Monthly Archives: नोव्हेंबर 2007

प्रीत तुझ्यावर सदैव करी

प्रीत तुझ्यावर सदैव करी
मन माझे खूळे होऊनी
प्रीत तुझ्यावर सदैव करी
जरी येशी सामोरा मला पाहूनी
तरी शब्द ओठी जाती राहूनी
समजावू किती ह्या मनाला
खूलवू किती ह्या मनाला
भोळे हे मन काही न समजे
रात्रंदिनी ही उदास असते
मन माझे खूळे होऊनी
प्रीत तुझ्यावर सदैव करी
क्षणोक्षणी सतावते हे मन माझे
रात्र सारी जागवीते हे मन माझे
ठाऊक नसे हे तुला कधी
परी जीव टाकीते तुझ्यावरी
मन माझे [...]

नको माझे स्वप्न मोडू

नको माझे स्वप्न मोडू
हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा
नको तू रात्र ढळू
नको माझे स्वप्न मोडू
पाहूनी त्याला नजर फिरवीली
कशामूळे मी नजर झूकवीली
गुणगुणत गाणे वारा गाई
हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा
भेट झाली आम्हा दोघांची
लागण झाली हजारो दिव्यांची
अगणित हार गुंफिले फुलांचे
कुजबुज होई अमुच्या मिलनाची
हळू हळू जा तू चंद्रा
हळू हळू तू जा
नको तू रात्र ढळू
नको [...]

घडत असे घडता घडता

घडत असते घडता घडता
इशारा देते ही संध्या जाता जाता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता
सहचरा शिवाय मन लागेना
जीवन सुने सुने राहाता येईना
मिळे कुणी असाच जाता जाता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता
असता मन माझे उत्साही
कटाक्ष टाके कुणी हंसूनी
न व्हावी माझी परिणती
उश्वास मी घेता घेता
जीवनात एक एक गोष्ट
घडत असते घडता घडता
        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
           [...]

दाजी “पोष्टमन”

दाजी “पोष्टमन”
भास्करभाऊना दाजी धरून सहा मुलं.दोन मुलगे अणि चार मुली. दाजी सर्वांत मोठा.तशी दाजीला आणखी दोन भावंड होती,परंतु ती लहानपणीच निर्वतली.
भाऊ एकटे कमविणारे, गुंडू जोश्यांच्या दुकानात कारकूनाची नोकरी करून किती पगार मिळणार.एव्हडी मुलं झाल्यावर गरिबी ठाण मारूनच बसणार.
दाजी जेमतेम इंग्रजी ४ थी पर्यंत शिकला.मराठी ४ ईयत्ता आणि इंग्रजी ४ ईयत्ता.खूप झालं असे त्याला वाटलं.पण खरं [...]

कसं आहे तुझं

कसं आहे तुझं
कुणी विचारेल का
माझ्या दुःखी मनाला
कसं आहे तुझं
कसं आहे तुझं
नशिबा तुझं निराळंच वागणं
छळायचंच तर खूप छळणं
फूल बहरलं तर डहाळी तुटणं
कुणी बरोबर तर कुणी चुकणं
म्हटलं ज्याला अगदी जवळचं
नजरच म्हणाली आहे ते चुकीचं
करण्य़ा गेलो अतिव स्नेह
पदरी पडला अतिरेकी विरह
पहिल्या पाऊली झाली घाई
शेवट होऊनी ठोकर खाई
घालवून बसलो आझादी
कुणी समजावे कुणी जाणावे
प्रेमापासून होई कशी उतराई
कुणी विचारेल का
माझ्या दुःखी [...]

अर्धी नियत छुपी छुपी

अर्धी नियत छूपी छूपी
स्वभाव ज्यांचा छूपा छूपा
कसल्या कराव्या अपेक्षा
नकली चेहरा सामोरा येई
असली भाव छपून राही
स्वतःशी स्वतः लपून छपून
कसली अपेक्षा ओळखीची
कसली द्दयावी अलिंगनें
कसल्या कराव्या शुभेच्छा
अर्धी नियत उभारलेली
अर्धी नियत छूपी छूपी
दिलदारीचे ढोंग रचवून
जाळे पसरवीत गप्पांचे
ढकलती जीवन दिवसाचे
सुखं शोधती रात्रीचे
दुःख अंतरी ओठी येई
दुःख शरिरी छपून राही
अर्धी नियत उभारलेली
अर्धी नियत छूपी छूपी
      श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      shrikrishnas@gmail.com
 

आली फिरून उत्कंठा जगण्याची

आली फिरून उत्कंठा जगण्याची
पदर ओढिला काट्यानी
चाळ तोडिला पायानी
उडत्या माझ्या मनाला
कुणि आता नका आवरूं
चालले होऊन माझे मन
जणू वाऱ्या वरचे पाखरूं
आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा
गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून
देखिले चोहिकडे नयन मिचकावून
बहरले जीवन फुला फुलातून
निश्चय झाला मग हे देखून
आली फिरून उत्कंठा जगण्याची
आला फिरून ईरादा मरण्याचा
का भारावलेले असे माझे जीवन
का मोकाट सुट्लेले मी असे तुफान
मन होई साशंक [...]

लपून छपून येई दुलहन

लपून छपून येई दुलहन
ढळून होई दिवसाचा अस्त
होवून संध्या दुलहन मस्त
लपून छ्पून येई
छंदिष्ट माझ्या मनाच्या अंगणी
लावील का कुणी
स्वपनांच्या दीपज्योती त्याक्षणी
असेच केव्हा होती जेव्हा
बोजड निश्वास
भर भरूनी येती जेव्हा
अश्रू नयनी
मुरडत मुरडत येऊनी तेव्हा
करील का कुणी
मजवरी प्रेमाचा वर्षाव
दोन मने का कधी न जुळती
कुठून आली जन्माची नाती
वैरी होऊनी अपुले मन
असून अपुले
का दुःख साही ईतरांचे
न जाणे मन माझे भेद गहिरे
न जाणे [...]

कोचऱ्याची लिलू

 कोचऱ्याची लिलू
दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फौन्टनच्या
दिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोरी आली.
“अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर”असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळख पटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकिली कॉलर, हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो “अगं तू वकील केव्हां झालीस [...]

ते नेत्रांनी गमवलंय

ते नेत्राने गमवलंय
भंग स्वपनाने  एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते नेत्राने गमवलंय
भंग स्वपनाने हे एकच शिकवलंय
शोधून,शोधून सुद्धा जे मिळतं
ते मिळल्यासारखे नसतं
माझा तूं मनस्वी  असून
रुसवा कां कुणाष्टाऊक
काय मनात होतं
अन
काय प्रत्यक्षात झालं
भंग स्वपनाने  एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते नेत्राने गमवलंय
दूरवर दिलेली माझी हांक
ताऱ्याना आपटून
परत आली
भंगलेल्या माझ्या दुनियेच्या
एकाकी असलेल्या किनाऱ्यावरून
परत आली
पण आता हे तडपणं पण
कुचकामी झालंय
भंग स्वपनाने एक शिकवलंय
मनाने जे वरलंय 
ते [...]