नमस्कार मंडळी ,
आपले विचार प्रभावी करता यावे असतील तर कवितेसारखे उत्तम माध्यम नसावे असे मला वाटतं.
तेव्हां ह्या कवितेच्या दोन ओळीने मी सुरवात करतो.
“जेथे आजीआजोबा वसती
तेथे नातवन्डे आनंदे बागडती”
आजीआजोबा आणि नातवंड जेव्हा एकेठिकाणी रहातात तेव्हां त्यातली मजा त्याना अनुभावानेच समजते.मी माझं बालपण आठवूनच म्हणतोय
आता, त्यात काही फायदे आणि तोटे आहेत पण फायदे पाहीलेत तर
पर्वता एव्हडे आहेत [...]
मे 29, 2007 – 12:39 सकाळी
“तुमको भेजा नही” वरून वाद
असंच एकदा मी आमच्या धाके कॉलनीच्या बिल्डींग मधून आमच्या फ्लॅट्च्या बाल्कनीतून
पाहिलं की खाली खूप गर्दी जमली होती आणि एका पोस्ट्मन बरोबर एक अनोळखी माणूस
हुज्जत घालत होता.मुंबईला अशा प्रसंगी गर्दी जमायला वेळ लागत नाही.
सहज कुतुहल म्हणून मी पण खाली उतरून काय चाललं आहे म्हणून आणखीन
एक बघ्याची भर असे समजून ऐकायला गेलो.
“भेजा” या [...]
अकरावी तानुली
तानुली ,गुगुली,मुमुली
गोल चेहऱ्याची
सुन्दर दिसणारी बाहूली
उपजतच समजूतदार असलेली
लहान थोरास आणि
मित्र मंडळीना आवडलेली
झाडे ,फळे आणि फुले
पक्षी आणि फुलपाखरे
पाहून रमून गेलेली
अकरावे संपून
बाराव्या वर्ष्यात गेलेली
दीर्घायुषी झालेली
आजा आजीने लाडावलेली
तानुली
आजच आज्याच्या स्वपनात आली
आणि ही कविता जन्मली.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
प्रत्येक आईला आपल्या मुलाची उन्नत्ती पाहून असंच वाटत असणार.
ते कसं आणि त्या मुलाला आईला काय सांगायचं आहे ते खालील कवितेत लिहीले आहे.
उन्नत्ती
माझी उन्नत्ती पाहून
आई, न्याहळले मी
तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाला
अन
सप्तरंगाचे धनूष्य
दिसले मला
रंग होता
त्रुप्तीचा जांभळा
कुतुहलाचा निळसर
कौतुकाचा निळा
कर्तव्य पुर्तीचा हिरवा
देवाच्या कृतज्ञतेचा पिवळा
शाबास्कीचा संत्र्या सम
अन
अभिमानाचा लाल
आई
स्विकार माझ्या
साष्टांग नमस्काराला
देतो वचन मी तुला
नाही डगमगणार मी
पाहूनी संकटाला
नाही उन्मत्त होणार मी
पाहूनी उत्कर्षाला
राहिन नतमस्तक मी
पाहूनी [...]
प्रो.देसायांना कळून चुकले होते की आयुष्यात शांती मिळवीण्यासाठी कुठेतरी तडजोड करावी लागते.
कर्तव्य आणि भावना या मधला फरक वेळोवेळी समजून घ्यावा लागतो.आपले आणि परके या मधला
फरक वेळेवर लक्षात आला नाही तर मनःस्ताप होवू शकतो.स्वतःच्या मनाची
समजूत करून घेताना देसायाना काय वाटले ते खालील कवितेत सांगितले आहे.
कवितेचे शिर्षक आहे
तडजोड
रे मना समज लवकरी
बघसी अंतरी
करी तड्जोड सत्वरी
मनःस्तापाशी,मानहानीशी,अन्यायाशी
रे मना नको करू [...]
आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती.
दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा.
पण आज काही विषेश त्याना सांगायचं होतं असे त्यांच्या चेहऱ्यावरून मी अनमान काढलं.
“काय भाऊसाहेब आज विषेश काय?” असे मी म्हटल्यावर ते जरा खूसखूसून हसले.
मला त्याना काही तरी सांगायचं होतं.मला ते म्हणाले”सामंत , काय हो [...]
साबणाच्या पत्राला उत्तर
(सचीन ठाकरे यानी लिहीलेल्या पत्रास उत्तर)
प्रिय सिन्थॉल दादास,
निरमाताईचा,
सप्रेम नमस्कार वि.वि.
तुझे पत्र मिळाले वाचून आनंद झाला.
भारतात परत आल्यावर त्याचे नाव बदलल्याचे पाहून “लाईफ बॉयला” वाईट वाटणे सहाजीक आहे.परंतु त्याने “फेअरग्लोला ” मधे घेण्याचे कारण नव्हते.डॉ.डेटॉलचे आभार मानणे आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.
यावरून एक सिद्ध होते की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो.
बाकी तूं लिहीलेल्या सर्व [...]