मिळाले मनाचे आज काफिले

April 20, 2008 at 5:58 pm (अनुवादीत)

तुझ्या प्रीतीची संगती सोडून
सांग मी कुठे जावे
मनी आली भीती माझ्या
खुशीने मिठीत तुझ्या मी
आज कसे मरून जावे

मिळाले मनाचे आज काफिले
आहोत जवळ उभे पाहत मंजिले
मिष्कील हंसुनी जेव्हा तू पाहिले
मिटून गेले हंसत क्लेश मनातले
प्रेमळ असती हे सुंदर क्षण
त्यां इथे थांबण्या तूच सांगावे
खुशीने मिठीत तुझ्या मी
आज कसे मरून जावे

पाऊली तुझ्या मी वाहू हे जीवन
का वाहू तुझ्या पाऊली देदीप्य लोचन
होशील जर तू खूष तुला वाहिन
मनातल्या सद्भावना रात्रंदीन
सुखवीन मी मला रे सजणा
नजरेत माझ्या तू सदैव असावे
तुझ्या प्रीतीची संगती सोडून
सांग मी कुठे जावे

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

 

 

 

 

Permalink No Comments