जानेवारी 31, 2009 – 11:38 pm
प्रो.देसायांच्या घरी आज आम्ही चर्चा करण्यासाठी जमलो होतो.चर्चेचा विषय होता “शिक्षक”.
भाऊसाहेबानी बर्याच विद्वानाना ह्या चर्चेसाठी बोलावलं होतं.नेहमी प्रमाणे काही लोक शिक्षक म्हणून आपला अनुभव सांगून गेले.काहीनी शिक्षक झाल्यामुळे आपल्या जीवनात काय काय समस्या आल्या त्याचे पाढे वाचले.काहीनी शिक्षक आणि मुलांमधल्या पारस्पारिक प्रभावाबद्दल मनोरंजक माहिती सांगितली. भाऊसाहेबानी आपले पण रुईया कॉलेजमधले गमतीदारअनुभव सांगितले.
मात्र एका वयस्कर व्यक्तिने [...]
जानेवारी 29, 2009 – 9:41 pm
खरं सांगावं,खरं ओकू नये!
“स्पिक ट्रुथ डू नॉट स्पिक-औट ट्रुथ”
रामदुलारीची आणि माझ्या भावाची अलीकडे बरीच गट्टी जमली आहे.रामदुलारी कधीकधी आमच्या घरी येतो.कधी माझ्या भावाच्या क्लिनीक मधे माझगावला जातो नाहीतर माझ्या भावाला फोन करून विचारून ते दोघे कधी गिरगाव चौपाटीवर तर कधी जुहूच्या चौपाटीवर सूर्यास्त पहायला आणि गप्पा मारायला भेटतात.
ह्यावेळी तो आमच्या घरीच आला होता.इकडच्या तिकडच्या गप्पा [...]
जानेवारी 27, 2009 – 9:00 pm
“क्वान्टम फिझीक्स शाखेतले शास्त्रज्ञ सांगतात ते काही खोटं नाही.वारली लोकांसारखेच ते विचार करीत असावेत.
“जगात असलेलं सर्व काही गतिबोधकतेने अत्यंत घनिष्ठ पातळीवर एकमेकाशी संबंध स्थापित करून असतं.”
प्रो.देसायांच्या एका नातीचं सर्व आयुष्य कलकत्यात गेलं.कारण भाऊसाहेबांचा एक जांवई कलकत्याचा.अर्थात ह्या कुटूंबावर बंगाली रीतीरिवाजाची बरचशी छाप पडली होती.एकदा ती माझ्या घरी राहायला आली होती.मला म्हणाली,
“काका,मला सकाळी सकाळीच उगवत्या सूर्याचं [...]
जानेवारी 25, 2009 – 9:30 pm
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई
स्मृतीच्या आयुधाने मन जखमी होई
मनिषा हृदयाची परमार्श घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई
सज्जनता दुर्भाग्ये वैरी बनली
नटुनी थटुनही नववधू नाही बनली
हातावरची मेंदी एक ज्वाला बनली
सौभाग्याचे कुंकू एक कलंक होई
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई
पापण्यातले स्वप्न पडून उध्वस्त होई
पावलांची साथ देऊनी मार्ग भिन्न होई
रात्रंदिनी [...]
जानेवारी 23, 2009 – 10:56 pm
“हजेरी हे नाम आहे क्रियापद नाही.हजेरी म्हणजेच “असणं” काही “करणं” नाही”
“असण्यावर” माझी श्रद्धा आहे.अलीकडेच मला ह्याची आठवण आली.त्याचं असं झालं की कोकणात त्यावर्षी खूप मोठं वादळआलं होतं.नारळाची उंच उंच झाडं मुळासकट उन्मळून पडली होती.काही घरांची छप्परं उडून गेली होती.नळे कौलं तुटून घरं उजाड झाली होती.त्यादिवसात कोकणात नाही तिकडची गरबी असायची. असा निसर्गाचा कोप झाल्यावर जास्तीत [...]
