्म द्यावा
बाळाला वा कवितेला
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments
माझ्या लाड्क्यानो
मी आतां जवळजवळ बरा होत आलो आहे.तुमच्या सर्वांच्या गूडविशीशमुळे लवकर बरा झालो.
मला आठवलेल्या कवितेतून तुमचे धन्यवाद.
तुम्हीच माझे प्येन किलर
माझे भोग मलाच भोगावे लागले
आणि माझ्या वेदना मलाच कळल्या
पण
तुमच्या अंग मेहनतीने
तुमच्या हात मेहनतीने
तुमच्या माझ्यासाठीच्या प्रार्थनेने
तुम्ही केलेल्या अगत्यतेच्या चवकशीने
मी बरा झालो
एक गोष्ठ नक्की आहे
आणि
त्याची मला खात्री पक्की आहे
आलेला हा प्रसंग जणू होता एक थ्रिलर
आणि
तुम्हीच होता माझे प्येन किलर
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
Permalink
No Comments