सिन्थॉलला निरमाकडून उत्तर

साबणाच्या पत्राला उत्तर
(सचीन ठाकरे यानी लिहीलेल्या पत्रास उत्तर)

प्रिय सिन्थॉल दादास,
निरमाताईचा,
सप्रेम नमस्कार वि.वि.
तुझे पत्र मिळाले वाचून आनंद झाला.
भारतात परत आल्यावर त्याचे नाव बदलल्याचे पाहून “लाईफ बॉयला” वाईट वाटणे सहाजीक आहे.परंतु त्याने “फेअरग्लोला ” मधे घेण्याचे कारण नव्हते.डॉ.डेटॉलचे आभार मानणे आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.
यावरून एक सिद्ध होते की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो.

बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरे वाटले.”सर्फ”मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी.

मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या “साबण जमातीची” दुसरी पिढी आंगाखांदयाने  खूपच रोडावत चालली आहे.हे काही बऱ्याचे लक्षण नाही.तसेच बुळबुळीतपणा आणि फेस हे गूण पण लोपत चालले आहेत.याबद्दल मी कुणाला दोष देऊं? महागाईला की सरकारच्या “ट्याक्स पॉलीसीला? असो.

“सिंथॉल दादा”, तुला ऐकून नवल वाटेल की आज जो, तो उठ बस अमेरिकेला जात आहे.आणि येताना ते त्यांची अमेरिकेतली मित्र मंडळीना पण ईकडे घेऊन येत आहेत.परवा सहज “सर्फ”मावशीला भेटायला म्हणून गेलो होतो.तिचा मुलगा “मोती” याने येताना त्याच्या मित्र मैत्रीणीना आणले आहे.माझी त्याने ओळख करून दिली.कोण तर म्हणे “डोव्ह”,’शिल्ड” “सेफगार्ड”आणि दादा, तुला मी सांगीतलं तर आच्छर्य वाटेल,अरे, ती  “आयव्हरी”नावाची मुलगी इतकी नटली थटली होती की माझी जेव्हां मावशीने तिची ओळख करून दिली “ही आमची “निरमा”तर ती माझ्याकडे बघायला पण तयार नाही.

आणि त्या “आयव्हरीने” काय पर्फ्युम लावलं होतं,अरे, सगळ्या घरात सुवास दरवळला होता.माझी खात्री आहे की ही जर आपल्या “शिकेकाई” “संतूर” “रेक्सोना” वगैऱ्याना भेटली तर नक्कीच ती सर्व तिच्या समोर त्यांची स्वत:ची नाकं मुरडल्याशिवाय रहाणार नाहीत.

आणखीन तुला एक मी पाहिली ती गम्मत सांगते अरे, “लिक्वीड सोप” म्हणून एक जरा लठ्ठशी बाई मावशी जवळ बसली होती.ती म्हणे खूपच अमेरिकेत पॉप्युलर झाली आहे.हल्ली तिकडे आपल्या सारख्याना चोळत बसत नाहीत तर हीलाच डोक्यावर “स्क्वीझ”करतात,आणि गम्मत म्हणजे डोळे चमचमत नाहीत डोळ्यातून पाणी पण येत नाही.लहान मुलांत ही “बेबी म्याजीक बाई”खूपच पॉप्युलर आहे.तिनेच मला सांगितलं की “हवाईन जिंजर रूट कंडीशनार” नावाची तिची दुसरी एक मैत्रीण आहे तिला पण काही इकडची “टिन एजर” वापरतात,हे तुला माहित नसेल. ह्या अमेरिकन लोकांवर देवाने “ओरीजन्यालीटीसाठी “वरदहस्त ठेवलेला आहे हे मात्र सत्य आहे.

आणिक काय लिहूं? सध्या एव्हडं पुरे.
तुझी
निरमाताई.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

टिप्पणी नोंदवा

Your email is never published nor shared. Required fields are marked *

*
*