अमेरिकन फन
प्रोफेसर देसाई आज जरा खुशीत दिसले.मला म्हनाले “सामंत तुम्हाला मी एक गंमत सांगतो.तुम्ही हे पाहीले आहे की नाही माहीत माही.पण मी तुमच्या काव्याच्या भाषेत सांगतो की ह्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याच्या कवितेत “फन” चे “पन” जास्त आहे बघा.
तुम्ही कदाचीत म्हणाल की मला आज काही विषय नाही म्हणून त्यांच्यावर टिका करतो पण विचार केल्यावर जरा मनोरन्जक वाटते बघा.
त्या फन साठी ते असलेल्या पैशाची चंगळ करतात दिवाळखोरी झाली तरी त्याना हरकत नसते.चंगळ काही झाले तरी सोडणार नाहीत.आहे की नाही गंमत?.त्यांची “एकोनॊमीच” म्हणे तशीच आहे.
जो तो आपला पैसा खर्च करतो.
आपल्या बुजुर्गानी मात्र काट्कसर करा आंथरूण बघून पाय पसरा वगैरे वगैरे धडे दिले.ह्या विषयावर एखादी कविता सुचते का बघा
पुढल्या खेपेला आपण भेटू त्यावेळी वाचून दाखवा.” असे म्हणून ते निघून गेले.जरा गंमत म्हणून मग मी ही कविता लिहीली.
फन
पैसा पाण्या सारखा असतो
जैसा येतो तैसा जातो
शयेन्शहा शहांजहा
ऐश आरामात रहात असे
करातून (ट्याक्स मधून)
पैशाचा ओघ होत असे
मुम्ताजसाठी ताजमहाल
बांधायला त्याला
कसलीच अड्चण नसे
बुजुर्ग सांगतात
काटकसरीचा बांध घालून
पैश्याचा अपव्यय थोपवावा
फन करून मन सूखावते
झरा आटला की पाणी संपते
पैसा घटला की सर्वच संपते.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
