चाळीशी (मध्यान)
प्रो. देसाईनां आज सत्तर वंय लागलं.त्यांच्या धाकट्या मुलीचा आज चाळीसावा जन्म दोवस होता.संध्याकाळी तिच्या घरी आज पार्टी होती.भाऊसाहेबांचा मुक्काम आज त्यांच्या मुलीकडॆ हलणार होता.मी त्यांना सहाज म्हणून त्यांच्या मुलाच्या घरी भेटायला गेलो होतो.मला ते म्हणाले “सामंत,तुम्ही पण आज मुलीच्या घरी पार्टीला या.आज फिरायला जाण्याऐवजी तिकडेच गप्पा मारुया.पण माझी तुम्हाला एक request आहे.मी म्हणालो “समजले मला.तुम्हाला त्याप्रसंगी एखादी कविता मुलीला वाचून दाखवयाची असणार.” मला म्हणाले “बरोबर समजलेत.पण माझा विषय ऐका.मला माझी चाळीस वर्षाची चार दशके डोळ्यासमोर येतात.आणि जवळपास आपल्या या वयावर सर्वसाधारणपणे सर्वाची दशके ठरावीक चाकोरीतून जातात बघा.आता तुम्हाला आणखीन काय सांगायल नको. या तर खरं एखादी काविता घेवून.” मी त्यांचा निरोप घेतला.
घरी चालत जाई पर्यंत मला चार कवितेच्या ओळी सुचल्या.
त्या अश्या…. मुलांची चाळीशी आली.आपली चाळीशी येवून गेल्यावर बराच काळ लोटला.जुन्या आठवणी प्रकर्शाने जाणवू लागल्यावर अशा कल्पना मनात येतात.
मध्यान
वय तुझे होता चाळीस पाहून
आठवते मज ते मध्यान
पाहता मागे वळून
डोकावते मन चार दशकातून
पहीले दशक गेले अल्लड्तेतून
दूसरे गेले अध्यापनातून
तिसरे दशक निघून गेले
विश्वाच्या रहस्याला उलगडण्यातून
चवथ्या दशका मधून जाईल
तो समय अनुभवण्यातून
नंतर
येवोत अनेक दशके एकामागून
लिहीली जातील पाने ईतिहासाची
भुत:कालाला निश्चीत स्मरून
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
