गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
केस तुझे भूरभूरती वाऱ्यावरी
पदर तुझा तू न सांवरी
गं! राहू मी कसा भानावरी
नयन तुझे बिलोरी जांबापरी
ओठ तुझे थरथरत्या मैखान्यापरी
गं! राहू मी कसा भानावरी
पाहूनी तुला मजसमोरी
हंसणे तुझे जणू वीज चमकणे
श्वास तुझे जणू गुलाबी गंध दरवळणे
इतर बहकती पाहुनी तुझे ते चालणे
पाहूनी तुला मजसमोरी
गं! राहू मी कसा भानावरी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

pkphadnis said,
March 28, 2008 at 6:05 pm
सामंतसाहेब शीर्षकामधल्या ग वर अनुस्वार कशाला?
shrikrishnasamant said,
March 29, 2008 at 1:56 am
कोंकणातील लोक (की कोंकणस्थ)सानुनासिक उच्चार करतात म्हणून केवळ असं लिहायची पद्धत पडलीय.
माझ्या कल्पनेप्रमाणे हे शब्द मुळात सानुनासिकच उच्चारले जात असावेत; फक्त कोंकणात / कोंकणस्थांत ही पद्धत अजूनही चालू आहे.
सामंत