मार्च 30, 2008 – 11:01 pm
पाहूनी मला तू अशीच हंसशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
म्हण हवे तर मला परदेशी बावळा
अथवा म्हणशी मला अपरशी खूळा
मला बनवूनी सत्य मनातले लपवीशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
मग्न होवूनी हरवून बसशी
चालती फिरती जणू प्रतिमा जशी
भाव प्रीतीचे अन नजर हवी तशी
समजू नां ही प्रेमाचीच सरशी
श्रीकृष्ण सामंत(स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
मार्च 29, 2008 – 2:35 सकाळी
“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.”
“पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.”
“अंतरज्ञान म्हणजे”व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान.” कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक. पण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं पाहिजे.”
असं म्हणत [...]
मार्च 27, 2008 – 1:04 सकाळी
पाहूनी तुला मजसमोरी
केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी
पदर तुझा तू न सांवरी
गं! राहू मी कसा भानावरी
नयन तुझे बिलोरी जांबापरी
ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
हंसणे तुझे जणू वीज चमकणे
श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे
इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे
पाहूनी तुला मजसमोरी
गं! राहू मी कसा भानावरी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
मार्च 25, 2008 – 2:58 सकाळी
“अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला.”
“करून हे एव्हडे सारे
कुणी जरी पडे आजारी
सेवेच्या कर्तव्या सारखे
कर्तव्य वाटे फारच न्यारे”
मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत [...]
मार्च 23, 2008 – 5:26 सकाळी
माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं
“तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?”
त्यावर तो म्हणाला,
“त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे.”
मी त्याला हे ऐकून म्हणालो,
“अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?”
हंसत,हंसत मला म्हणाला,
“आध्यात्म” ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो.
श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे [...]
मार्च 21, 2008 – 4:07 सकाळी
“लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही.
काय झालं आहे या [...]
मार्च 19, 2008 – 4:35 सकाळी
शिला मला म्हणाली,
“मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा.”
असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती.
मी म्हणालो,
“शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे.”
शिला म्हणाली,
“चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवऱ्याचं काही खरं नाही हे [...]
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दारु न पिता झिंगणार नाही
झोप न येता पेंगणार नाही
कसल्या आल्या भावना
शिस्ती शिवाय रहावेना
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
दुःखाची नाही कसली खंत
परिणामाची नाही मुळीच भ्रांत
पुरूषगीरी सोडणार नाही
स्त्रीचा अवमान टाळणार नाही
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे सोडणार नाही
करून करून भागले
देवपूजेला लागले
नैवेद्दया शिवाय पूजा नाही
प्रसाद मागल्यावर देणार नाही
मोडेन पण वाकणार नाही
तत्व माझे [...]
मार्च 16, 2008 – 2:41 सकाळी
“हो मी तुझी कविता ब्लॉगवर आली रे आली की प्रथम वाचतो.पण शरद ह्यावेळची तुझी कविता खूपच दुःखी होती.तुझ्या कवितेचा संग्रह पाहिला तर जास्त करून त्या दुःखी असतात.एखाद्दया कविला दुःखाशिवाय कविता लिहायला विषय़च नसतो का रे?”
काल शरद मला चौपाटीवर भेटला.थोडी दाढी वाढलेला चेहरा,खाली लेंगा,वरती झुळझुळीत पैरण,पायात चप्पल असा पेहराव करून सकाळीच समुद्राच्या दिशेने क्षितीजाकडे टक लावून [...]
मार्च 15, 2008 – 1:35 सकाळी
कधी काळी विचार आला
माझ्या मनी
असावी अशी माझी प्रिया
चंद्रमुखी
आहेस तू अगदी तशी
विचार आला माझ्या मनी
नसे काही लिखीत
नसे कसली शपथ
नसे कसली नाराजी
नसती कसली वचने
चेहरा असे भोळा भाळा
निष्पाप अर्थ दिसे डोळा
असेच तुला कल्पुनी
विचार आला माझ्या मनी
असावी अशी माझी प्रिया
चंद्रमुखी
खुषीची ती सहकारी
दुःखाची ती वाटेकरी
मोठ्ठाली स्वप्ने नकरी
माझ्या हृदयी वास करी
आहेस तू अगदी तशी
विचार आला माझ्या मनी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com