बुश वर ना खूष

February 18, 2007 at 1:45 am (कवितेतून विचार)

कां कुणास ठाऊक, प्रो.देसाई नेहमी प्रमाणे तळ्यावर नव्ह्ते आले.

मी चवकशीसाठी घरी गेलो होतो.मला चहा घेण्यासाठी बसवून TV चालू करीत म्हणाले ” तुमचे कांहिही मत असो सामंत ह्या प्रे.बूश बद्दल माझे मत आता बदलू लागले आहे,त्याला कवितेतून कळवा माझे मत की मी त्याच्या वर नाखूष आहे.

त्यावरून ही कविता सुचली.

मेरी ख्रिस्मस

हे जॊर्ज डब्ल्यू बूश

मी तर आहे तुझ्यावर नाखूष

केलास तूं यवनांनच्या “ब्यागद्यादवर” हल्ला

आता ते सदॆव म्हणू लागले “अल्ला अल्ला”

डब्ल्यू एम डी आणि अऎलिमिनीयम ट्यूब्स

हा सर्व होता तूझा बकवास

तुझ्या वडीलांच्या सूडाचा तूं ठेवलास

सूडबुद्धीचा अट्टाहास

क्लिन्ट्नने जाता जाता

दिले डॉलर्स  ट्रिलीयन

कपाळकरंट्या तुझ्या कारकीरदीत

झाले ते नाईन ईलेवन

तिन ते चार हजार निरपरार्धी

जेथे गेले

त्याला तूं म्हणतोस हेवन

युद्ध करून प्रश्न कधीच नव्हते मिटले

व्हियेटनाम्च्या युध्दावरून तुला

ते कसे नाही पटले?

सोडून दे आता ही धुसफुस

आण तूं त्याठीकाणी पीस

ज्याला तूं म्हणतोस मिडिल ईस्ट

आज आहे जन्म त्याचा

ज्याला म्हणतात ख्रिस्ताचा जिसुस

स्मरून त्या देव दुताला

म्हणू आपण सर्व जगाला

मेरी ख्रिस्मस

                       श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)

                   

Permalink 1 Comment