पसंत अपनी अपनी, ख्याल अपना अपना
“आई चांगली की मावशी? ” असं कुणी विचारलं तर आपण काय आणि कसं उत्तर देऊ? त्यातलाच प्रकार एका कवयत्रीच्या “माझी अमेरिका वारी दुसऱ्यांदा” “माझे अमेरिकेबद्दलचे विचार” ह्या कवितेतून मला वाचायला मिळाला.
त्या कवितेचा आशय जरी मी ईथे थोडक्यांत सांगितला तरी त्याच्या विरोधाभासाठी मी लिहीलेली खालील कविता लिहीण्यास मी कसा उद्युक्त झालो हे माझी कविता वाचल्यावर कळून येईल.
अमेरिकेत आपण दोनदा,दोनदा येतो,ईकडच्या मौज मजेचा मोह लागल्यावर आपण रहातो,काही ईकडच्या गोष्टी जरी आपल्याला आवडल्या नाहीत तरी आपण रहातो.कोलंबसाच्या देशात रहावं की “ऋषीमुनींच्या देशांत” परत जावं (उद्गारचिन्हातली उक्ति माझी) असा कवियत्रीला संभ्रम झाल्याने ईकडे रहावं की परत जावं असं वाटू लागल्याने दोनही देशातील बऱ्या वाईट गोष्टीची सहाजिकच तुलना तिच्या मनात आली.आणि शेवटी ” गर्दी,खड्डे अन प्रदुषण असलं तरी माझं पुणंच बरं” आणि तिकडेच रहाणं बरं असं तिला वाटतं.
हाच विचार अमेरिकेत रहाणं बरं असा येऊन एखाद्याला वाटलं तर तो काव्यात क़सं लिहील, हे लक्षात येऊन लिहीण्याचा हा प्रपंच.
“पसंत अपनी अपनी,ख्याल अपना अपना”
ऋषीमुनींचा देश सोडून
कोलंबसच्या देशांत येणारे
दोन दोनदा येऊन
कां बरं जातात मोहून?
काय हवं आहे हे कळायला
जास्त लागत नाही वेळ
“स्वातंत्र्याला” मोहीत होवून
होतो थोडा खेळ
तिकडे पण झाली आहे सवंय
स्वतः पुरतं पहाण्याची
समोर अन्याय होत असता
राहतात बरेच गुपचुप
आणि वर म्हणतात “आपडे सूं?”
ईकडे तिकडे चोहिकडे
अथवा
वाटतं जावं अमंळ घराकडे
होतं शक्य हे सहज
कमाईच्या आधारे
ऐकलं जातं अलिकडे
तिथेच राहून काही
लक्ष ठेवतात पछ्चिमेकडे
कूल,क्रॅप अन डुड
शब्द असतात तिथे मुलांच्या तोंडात
दुसऱ्या पिढीचा विचार आला पटकन
पण
आधीच झाली आहे ती अमेरिकन
पाहून गर्दी,ख्ड्डे अन प्रदुषण
मच्छर, माशा अन थुंकणं पण
असो मुंबई वा पुणं
परवडलं अमेरिकेतच रहाणं
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

nishabidkar said,
August 7, 2007 at 7:28 am
सर्वात प्रथम…..”ताई” बद्दल….. :)) कसं आहे……late twenties मध्ये गेले आहे मी आता…online किवा एरवीसुध्दा माझ्यापेक्षा लहान मंडळी खूप असतात…..आणि……त्या लोकांनी ताई वगैरे म्हटला की मला आपण खरच खूप मोठे (वयाने) झाल्यासारखे वाटतं…..गम्मत आहे…..१८ ते २३-२४ हे वय़ सारखं हवंस वाटतं…….१४-१५ ची होते….तेव्हा लोक लहान समजतात म्हणून वाईट वाटायचं…..वाटायचं…पटकन मोठं व्हावं………आता मोठं समजतात…तेव्हा वाईट वाटतंय……
तुमच्या प्रोफ़ाईल वर जन्मतारिख नव्हती..so मला अंदाज आला नाही… असो…..
कविता छान……
अमेरिका का परत भारत……हा न संपणारा विषय आहे…… आपापली निवड जोपर्यंत स्वत:ला योग्य वाटतेय…..तो पर्यंत काहीच प्रश्न नाही…तुम्ही कदाचित अमेरिका निवडलंत…..
तुमचा बाकी ब्लॉग ओझरता पाहिला……बरंच काही वाचनीय मिळेल असं वाटलं….परत एक निवांत भेट नक्की देईन.
तसे माझे कवितालेखन नवे नवेच आहे…..अगदीच नीट मोजायचं तर पाचवी कविता….. गेल्या सहा महिन्यातला नवीन छंद…… :)))
मला नेहमीच वाटायचं आपण बरं लिहू शकू कदाचित……एका स्नेह्याचा आग्रहामुळे…..आग्रह नाही खरं तर….पण….”कविता लिहिणं काही फ़ार अवघड नसतं…..चांगला शब्दसंग्रह….आणि यमक जुळवण्याची थोडीशी कला….या जोरावर ’ठीक ठिक’ कविता लिहिणं शक्य आहे” हे त्याने मला पटवून दिलं….मग मी गम्मत म्हणून एकदा करून बघितलं…भट्टी बरी जमली…मग…त्यानंतर मी येणा-या जाणा-या सगळ्यांना कविता वाचायला लावून हैराण करतेय!!! :)))
अजून काल्पनिक गोष्टी आणि भावना…..या वर काही लिहिणं try केलं नाहिये…..पण ते ही करेन कदाचित लवकरच!
पण तुमच्या comment वाचून खरंच बरं वाटलं…..मी लिहीलेलं दुस-या कोणाला वाचनीय वाटतंय…हे मला अजून खूप नवीन आहे…..
- निशा.