जे आपली काळ्जी घेतात त्यानांच आपण रडवतो.आपण रडतो त्यांच्यासाठी जे आपली काळजीपण घेत नाहीत.आणिआपण त्यांची काळजी घेतो जे आपल्य़ासाठी कधीच रडत नाहीत.
जीवन हे असेच आहे विचीत्र आहे पण सत्य आहे.एकदा का आपल्या लक्षात आलं तर मग बदलाव कधीही आणला तरी त्याला उशीर होत नाही.
सर्व हरवून बसलो तरी काही तरी मिळून जातं
आणि सर्व मिळालं तरी काही तरी हरवलं जातं.
हे सर्व आपल्या जीवनाकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनावर आहे.एक तर खंत करावा नाहीतर आनंद मानावा.
जीवनाला जे द्यावे ते जीवन परत देते
कुणाचा मत्सर करू नये जो मत्सर
आपल्याकडून जातो तो परत आपल्याकडे येतो.
त्याऐवजी प्रेम करा.ते तुमच्याकडे निश्चीत परत येईल.
जीवनात अशा लोकावर विश्वास ठेऊ नका
कि ज्यांचे विचार वेळोवेळी बदलत असतात
उलटत्यांच्यावर विश्वास ठेवा की ज्यांचे विचार
वेळोवेळी तसेच कायम असतात.
कुणिही तुम्हाला समजून घेत नाही ही काही तुमच्या जीवनातली अडचणिची बाब नाही
ऊलट तुम्ही तुम्हालाच समजावून घेतलेले नाही ही अडचणिची बाब आहे.
वाळूत लिहूं नका. लाट ते सर्व पुसून टाकील
नभात लिहू नका. वारा ते सर्व उडवून टाकील
त्यांच्या हृदयात लिहा.जे तुमच्या संपर्कात आहेत.कारण लिहीलेले कायमचे तिथेच असणार.
तुमच्या जीवनात कुणालाही प्रथमता देऊ नका.कदाचित तुम्ही त्यांचे पर्याय असाल.
एकमेकाचे संबंध समप्रमाणात असले की चांगले असतात.लक्षात असू द्या की तुम्ही जन्मता जगण्यासाठी,जन्मामूळे जगत नाही जीवन नेईल तिथे तुम्ही जाऊ नका तुम्ही जाल तिथे जीवनाला न्या.
कुणाकडे स्वतःहून स्वतःला प्रदर्शीत करू नका.
कारण ज्याला तुम्ही आवडता त्याला त्याची जरूरी नसते आणि जो तुमचा द्वेष करतो त्याचा त्यावर विश्वास नसतो.
तीर धनुष्यावर मागे खेचल्यावरच पुढे फेकता येतो.
गोळी बंदुकीचा चाप मागे खेचल्याव्ररच पुढे जाते.
तद्वतच
जीवनात माघार घ्यावी लागली तरी विचलीत होऊ नका पुढे जाण्यासाठीच ती माघार असते
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
