पसंत अपनी अपनी, ख्याल अपना अपना

August 7, 2007 at 3:02 am (कवितेतून विचार)

“आई चांगली की मावशी? ” असं कुणी विचारलं तर आपण काय आणि कसं उत्तर देऊ? त्यातलाच प्रकार एका कवयत्रीच्या “माझी अमेरिका वारी दुसऱ्यांदा” “माझे अमेरिकेबद्दलचे विचार”  ह्या कवितेतून मला वाचायला मिळाला.

त्या कवितेचा आशय जरी मी ईथे थोडक्यांत सांगितला तरी त्याच्या विरोधाभासाठी मी लिहीलेली खालील कविता लिहीण्यास मी कसा उद्युक्त झालो हे माझी कविता वाचल्यावर कळून येईल.
अमेरिकेत आपण दोनदा,दोनदा येतो,ईकडच्या मौज मजेचा मोह लागल्यावर आपण रहातो,काही ईकडच्या गोष्टी जरी आपल्याला आवडल्या नाहीत तरी आपण रहातो.कोलंबसाच्या देशात रहावं की “ऋषीमुनींच्या देशांत” परत जावं (उद्गारचिन्हातली उक्ति माझी) असा कवियत्रीला संभ्रम झाल्याने ईकडे रहावं की परत जावं असं वाटू लागल्याने दोनही देशातील बऱ्या वाईट गोष्टीची सहाजिकच तुलना तिच्या मनात आली.आणि शेवटी ” गर्दी,खड्डे अन प्रदुषण असलं तरी माझं पुणंच बरं” आणि तिकडेच रहाणं बरं असं तिला वाटतं.
हाच विचार अमेरिकेत रहाणं बरं असा येऊन एखाद्याला वाटलं तर तो काव्यात क़सं लिहील, हे लक्षात येऊन लिहीण्याचा हा प्रपंच.

“पसंत अपनी अपनी,ख्याल अपना अपना”

ऋषीमुनींचा देश सोडून
कोलंबसच्या देशांत येणारे
दोन दोनदा येऊन
कां बरं जातात मोहून?

काय हवं आहे हे कळायला
जास्त लागत नाही वेळ
“स्वातंत्र्याला” मोहीत होवून
होतो थोडा खेळ

तिकडे पण झाली आहे सवंय
स्वतः पुरतं पहाण्याची
समोर अन्याय होत असता
राहतात बरेच  गुपचुप
आणि वर म्हणतात “आपडे सूं?”

ईकडे तिकडे चोहिकडे
अथवा
वाटतं जावं अमंळ घराकडे
होतं शक्य हे सहज
कमाईच्या आधारे

ऐकलं जातं अलिकडे
तिथेच राहून काही
लक्ष ठेवतात पछ्चिमेकडे

कूल,क्रॅप अन डुड
शब्द असतात तिथे मुलांच्या तोंडात
दुसऱ्या पिढीचा विचार आला पटकन
पण
आधीच झाली आहे ती अमेरिकन

पाहून गर्दी,ख्ड्डे अन प्रदुषण
मच्छर, माशा अन थुंकणं पण
असो मुंबई वा पुणं
परवडलं अमेरिकेतच रहाणं

          श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Permalink 1 Comment