गेले ते दिवस
गेले ते दिवस
“रांव रे, आपा येतां साईट दी” (थांब रे,आपा येतोय साईडला रहा)
असले उद्दगार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगांव किंवा वेंगुर्ले-बेळगांव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत.
त्याचं असं झालं,आपांना(माझ्या काकाना) धंद्या मधे जास्त दिल्चस्पी होती.आजोबांच्या लक्ष्यांत आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.अण्णा म्हणाले मुंबईवरून मी त्यांच्यासाठी एक नवीन बस (प्यासींजर व्हीएकल) विकत घेतो.त्यावेळी साधारण २०० रुपयाना (मह्णजे आताचे ४० हजार रुपये झाले.अर्थात त्यावेळी गाड्या ईंपोर्ट होत असत म्हणा)विकत घेतली.अण्णाचे लग्न झाले तेव्हां आपा एक वर्ष्याचे होते.आणि त्यांची आई,म्हणजे आमची आजी देवाघरी गेली होती.माझ्या आईनेच त्यांना वाढवले.अण्णांना ते मुलासारखे होते.
ही बस सर्व्हीस आपा चालवीत असत.सुरवातीला ते आठवड्यातून २,३ वेळा मग रोज मग दिवसातून दोन्दा सेर्वीस वाडी ते बेळगांव अशी चालवत असत.त्याशिवाय आणखी बरयाच लोकाच्या अश्या सर्वीसीस होत्या.
पण एक आपांची खासीएयत होती,की नियमीतपणा, सर्वांच्या अगोदर पोहचणे,कुणालाही नाखुष न करणे,आणि हंसत,हंसत सर्वांना खूष करणे.
सफेद लांब बाह्यांचा शर्ट,डोक्यावर काळी टोपी,ती पण अर्धी मागे गेलेली,कोट बरोबर पण कधीच अंगावर नाही,तर खांद्यावर आणि तो पण अर्धा लटकवलेला,तोंडात पानाचा ठेचा,रंगदार पानाचा तांबडा रंग तो पण दांतावर ठाम बसलेला.ओळखीचा माणूस लांबून दिसल्यावर सुमधुर हास्याचा चेहरा माझ्या मेंदुत रुतून बसलेला आहे.
३०,३५ वयावर तारुण्याचे बेदरकारी,मग नवी करकरीत ईंपोरटेड गाडी चालवताना वेगावर लक्ष्य कसे राहिल?.तशात धूळीने माखलेले रस्ते,प्रवाश्याना वेळेवर पोहचवण्याची हमी,त्यामुळे ईतर रस्त्यावरून चालत जाणारे पाद्चारी आणि गाडी चालवणारे,प्रचंड धुळीचा लोट मागे टाकत जाणारया आपांच्या गाडीला पाहून” रांव रे,आपा येतां साईट दी”किंवा आपा पुढे निघून गेलेले पाहून “आपा,गेलो दिसतां?” असे धूरळा उडाल्यामुळे तोंडावर रुमाल धरून ओरडून बोलणारे लोक आजुबाजूला बघून “अहो,ते माझे काका समाजलानां?”असे छाती पुढे करून सांगणारे माझे मोठे भाऊ आणि चुलत भाऊ आम्हाला सांगायचे ते ऐकून आमची पण छाती फूगत असे.
आता तेच आपा वार्धक्याने वाकलेले,क्षीण प्रक्रुतीचे,रसत्यावरून जपून चालताना बघून,वाटते “गेले ते दिवस”
श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
