आईचे रुदन

March 4, 2007 at 4:08 am (आई विषयी)

प्रो.देसाई आज भेटल्यावर मला म्हणाले “सामंत. आज आपण तळ्याच्या काठावर बसण्याऐवजी जरा फेरफटका मारत गप्पा मारुया.” मी म्हटलं”आज काय विशेष विषयावर गप्पा दिसतात”

तसं काही नाही सामंत,फक्त एक गूढ माझ्या मनांत राहून गेलंय.ते असं ईश्वरानें माणसाला आनंदात आणि दु:खात अश्रु ढाळण्याचे काम दिलं आहे.शासत्रद्न्य म्हणतात की ह्या रडण्यानें माणूस आपल्या ह्र्दयावरचा भार हलका करण्याच प्रयत्न करतो.माणूस दु:खात नक्कीच रडतो.खुपच आनंद झाल्यास माणूस डोळ्यात अश्रू आणताना मी पाहिले आहे.आणि ते पण आपवादाने.

पण सामंत. माणसातली  एक व्य्क्ती अशी आहे की आनंदात आणि दु:खात डोळ्यात अश्रू आणून आपल्या “पदरानें “पुसते तुम्ही नक्कीच पाहिली असेल.” भाऊसाहेबांचा ईशारा मला कळला.”ओळखा पाहूं “असे म्हणण्या पूवीच मी समजलो होतो.मला हंसताना पाहून मला ते चटकन म्हणाले “ओळखा पाहूं मला कोणा व्यक्ती बद्दल म्हणायचे आहे?”मी पटकन म्हणालो “अहो, माय माऊली आपली आई”

“तुम्हाला कसं पटकन कळलं सामंत?”त्यावर मी म्हणालो “भाऊसाहेब.पदरानें डोळे पुसणारी आणि कोणच व्यक्ती असूं शकत नाही.” “अगदी बरोबर “प्रोफेसर म्हणाले. “लहानपणी बघा सामंत, मी  विचारत असे माझ्या आईला”आई,मी तुला दु:ख दिलं तरी तूं रडतेस,आणि मी तुला आनंदाची बातमी दिली तरी तूं मला जवळ घेवून पदरानें डोळे पुसतेस.असं का गं करतेस आई?” त्यावर ती फक्त हंसायची.हे काय गुढ आहे ते तुम्ही सामंत कवितेतून सांगा.”

यश आणि अपयश मिळालेले पाहून आई साश्रू असते.त्यावर मला खालील कविता सुचली. मुलगा आईला म्हणतो.

नको रडूं तूं आई

मी तुला दु:ख देणार नाही.

कळत नाही मला

तुझ्या दु:खाचे कारण काही.

पाहिले प्रथ्म तुला रडताना

जेव्हां होई मी भग्यवान

तूं घालीशी जन्मा मला

मी पण रडलो

तुला पाहुनी

माझ्यासाठी कण्हतानां

सुख दु:खाच्या अश्रू मधला

फरक मला कळेना

यशापयशाच्या प्राप्ती

मधला अर्थ जूळेना

काय चुकले माझ्याकडूनी

गोंधळतो मी तुला पाहूनी

तुला डोळे पुसताना

कळले आता विचारांती

आईच्या अंतरी असे

ओहटी अन भरती

जरी होई माझी

प्रगती अथवा अधोगती

नेत्रात तुझ्या सदैव

अश्रू असती

कारुण्याचे अन त्रुप्तीचे

                                         श्रीकृष्ण सामंत. (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Post a Comment

You must be logged in to post a comment.