जानेवारी 21, 2009 – 9:47 pm
अग माझ्या लाडक्या सजणे
तुला हे कसे ना कळे
की
आहेस अजूनी तू सुंदरी
अन मी पण आहे जवान
सजणे
करीन तुजवर मम प्राण बलिदान
तुझे हे नखरे अन लचकणे
नाही कुणा जमले
कसब करूनी चित्त जिंकणे
नाही कुणा जमले
पाहिले मी तुझ्या दो नयनी
तो स्वर्ग अन ही धरती
सजणे तुझे ते गोड बोलणे
तू पुन्हा बोल ते हंसहंसूनी
ह्या मम हृदयाचे धडधडणे
शमव शराबी रंग घोळवूनी
सजणे
मी प्रेमदिवाणा तुझा अजूनी
तू [...]
जानेवारी 19, 2009 – 9:22 pm
“तिला सहनशीलता म्हणा,किंवा सहिष्णुता म्हणा,ती अंगात असली की दुसर्याला सन्मान द्दायला पुढाकार घेतला जातो आणि सरतेशेवटी स्नेह निर्माण होतो.एखाद्दाची खरीच पूर्ण ओळख होणं जरा कठीण आहे पण त्याच्याशी स्नेह करून राहायला किंवा त्याचा स्वीकार करायला हरकत येत नाही”
नेहमी प्रमाणे काल माझी आणि प्रो.देसायांची तळ्यावर भेट झाली. भाऊसाहेबांबरोबर एक गृहस्थ होते.माझी ओळख करत देत भाऊसाहेब म्हणाले,
हे [...]
जानेवारी 17, 2009 – 8:34 pm
कधी हंसवी कधी रडवी
ही कसली गं! प्रीति
कधी घडवी कधी मिटवी
ही कसली गं! प्रीति
का न समझे वेडे मन माझे
ही कसली गं! लाचारी
का खळबळे हृदय माझे
ही कसली गं! धास्ती
जे स्वप्न पाहिले जागेपणी
ते आले कसे गं! वास्तवात
जरी सर्व काही मी गवसले
तरी भासे कसे गं! हरवले
का प्रभाव झाला उन्मादाचा
क्षण आला जीवनी लहरण्याचा
ही कसली गं! प्रेमासक्ति
ही कसली गं! अनुभूती
दूर असूनी [...]
जानेवारी 15, 2009 – 9:16 pm
“जे डोळ्याला दिसतं तेच भरंवशालायक असतं ह्या वर मी विश्वास ठेवत नव्हतो.पण आता माझ्या लक्षात आलं की पहाण्याची क्रिया डोळे झाकून आणि हृदय उघडं ठेवून केली जाते.मी ह्या म्हणण्याचं आता समर्थन करतो. असं हे रुपांतर व्हायला भरंवसा कारण आहे ह्यावर माझा विश्वास आहे.”
मनोहर पहिल्या पासून हुषार म्हणून समजला जायचा.त्याच्या डोक्यातल्या कल्पना आणि त्याचं वागणं जरा [...]
जानेवारी 13, 2009 – 8:40 pm
सूर्यकांत सुखटणकर माझा शाळकरी दोस्त.मी त्याला सूर्याच म्हणायचो.तो शेवटी वकील झाला आणि मी इंजिनीयर.एरव्ही आमची दोस्ती कायम राहिली नसती पण आम्हा दोघानाही पहिल्यापासून मराठी नाटकं बघण्याचा नाद असल्याने कुठे ना कुठे नाटकाच्या थिएटरमधे आमची भेट व्हायचीच.
सूर्याची वकीली नीट नाही चायलायची.बिचारा दिवसभर कोर्टात राबून दिवसाची जेमतेम कमाई करायचा.मला वाटतं,एका एका व्ययसायाला ज्याचा त्याचा स्वभाव-धर्मगूण हा ही [...]