Monthly Archives: नोव्हेंबर 2008

माझ्या यशाची पहिली चव.

कोकणातल्या पिंगुळी गावात जाऊन एका शाळेला भेट देण्याचं कारण,मी माझ्या मावशीच्या मांडकूली गावात गेलो होतो.तिथे पिंगुळी गावचा विषय- नलिनीने- माझ्या एका मावस बहिणीने काढला.ती मला म्हणाली,
“अरे पिंगुळी गावात वसुंधरा साने नावाची माझ्या वयाची मुलगी माझ्या जवळ फार पूर्वी आली होती.आणि मी तुझी त्यावेळी तिच्याशी ओळख करून दिल्याचं तुला आठवत असेल.ती आता तशी मुलगी राहिली नाही.मुंबईत [...]

शेवटी कविताच जन्माला आली

संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती.भन्नाड वारं सुटलं होतं.
चमकत्या वीजेच्या प्रकाशात जेव्हा त्याना नाव दिसली तेव्हा केव्हा एकदा नावेत बसून नदी ओलांडून मुलाना भेटू अशी राणीला उत्कंठा लागली होती.
हे चित्र [...]

दुसर्‍याच्या नेत्रातून जीवन पहावं.

 
लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा  एक वाडा होता. दहा पंधरा घरं असतील एका वाड्यात.घरातली सर्व कामं नोकर चाकर येऊन करायची.पण गाई म्हशीना चरायला न्यायचं,त्याना नदीवर धुवायचं,घरी त्याना आणून गोठ्यात बांधून ठेवायचं,त्यांच्या समोर चारा वाढायचा,उरलेल्या अन्नाचा-पेज,उष्ट अन्न,-आंबवण त्याना खाऊ घालायचं ही कामं गावतल्या महारवाड्यातून काळू महार आणि त्याच्या बायका, मुलं येऊन करायची.
जाता [...]

गुरू शिवाय विद्दा कसली?

 
नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.हे मी रोहिणीकडून ऐकलं.
यशोधरा साखरदांडे आणि हिची मुलगी रोहिणी,जी आता रोहिणी गायतोंडे म्हणून ओळखली जाते ती नृत्यकलेत निपूण असून अलिकडे रंगमंचावर अभिनय करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी अंधेरीतल्या एका नृत्यशाळेत तिचा अभिनय पहाण्यासाठी एका मित्रा बरोबर [...]

“शब्दांवाचून कळले सारे”

 
मी तळ्यावर पुस्तक वाचत प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो तेव्हड्यात एक व्यक्ति माझ्या जवळ येऊन हंसली.मी पण त्याच्याशी हंसलो.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माला कळलं ही व्यक्ति भाऊसाहेबाना पण ओळखते.त्याच्या बरोबर एक मोठा सफेद रंगाचा कुत्रा होता.तो सतत वळवळ करत होता.
मी म्हणालो,
“तो तुम्हाला घरी जावूया म्हणून सांगतोय.”
त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले,
“नाही नाही प्रो.देसाई समोरून येत आहेत [...]

प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र असते.

 
आज प्रो.देसाई खूप दिवसानी आपल्या नवीन मित्राबरोबर तळ्यावर आले होते.माझी ओळख करून दिल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरवात केली.त्यांचा हा माझा नव्याने ओळख झालेला मित्र आपली नोकरीत असतानाचे काही अनुभव सांगण्याच्या ओघात एका मजेदार किस्याला त्यानी हात घातला.ते एका सॉफ्टवेअर कंपनीचेसि.इ.ओ होते ते ओघाओघाने मला कळलं.
ते म्हणाले,
“कामानिमीत्त मी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना [...]

घडता घडता घडेल ते घडेल

 
माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली. मला त्याने बसला उभ्या राहिलेल्यांच्या रांगेत हाताला ओढून माझ्या बरोबर चल म्हणून घेऊन गेला,तो एकदम [...]

“किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!”

मी पालघरला पहिल्यांदाच गेलो.माझा मित्र पावलु फर्नांडीस माझ्या नेहमी मागे लागायचा,की एकदा तरी ये आमच्या घरी.पावलु मुळचा वसईचा.वसईला एव्हडी वस्ति वाढायाला लागली की त्याने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं.त्याचे मामा आजी वगैरे मंडळी पालघरला रहायचे.पावलू ने तिथे एक छोटसं एक-मजली घर बांधलं.वसईची जागा आणि शेतीवाडी विकून त्याला बराच पैसा  मिळाला. त्याच्या घराजवळ आणखी काही छोटी छोटी [...]

दयाशील आणि परोपकारी हृदय

 
नंदा प्रधान मॉन्ट्रीयला गेल्यापासून बरीच वर्ष परत आलीच नव्हती.तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती हे मला नक्कीच माहित होतं.तिची मुलं लहान होती त्यावेळेला ती दोन एक महिने इकडे राहिली होती.तिचा मोठा मुलगा दिलीप का नाही आला असं मी विचारल्यावर तिचा चेहरा कावराबावरा झालेला पाहून मलाही थोडं धक्कादायी वाटलं.
नंदाने सुरवात अशी केली की काहितरी अघटीत [...]

“हलो” ह्या शब्दातली क्षमता.

आज तळ्यावर प्रो.देसायांचा नातु नितीन- आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असावा- असे दोघे येताना पाहिले.
नेहमी प्रमाणे भाऊसाहेबानी त्यांना येता येत नाही म्हणून त्यांच्या नातवाबरोबर मला निरोप देण्यासाठी पाठवलं होतं.
नितीनने त्याच्या मित्राची ओळख करून देताना सांगितलं,
“हा माझा मित्र सुरेश पेंढारकर.ह्याने कॅडवर-कंप्युटर एडेड डिझाईन वर-पिएचडी केली असून आता एका कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो.मघाशी येता येता आमचं [...]