सुनामी

April 16, 2007 at 12:40 am (कविता)

सुनामीने केलेला हाःहाःकार ऐकून मन स्थब्द झाले. निसर्गाचा कोप कुठल्या थराला जाऊ शकतो हा वास्तववाद पाहून सत्य किती भयंकर असू शकते ह्याचा विचार पण करवत नाही.समुद्राला “समुद्र देवाता”म्हणणे किती हास्यास्पद असू शकते? पण निसर्गापुढे कुणाचे काय चालणार? मग एक विचार नकळत मनःशान्ती देऊन गेला.शंभर वर्षानी असाच हाःहाःकार पहायला मी तरी जीवंत नसणार.ह्या कल्पनेतून ही कविता सुचली.

सुनामी

दिसतोस तू शांत आता
परि विश्वास हरपला माझा
मी त्यातला नाही
असे भासवीतोस मला
मग सुनामी करवे
केलास जो उत्पात
काय म्हणू मी त्याला?

म्हणू कसे मी तिला “सुनामी”
का म्हणू नये तिला “कूनामी”
किनारी तुझ्या मी येतसे
अंतरीच्या ओढीने
नतमस्तक होवूनी
पुजीतसे मी तुला भावूकतेने

तुझ्या परि विशाल
अन तुझ्या परि शांत
पुन्हाः कसे म्हणू मी तुला?
मृत जीवांच्या रुदनाने
लाज वाटे तुझी मला

शंभर वर्षानी पाठविशी सुनामीला
करण्या असाच हाःहाःकार
आहे असाच तुझा इतिहास
सांगशी तरी कसे होवूनी बेदरकार

करू नको हा गुन्हा
पाठऊनी सुनामीला पुन्हा
करशील का? इतिहासाची पुनरावृत्ति
नसेन मी जीवंत खचीत
पहाण्या तिची दुशकृति

            श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोर्नीया) 
 

Permalink No Comments