Monthly Archives: जुलै 2007

उद्वेग विसरून कसं चालेल?

उद्वेग विसरून कसं चालेल?
आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात
मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?
कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?
अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश [...]

अळकुळी तनु

सकाळी तनुली माझ्या स्वपनात आली.मला म्हणाली ” आजा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे”. तिच्या आईशी झालेला संवाद असा होता.
weekend दिवशी
चिमुकली तनुली
आईला म्हणाली
weekdays दिवशी
असता मी सकाळी उठलेली
पाहुन तुला घरात नसलेली
होई मी किंचीत अळकुळी
मग
घेई मज आज्जी जवळी
पाहुनी माझ्या डोळी
म्हणे मला ती
“नको होवू तू अळकुळी
तुजसम तुझी आई असता
अशीच घेही मी पण
जवळी तिला त्यावेळी
पण जवळी असे मी
तिच्या वेळी अवेळी”
“पक्षिण [...]

माझं आजोळ आजगांव

माझं आजोळ आजगांव
माझं आजोळ आजगांवचं.वेंगुर्ल्यापासून आजगांव साधारण दहा मैलांच्या आंत.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी आजोळी जात असू.पहाटे उठून आई वाटेत खाण्यासाठी डब्बा द्यायची.उकडलेल्या बटाट्याची भाजी,पुऱ्या,लसणीची खोबरं घालून चटणी,थोडी वेलची पिवळी केळी.आणि फिर्कीच्या तांब्यात विहीरीचे थंडगार पाणी,असा थाट असायचा.
पहाटे पहाटे निघताना हवा थंड असायची.त्यामुळे सुरवातीचा प्रवास झपाट्याने व्हायचा.
वेंगुर्ल्याच्या बाजारातून वाट काढत निघताना जरा अड्चण यायची,कारण इतक्या पहाटे [...]

लफंगा भूंगा

रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर गुणगुण
 करणाऱ्या भुंग्याला पाहून मनात आलं की एखाद्या लफंग्याला
(पी यु एन “पन” ईज ए कोईन्सीडन्स बरं का!)
जसं ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाण्याची मौज वाटते तसंच ह्या भुंग्याला
 पण एका फूलावरून दुसऱ्या फूलावर जाऊन गुंजन करावं असं वाटत असणार
त्या विचारातून आलेली
 कल्पना कवितेच्या माध्यमातून.
लफंगा भूंगा
रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर
जाई हा बिचारा भूंगा
गुंजन [...]

“हपापाचो माल गपापा”

“हपापाचो माल गपापा”
ते दूसऱ्या महायुद्धाचे दिवस होते.आपला देशपण त्याने पोळून गेला होता.खायला अन्न
 नाही तांदूळ, गहू,साखर, केरोसीन सर्व आवश्यक वस्तू रेशनींगवर मिळायच्या आणि
 जादा हव्या असल्यास  काळ्या बाजारात मिळत.त्याला “ब्ल्याक” मधे म्हणण्याचा
जास्त प्रघात होता.
वेगुर्ला मार्केटच्या समोर एक किराण्या मालाचं दुकान होतं.वखार वजा किराण्या
मालाचं ते दुकान होतं.त्या दुकानाच्या मालकाचं नाव होतं दादा कुळकर.आपण
त्याना दादा म्हणुया.
दादा एक ठुसक्या उंचीची, [...]

माटुंग्याचे वामनकाका

माटुंग्याचे वामनकाका
 ते आमच्या वडीलांचे काका, आम्ही त्याना “माटुंग्याचे आजोबा” म्हणायचो.नावाप्रमाणे वामनकाका
 उंचीने “वामनमुर्ती”च होते.शिक्षण एव्हडे तेव्हडेच त्यामुळे उपजीवीकेचे सोपे साधन म्हणजे
 ”आचारी” होणे.संध्याकाळी पाच वाजल्यावर खांद्यावर सफेत झोळी जिच्यात किलो दोन
 किलोच्या दोन चार भाज्या कोथिंबीर,मिरची,नारळ,वगैरे मसाला पुरेल एव्हड्या आकाराची
 असायची.सुरवातीला होता तो तिचा सफेद रंग आता सुरण,अळू,आणि असल्याच काही
 भाज्यांमुळे त्या झोळीचे सफेदपण जाऊन रंगी बेरंगीपणा आला होता.पायात चांबड्याची
पट्या [...]

रावसर गेले

राव गेले
श्रद्धांजली
“रावसर”म्हणून प्रसीद्ध असलेला हा माणूस खरच मनाने आणि ह्र्दयाने पण “राव” होता.
माझ्या चुलत बहिणीशी लग्न झाल्यावर माझे ते “रावभाऊजी”झाले.खूप पैसे असलेल्या
आपण “मालदार” म्हणतो.रावभाऊजी मालदार “ओळखीचे” होते.
 पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयात ते पि.टी.चे शिक्षक होते.बरेचसे उंच,तब्यतीने
 उत्तम,कांतीने निमगोरे,सरल नासीका असे हे उमदार व्यक्तीमत्वाचे रावसर जेव्हां
पार्ल्याच्या रस्त्यावरून चालत जात तेव्हां
“रावसर,रावसर,रावसर”असे प्रतितध्वनी जणू होत आहे, असे आजू बाजूने येणारे
 आवाज [...]

दूर तूं परी जवळी तुझ्या मी

सेल फोनचा अलिकडे इतका वापर होत आहे की आपल्याला हवं असलेल माणूस केव्हांही आणि कुठेही
 आपल्या संपर्कात आणू शकतो.
त्यामुळे कुठलीही व्यक्ती दूर जरी असली तरी ती ह्या सेलफोनमुळे जवळच असते.
हे लक्शात आल्यावर “माझा होशील का” ह्या गाण्यातल्या दोन ओळी चटकन मनात आल्या.
“दूर तू परी, जवळी तुझ्या मी नाम गुंफीते, तुझीया नामी”आणि त्यानंतर
 ”दूर तू परी, जवळी तुझ्या [...]

“आई असं मी पून्हा करणार नाही”

“आई मी असं पुन्हा करणार नाही.“देसायांचा नातू तसा उनाड होता.तसा तो वयाने लहान होता.त्यांच्या घरावर एका खोबणीत एका पक्षाने घरटं बांधलं होतं.गम्मत म्हणून नातवाने एक्दा खेळता खेळता तो हातातला चेंडू त्या घरट्यावर फेकला,आणि नंतर झाले ते रामायण.“लहान आहे तो,ह्या वयात हातून घडलेल्या गोष्टी कळत नाहीत बाल मनाला.आपले ते खरं करतात ही मूलं.” वैतागून पण नातवाची [...]