Monthly Archives: डिसेंबर 2007

संपली माझी कहाणी

संपली माझी कहाणी
ह्या जगती असती अनेक गमती
असती लाखो दुखदेयी सोबती
जीवनसाथी जाई मज सोडूनी
संपली माझी कहाणी
संकटे मनी नशिबाने येती
इच्छुक दोघे भेटू न शकती
दिसे बहार नावापुरती
दोन फुले फुलू न शकती
मनोरथाची बाग उधळूनी
बरबात झाली जवानी
संपली माझी कहाणी
जीत अपुली दुनियेत नसे
मने देवूनी हरतो जसे
ओठावरती नशिबी दुषणे
प्रेमभरी ते गीत कुठे
मन ही नसे अपुल्या ठिकाणी
हर कहाणी झाली पुराणी
संपली माझी कहाणी
  श्रीकृष्ण [...]

रामभाऊ गणेश माळगी

रामभाऊ गणेश माळगी
“रामभाऊ” असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला ” रामा” म्हणायचे तर कुणी त्याला ” रे,रामा ” अशी साद घालायचे कुणी ” रामा रे ” असं पण म्हणायचे.सर्व साधारण त्याला “रामा” च म्हणायचे.
तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले “हा माझा [...]

देवू नये अपुले मन

देवू नये अपुले मन
देवू नये अपुले मन
कधीही सुंदरीला
करूनी ते अपुले
मिटवीतात ते धुळीला
जीवनभर लाविती
रोग अपुल्याला
पाहूनी प्रीतीचा आजार
इलाज करीती बेसुमार
वाढवून प्रीतीचा आजार
करीती खूपच उपचार
नसे कसलाही भरंवसा
ह्यांच्या प्रीतीचा
घेती मन हिसकावूनी
पश्चात ते विसरूनी जाती
देवू नये अपुले मन
कधीही सुंदरीला
लोक सांगती देती दगा
ह्या अपुल्या मनाला.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

हा असा एकांत

हा असा एकांत
प्रेमभरी दुनिया ही
भासे किती तरी तरुण
हे असे शांत शांत
हा असा एकांत
ह्या उंच उंच पर्वतांच्या
गर्वीष्ट सावल्या
सरसावती सांगण्या
नजर उंचावूनी पहाण्या
येती देवदूत स्वर्गातले
होवून मुग्ध बोलण्या
हे असे शांत शांत
हा असा एकांत
नसे कसली अडचण
नसे कसले दडपण
पाऊला पाऊला मागे
असे एक घसरण
ठसे पाऊलांचे
करीती एक निशाण
हे असे शांत शांत
हा असा एकांत
प्रेमभरी दुनिया ही
भासे किती तरी तरुण
    श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      [...]

असे ही अपुली फक्त कहाणी

असे ही अपुली फक्त कहाणी
हे गीत प्रीतीचे
ही खैरात लाटांची
नसे हे जीवन अन्य काही
असे ही अपुली फक्त कहाणी
काही मिळवून गमवावे
काही गमवून मिळवावे
असे अर्थ जीवनाचा
येवून जाण्याचा
दोन घडीच्या जीवनातून
आयुष्य प्राप्त करण्याचा
तू प्रवाह नदीचा
मी किनारा तुझा
मी सहारा तुझा
तू सहारा माझा
असे नयनात सागर
पाणावलेल्या आशेचा
हवा वादळी येणार
येऊन ती जाणार
ढग येई क्षणभर
कोसळून जाई नंतर
सावल्या आडोसा घेती
निशाणी ठेवून जाती
जे देई मना शांती
असावी जवळ [...]

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

दुसरी बाजू ऐकली पाहिजे
ताई म्हणे बाळूला
जावून सांगते आईला
तुच मारीलेस मला
ऐकून हे
आई म्हणे ताईला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे
कोकरू म्हणे लांडग्याला
जावून सांगते मर्कटाला
तुच खाणार मला
अन
करीशी नुसता बहाणा
ऐकून हे
मर्कट  म्हणे कोकराला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे
प्रवीण मारे प्रमोदला
पोलीस सांगती कोर्टाला
ऐकून हे
जज्ज सांगे कोर्टाला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे
अपराधी अन निरपराधी
बाजू मांडती अपुली
आईची प्रीती
मर्कटाची भीती
अन
जज्ज्याची कार्यपद्धती
वापरूनी ते ते मध्यस्थी
अपुल्या निर्णयास येती
शेवटी
योग्य निर्णय मात्र
ठरवित असते [...]

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं
नांव “सागर”, पण खरंच सागरा सारखा विशाल होता.मोठ्ठे डोळे,लांब रुंद कान आणि गुबगुबीत शरिराचा सागर मी त्याच्या लहानपणी पाहिला होता.आता जवळ जवळ त्याच्या पस्तीस वर्षावर तो ईहलोकाच्या यात्रेवर आम्हाला एकटेच सोडून निघून गेला.
म्हणतात, देवाला चांगले लोक आवडतात.पण पुरंपुरा चांगुलपणा तरी दाखवायला देवाने त्याला आयुष्य द्दयायला नको काय?का, तो त्याला एव्हडा [...]

नियत जनांची खरी नसे

नियत जनांची खरी नसे
ह्या चंचल चंगळ दुनियेमधे
नजर जनांची सरळ नसे
करून नखरे निघू नकोस
ईमान तयांचे खरे नसे
खुळे असे हे मन मोठे
छेडुनी होईल ते खोटे
करून तुझ्याशी छेडाछेडी
नियत तयाची खरी नसे
लज्जे मधुनी पदर सावरी
ही प्रेमगीते नसती खरी
लाटातून सावर नाव तुझी
नियत तुफानी खरी नसे
निरोप तुझा मी घेऊ कसा
कुणवर विश्वास ठेऊ कसा
लपून जा माझ्या नयनी
नियत जनांची खरी नसे
ह्या चंचल चंगळ [...]

नेती नाव जीवनाची तुफानाकडे

नेती नाव जीवनाची तुफानाकडे
भेटती जीवनी अनेक भोळे
नेती नाव जीवनाची तुफानाकडे
होती परवाने प्रभावी
ज्योतीमुळे
म्हणती ते भोळे मनात
गुजरेल आयुष्य या ईथेच
परी पाहुणे असती फक्त
रात्रीचे एकच
भेटती जीवनी अनेक भोळे
नेती नाव जीवनाची तुफानाकडे
सर्वच सोहळ्यामधे प्रीती
न होई ज्योती
सर्वच सुंदरीचे नयन
न करीती ईतरां घायाळ
असती जे दैववान
होती तेच कुर्बान
भेटती जीवनी अनेक हे भोळे
नेती नाव जीवनाची तुफानाकडे
बुडुनी दूर सागरात
करीती ईशारा किनाऱ्याला
लाऊनी गुपचुप आग
तमाशा दाविती [...]

सबनीसांचा वसंता

सबनीसांचा वसंता
आम्ही त्याला वसंता कधीच म्हटलं नाही.त्याला आम्ही सबनीस म्हणूनच ओळखत होतो.त्यालापण सबनीस म्हणूनच हांक ऐकण्याची संवय झाली होती.
हा सबनीस मडुऱ्याचा.हे एक सावंतवाडी तालुक्यातलं लहानसं खेडं. दहा पांच घरं सबनीसांची होती.लहानपणी जवळच्या मराठी शाळेत शिकून झाल्यावर सबनीस सावंतवाडीला ईग्रजी शिकायला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी राहात होता.त्याचे वडील त्याच्या खर्चाचे पैसे नियमीत पाठवीत असत.
सबनीसाचं शिक्षणात जास्त [...]