Monthly Archives: ऑगस्ट 2007

तनुलिचं गद्य,पद्य

तनुलीचे गद्य,पद्य
तनुलीचे आजीआजोबा जेव्हा परत जायला निघाले त्यावेळी तनुली आपल्या आईबाबाबरोबर त्यांना पोहचवायला गेली होती.त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की हे आता परत येणार नाहीत,त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंतर ती मनांत म्हणाली
का असे गेलात तुम्ही
ना बोलता ना सांगता
सहवासाच्या संगतीची
हिच का हो वाच्यता?
नंतर घरी अल्यावर आईबाबांचे बोलणे तिने ऐकले.
आईबाबा आले घरी
म्हणती एकमेकामधे
ठेऊया हिला उद्या डेकेअरमधे
तनुली रात्री झोपली [...]

पुन्हा तिच सांज अन तिच पीडा

पुन्हा तिच सांज तिच पीडा
अन तोच एकाकीपणा
जणू  तुझी याद
तेव्हांच येऊन
मला समजावत असणार
पुन्हा तुझी अंधूक कल्पना
जवळीक करीत येणार
पुन्हा हरवून गेलेली ती वेळ
क्षणभर परतून येणार
मन क्षणभर सुखावणार
जणू हा सौदाच आहे
पुन्हा तिच सांज तिच पीडा
अन तोच एकाकीपणा
कुणाष्टाऊक तुझ्याशी भेट
होईल की नाही
अधुरी राहीलेली ती चर्चा
होईल की नाही
माझी तुझी वाट
आता विलग झाली आहे
पुन्हा तिच सांज तिच पीडा
अन तोच एकाकीपणा
पुन्हा तुझ्या [...]

कुठं तरी वाचलं म्हणून

जे आपली काळ्जी घेतात त्यानांच आपण रडवतो.आपण रडतो त्यांच्यासाठी जे आपली काळजीपण घेत नाहीत.आणिआपण त्यांची काळजी घेतो जे आपल्य़ासाठी कधीच रडत नाहीत.
जीवन हे असेच आहे विचीत्र आहे पण सत्य आहे.एकदा का आपल्या लक्षात आलं तर मग बदलाव कधीही आणला तरी त्याला उशीर होत नाही.
सर्व हरवून बसलो तरी काही तरी मिळून जातं
आणि सर्व मिळालं तरी काही [...]

भास्करभाऊ

भास्करभाऊ
शिवराम सखाराम प्रभू (आजगांवकर) ऊर्फ भाऊ आजगांवकर हे माझ्या आईचे लांबचे भाऊ.आईच्या माहेरी त्यांच्या राहात्या घराच्या आजूबाजूला पण बरीच घरे होती त्यातपण अनेक आजगांवकर राहात.त्यापैकी हे एक आणि त्यांचेच नातेवाईक समजले जाते एव्हडेच.
आईच्या वडिलानी तिला त्यावेळी(१९३०) तिन हजार रुपये वेंगुर्ल्यात घर घेण्यासाठी दिले होते त्यात भर म्हणून आपले हजार रुपये घालून एका सोनाराचे “गहाणवट”घर घेऊन [...]

पसंत अपनी अपनी, ख्याल अपना अपना

“आई चांगली की मावशी? ” असं कुणी विचारलं तर आपण काय आणि कसं उत्तर देऊ? त्यातलाच प्रकार एका कवयत्रीच्या “माझी अमेरिका वारी दुसऱ्यांदा” “माझे अमेरिकेबद्दलचे विचार”  ह्या कवितेतून मला वाचायला मिळाला.
त्या कवितेचा आशय जरी मी ईथे थोडक्यांत सांगितला तरी त्याच्या विरोधाभासाठी मी लिहीलेली खालील कविता लिहीण्यास मी कसा उद्युक्त झालो हे माझी कविता वाचल्यावर कळून [...]