सांगा कसं जगायचं?
सांगा कसं जगायचं?
त्याचं असं झालं,मी माझ्या नातीला निरोपाचे एक छोटेसे पत्र लिहीत होतो.ती आज UCirvine LA ला पुढील शिक्षणासाठी रवाना झाली.तिला send-off द्यायला मी airport वर पण गेलो नाही.
माझा नातू सुद्धा गेल्या आठवड्यात असाच तिच्या सारखाच UCSC Santacruz ला पुढील शिक्षणासाठी रवाना झाला.त्यालाही मी निरोपाचं असंच एक छोटसं पत्रं लिहीलं.त्याचं ठिकाण जवळच असल्याने त्याला घरूनच send-off देता आला.
आता एकदा गेल्यानंतर ही मुलं सुरवातीला तीनएक महिने तरी आम्हाला दिसणार नाहीत.
सहजच सुचलं म्हणून मी माझ्या काळातल्या, आणि आमच्या मुलांच्या वेळच्या, भारतातल्या शिक्षण पद्धतीचा विचार मनांत येऊन, तुलना करायला उद्युक्त झालो.
आमची कॉलेजं अगदी जवळच,रोज train ने किंवा bus ने जाऊन परत रात्री घरी.रात्री घरी आल्यावर, आईने केलेली पोह्याची किंवा साबुदाण्याची खिचडी, बरोबर गरम गरम कपभर चहा घेऊन, थोड्या ईकड्च्या तिकडच्या गप्पा करीत हवा तेव्हडा अभ्यास करून वाटल्यास एखादी tv वरची serial बघून रात्री आईच्या हातचं सुग्रास जेवण जेऊन, झोपी गेल्यावर परत सकाळी उठून रोजचाच तोच कार्यक्र्म चालूच.
त्या तुलनेने किंबहूना, तुलना करणेच गैर, ईतके ईकडचे ह्या मुलांचे आयुष्य खडतर(hectic).कदाचीत एखाद्याला स्वतंत्र dorm मधे room मिळेल,नाहीपेक्षा सर्व साधारण प्रत्येकी दोन मुलं एका room मधे वाटून राहातात.स्वतःचा जणू नवा संसारच थाटतात. “पैसा दो और सेवा लो.”
सकाळच्या breakfast पासून रात्रीच्या dinner पर्यंत, लाजवाब खाणं. “Freshman Fifteen” असं म्हणण्याची एक प्रथा ईकडे आहे.त्याचा अर्थ असा, की ही पहिल्या वर्षाची मुलं दोन तिन महिन्यात पंधराएक पौंड वजन वाढवतात.परंतु, गप्पा मारा आणि थोडा tv बघा असलं काही करता येत नाही.”बैलाला जूं” बांधून शेत नांगरायला लावल्या सारखं, पहिल्या दिवसापासून busy ठेवतात.
तसं पाहिलं तर तिकडचा शिक्षणाचा निव्वळ खर्च, ईकडच्या मानाने नगण्य.अर्थात तिकडचा खर्च भारतातल्या स्रर्व साधारण लोकांच्या दृष्टीने खूपच,पण ईकडे प्रत्येक गोष्ट “पैशाचा धंदा”या द्रुष्टीने पाहिला जात असल्याने, एक मराठी कविता आठवली
प्रेमची चटणी
प्रेमची भाकर
प्रेमाचा सुटला स्वाद
करूया प्रेमाचा संसार
तद्वत
पैसाच चटणी
पैसाच भाकर
पैशाचा सुट्ला स्वाद
करूया पैशाचा संसार
खरं म्हणजे ईकडे मुल, अठरा वर्षाचं झालं, म्हणजे ऍड्ल्ट झालं (बाप्या किंवा बाई)असं समजतात.त्यामुळे बाह्य जगाशी ती expose होतात.अकस्मात त्यांना पोक्तपणा येतो.एव्हडंच काय, त्यांच्या याउप्पर होणाऱ्या कसल्याही माहितीची वाच्यता,मग त्यांचा प्रोगरेस कसा चालला आहे, त्याला परिक्षेत मार्कस किती मिळाले, याची माहिती, कायद्याने ईतर कुणालाही (आई वडीलाना सुद्धा)कॉलेज कडून देता येत नाही.अर्थात ही गोष्ट Freedom and Privacy च्या कारणासाठी असल्याने, ज्यासाठी अमेरिका प्रसिद्ध आहे,त्याचा वापर केला जातो.कदाचित ह्याचा वापर एव्हड्या लहान वयात पण केला जातो ह्याला ईकडची कुटुंबपद्धती कारणीभुत असेल,परंतु, ह्या विषयावर चर्चा करणे ईथे योग्य वाटत नाही.
campus मधे राहून दुनियादारी सांभाळावी लागते.पैशाचे सर्व व्यवहार सांभाळावे लागतात.एव्हड्या लहान वयात केव्हडी ही जबाबदारी?
उलट तिकडे, अगदी लग्न होई तो पर्यंत, शिक्षण आणि अभ्यासाशिवाय कसलीच जबाबदारी नसते.आई किंवा बाबांचा ती जबाबदारी असते.आता आता तर भारतातसुद्धा अशीच पद्धती चालू होऊ पहात आहे किंबहूना झाली आहे.आता हे बरं की ते बरं हे ज्याने त्याने ठरवावं.
एका दृष्टीने पहिलं बरं वाटतं, की स्वतःच्या पायावर उभं राहाण्याची संवय अगदी सुरवाती पासून होते.दुसऱ्या प्रकारात एव्हडी जबाबदारी नसल्याने, शिकत असतानाचं आयुष्य मजेत जातं.काही तरी मिळण्यासाठी काही तरी गमवावं लागतंच.
शेवटी काय? ती पद्धती असो वा ही पद्धती असो, “पसंत अपनी अपनी अन ख्याल अपना अपना ” हेंच खरं.कुणीस म्हटलंय ना—–
“पिसे सनतडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे ।
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले पिल्लू ऊडूनी जाई “
ह्या सत्याला choice मात्र नाही.मग शिक्षणपद्धती ईकडची असो वा तिकडची असो.
माझ्या नातवाला आणि नातीला निरोपाचं पत्र लिहीलं ते असं.
Hello Nitish
We will miss you.However,it gives us opportunity to meet you again.
We are proud of you, since you are proceeding on a mission ,no ,no you are going to swim in a ocean of vast knowledge.By the time your mission is over you will be full of information that reveals secrets of nature.
You are prudent to choose a place of your liking and that too quiet near to all of us.
We wish you all the best.
Take care of your health.
We love you
Ajee and Aja
Hello Ankita
Just as we miss Nitish,we shall miss you too.It is too much for Grandparents to thus miss two Grandchildren at a time.
However,it makes us happy that we can meet you both, sometimes in future.
We are proud of you that you are now solely on your own.We are confident that you are capable of handling whatever comes across.
Please remember following couplet.Perhaps it will come to your help whenever you are in glory or otherwise.
Oh! God
Help me be humble
While I am in my glory
And
Give me strength
While I am in real worry
Take care of your health which is real wealth.
We love you
Love
Ajee/Aja
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
