सप्टेंबर 30, 2008 – 8:51 सकाळी
नयनातून माझ्या अश्रू टिप टिप ओघळती
सांगू कुणा हे साजणा! तुझी नसता संगती
का न्याहाळसी मला लज्जीत होऊनी
हाती नसे माझ्या काही आहे हतबल मी
दे इथेच मला तुझ्या शुभेच्छा
नाही राहिल्या कसल्याही इच्छा
वाटे जावे मरूनी
का न्याहाळसी मला लज्जीत होऊनी
प्रीतिची लज्जत तुझ्याच हाती सजणा रे!
ये भेटाया मज सत्वरी तुला मी विनवीते
जाई दिनकर मावळूनी
का न्याहाळसी मला लज्जीत होऊनी
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे [...]
सप्टेंबर 28, 2008 – 9:08 सकाळी
मी माझ्या एका अविवाहीत स्नेह्याना म्हणालो,समजा क्षणभर आपण विवाहित आहात असं समजू.
आपल्याला सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधान पत्नी असती तर तिच्या सहवासात राहून,आपल्या बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम, वृत्तिला थोडा आळा बसला असता.
आपण लग्न बंधनात एकदाचे पडल्याने आपल्या आईला पण सुटकेचा निश्वास देता आला असता.
आपल्याला एक दोन मुलगे आणि एक दोन मुली असत्या तर एखाद्दा मुलाने आपल्यात असलेले संगीताचे कौशल्य आत्मसात करून [...]
सप्टेंबर 26, 2008 – 9:42 सकाळी
झाली जर प्रीति तुजवरती
राहूनी बाहुपाशात तुझ्या
निद्रेत जाईन मी सत्वरी
हे वेड माझे सांग रे! साजणा
कमी कसे होईल याउप्परी
सांगती ह्या नशाधुंद नजरा
अन फूलांचे ते ताटवे
क्षण एक ही घालवू कसे
तुझ्या विना रे! एकटे
सारीच प्रीत उधळून तुजवरी
जादू करूनी जाईन तुजवरी
विसरूनी ती सर्व संकटे
क्षण ते पळ ते जाईन
स्वपना सम विसरून
परतव माझी सारी स्मृती
मलाच तू फिरून
जाईन दूर तुझ्या दुनियेतून
स्मरूनी तुला मन [...]
सप्टेंबर 24, 2008 – 8:37 सकाळी
काल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला,
“भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत?”
ते म्हणाले,
“तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला आश्चर्य,मनातला संदेह आणि कसल्यातरी विषयाचं [...]
सप्टेंबर 22, 2008 – 9:27 सकाळी
वाचता वाचता वाचनात आलं म्हणून,ह्या विषयावर आज मी आणि प्रो.देसाई आणि त्यांच्या नविन पाहूण्या बरोबर जरा “वृद्धत्व शाप केव्हा ठरतं.”
ह्या विषयावर चर्चा करायचं ठरवलं.
त्याचं असं झालं,बराच वेळ मी तळ्यावर भाऊसाहेबांची वाट बघत बसलो होतो.अर्थात बरोबर पाडगांवकरांचं कवितेचं पुस्तक चाळण्यात वेळ घालवला.इतका उशिर झाल्याने येत नाहित असं समजून दूरवर एकदा न्याहाळून पहावं म्हणून नजर टाकली असता [...]
सप्टेंबर 20, 2008 – 9:28 सकाळी
लाडली लाडली बहिण माझी साजरी
ठुमकत ठुमकत चालेल जणू नवरी
नटून थटून येईल तिचा सांवरीया
नाचत गाजत येईल तिचा भाऊराया
थेंब थेंब घामाचे करीन मी मोती
त्या मोत्याची घालीन तिला साखळी
वरात येता पाहिल तिला सारी दुनिया
नाचत गाजत येईल तिचा भाऊराया
सोळा श्रृंगाराने बहिण माझी नटली
माथ्यावर बिंदी अन हळद फासलेली
नाकात नथ चढवूनी तिला नटवूया
नाचत गाजत येईल तिचा भाऊराया
पालखीच्या गादीवर ऐटीने बसलेली
गोरी गोरी [...]
सप्टेंबर 18, 2008 – 8:52 सकाळी
त्याचं असं झालं,मी निलकंठ केळकरांकडे माझ्या इनकमटॅक्सच्या काही कामा करता गेलो होतो.त्यांच्या ऑफिसात तशी बरीच गर्दी होती.मला जवळ बोलावून ते मला म्हणाले,
“तुम्ही घरात जाऊन बसा.ह्या सर्व कस्टमरांची सोय लावून मग मी आत येतो.आमची संध्या नागपूरहून थोडे दिवस माहेरपणासाठी आली आहे.तिच्याशी थोड्या गप्पा मारा.कालच ती तुमची आठवण काढून तुमची विचारपूस करीत होती.”
बरेच दिवस दिवस माझी आणि [...]
सप्टेंबर 16, 2008 – 9:07 सकाळी
मिटवूनी टाक असती जी अंतरे
दाह होई जो मनी
विझवूनी टाक सत्वरी
नको दूर जाऊ सजणा रे!
भिजूनी तू मला जरा भिजवावे
टिप टिप थेंबानी गात रहावे
तू न बोलावे मी न बोलावे
समजूनी जावे फक्त इशार्याने
आजच्या रात्री मन तुझे का घाबरे
मिटवूनी टाक असतील जी अंतरे
नको दूर जाऊ सजणा रे!
केशभार माझा पदर माझा
सर्वच आहे तुझेच सजणा
बाहूपाश तुझा श्वास तुझा
सर्वच आहे तुझेच सजणा
आजच्या [...]
सप्टेंबर 14, 2008 – 9:56 सकाळी
कोकणातल्या तुळस नावांच्या एका खेड्यात रमाकांत तुळसकरने खूपच सामाजीक कार्य केलं आहे,असं माझ्या एका मित्राने मला सांगितल्याने मला माझ्या शाळेतला दोस्त रमाकांत तुळसकरची आठवण आली.हा तोच तर नसेल,असं कुतुहल मनात येऊन मी त्या खेड्यात मुद्दाम गेलो.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनातला तोच रमाकांत होता.मला इतक्या वर्षानी पाहून त्याला ही खूप आनंद झाला.
इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी [...]
सप्टेंबर 12, 2008 – 9:40 सकाळी
काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो.
संध्याकाळी त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ आल्यावर म्हणाला,
“भाऊसाहेब [...]