Monthly Archives: जुलै 2008

यश आणि अपयश

 
” आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती. “
प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशीशाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं.
भेटल्यावर मला म्हणाले,
” थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू [...]

का झाला कठिण मार्ग जीवनाचा

का झाला कठिण मार्ग जीवनाचा
जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा
असे नसावे की जीवनी प्रेम नसावे
किंतू जीवनात कसलेही जीवन नसावे
का सुचले जावे मनी निर्णय घेण्याचा
जवळी असूनी येई विचार दूर जाण्याचा
मिळवूनी तुला रे सजणा जाशी तू रूसूनी
खूष मी माझ्या मनी जाशी मला तू रडवूनी
पापण्यातील स्वप्न देईल का मंत्र जगण्याचा
का झाला कठिण मार्ग जीवनाचा
जवळी असूनी येई विचार दूर [...]

मानसिक भितीने ग्रासलेला गुरुनाथ

 
“बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं”
मी एकदा माझी कार रिपेअर करण्यासाठी एका कारखान्यात टाकली होती.मोटर कारखान्याच्या मालकाने मला एक भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाला,
“ह्या लिस्ट मधले पार्टस तुम्ही अमूक अमूक दुकानातून आणा.हे पार्टस स्पेशल आहेत आणि आम्ही ते ठेवत [...]

नव्हतो ग!मी सजणे असा

 
नव्हतो ग! मी सजणे असा
केला बदनाम इतरानी जसा
दोष तुही दिलास थोडासा
गमविला मी जगाचा भरवंसा
नव्हतो ग! मी सजणे असा
असेल खरे जे दिसले नयनाला
सजणे! धोका मिळाला नजरेला
किती किती म्हणूनी वाद घातला
होता ग! हा इतरांचा दुष्ट फैसला
केला बदनाम इतरानी जसा
नव्हतो ग! मी सजणे तसा
ठोकरूनी तू माझ्या मनाला
सजणे! तोडून गेलीस प्रीतिला
इतर सगळे नाचले ह्या दिवाळीला
नव्हतो ग! मी सजणे असा
केला [...]

कमकुवतपणा ही पण एक प्रकारची शक्तिच असते

“हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली “मला माझा जॉब आवडतो म्हणून.”
आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना [...]

कुणी करील का प्रीति मजवरती

 
कसे मन जिंकतात लोक कुणाचे
कुणी देईल का मला धडे प्रीतिचे
कुणी करील का प्रीति मजवरती
देऊनी वचने करिल का ती पुरी
अशीच स्वप्ने ठेऊनी नयनी
भटकंती करीतो मी रानीवनी
काय म्हणावे ह्या नशिबाला
प्रीत देईना ती सुंदर बाला
कसे मन जिंकतात लोक कुणाचे
कुणी देईल का मला धडे प्रीतिचे
नसे पाहिला मी पाऊस नयनातून
नसे सोडिला मी हात हातातून
नेईल का कुणी मला त्याठिकाणी
भेटेल सुंदर बाला [...]

आमचे मित्र श्रीयुत “मी,माझं,मला”

“मला वाटतं आपण नेहमी एखाद्दा गोष्टी बद्दल, प्रश्न करावे,साशंक व्हावं,शोध करावा,पटकन विश्वास ठेऊ नये अशा वृत्तीचंअसावं.पटकन विश्वास ठेवायला किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला मी नेहमीच नकार देतो. “
हे गृहस्थ मला खूप दिवसानी दादरच्या टिळक पूलावर अचानक भेटले.त्यांच नाव जरी चटकन लक्षात आलं नाही तरी त्यांना आम्ही आमच्या पूर्वीच्या बिल्डिंगमधे राहत असताना आमचे शेजारी म्हणून टोपण नांवाने [...]

बाग बहरूनी गंध देते फुलांचा

बाग बहरूनी गंध देते फुलांचा
सागर उफाळूनी बूंद देई वर्षाचा
त्याचे म्हणावे जीवन जो
दुसर्‍या देई आनंद जीवनाचा
नसशी जरी सूर्य तळप तू होऊनी दिपक
फुल मिळो वा कांटे सत्याची तू आस पकड
मिळते प्रीति मनाला नयनी पूर येई अश्रुंचा
त्याचे म्हणावे जीवन जो
दुसर्‍या देई आनंद जीवनाचा
बाग बहरूनी गंध देते फुलांचा
सागर उफाळूनी बूंद देतो वर्षाचा
लहरूनी फिरे वारा श्वासांचा होई कोंडमारा
त्यजिले जीवन इतरानी [...]

मागून येणार्‍याला मी दरवाजा उघडा धरून ठेवते.

 
“मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले.”
त्यादिवशी आम्ही एका सेमिनारला गेलो होतो.ललिता प्रधान माझ्या बरोबरच काम करते.सेमिनार संपल्यानंतर मी दरवाजातूनबाहेर पडत असताना दरवाजा रोखून धरून उभी असलेली तिला पाहून मी तिच्या बरोबर गप्पा मारतच उभा राहिलो.नंतर आम्ही दोघं कॅन्टिन मधे जावून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा पुढे चालू ठेवित [...]

पन्नास टक्के थेअरी

 
“ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?”
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
“मला तरी त्याचा फायदा होतो.”
नरगुंदकरांचा मुलगा खूप वर्षानी मला भेटला.त्याचे आईवडील त्याच्याचकडे हल्ली राहायला गेले होते.म्हणून मी त्यांनाभेटायला गेलो होतो.घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर काही गप्पागोष्टी झाल्या.बोलता बोलता त्यांचा मुलगा म्हणाला,
“मला चांगलच लक्षात आलं की नंतर येणार्‍या सर्व [...]