फेब्रुवारी 28, 2009 – 4:17 pm
अक्षराची किमया.
“माझं जेव्हा शब्दाबद्दलचं ज्ञान वाढत गेलं,तेव्हा माझा आत्मविश्वास आणि माझं धैर्य पण वाढत गेलं.त्यानंतर मी ठरवलं,की माझ्या बहिणी आणि माझे भाऊ ह्यांना पण सुशिक्षीत केलं पाहिजे.आणि ते सुद्धा त्यांना शिकायचं असेल तेव्हडं.”
आमच्या लहानपणी एक गोपिकाबाई नांवाची बाई घरकामाला यायची.आमच्या राहत्या घरापासून जवळ जवळ चार मैलावर ती राहायची.रोज सकाळी आठ वाजता यायची ती संध्याकाळी काळोख [...]
फेब्रुवारी 26, 2009 – 7:30 pm
“काय झालां तेतेबाय?”
“अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद. भांडाक काय तरी तेंका निमित्त लागता झाला.”
“भावडो आता म्हातारो झालो.लहान पोरा सारखो भांडतां कित्या?
मोठ्ठ्या मोठ्ठ्यान सकाळी तुमच्या घरातून आवाज येय होते.”
“कमळ्या,अगो ऐक तर खरां, काल गुंडू जोश्यांचा बायजा आपल्या घोवांक घेओन आमच्याकडे इला.बायजाचा आत्ताच लगिन झाला मां?.मी आपलो त्येंका चहाचो आग्रहकेलंय.होती नव्हती ती [...]
फेब्रुवारी 24, 2009 – 9:36 pm
“स्त्रीयांना बहुदा विनम्र राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.पण माझ्या जीवनाने माझी कसोटी भरपूर घेतली.मला वाटतं,माझ्यातला धीटपणा,आणि खंबीरपणा आणि त्याऊप्परही माझ्यात असलेला आपमतलबीपणा ह्याचा चांगल्यातर्हेने माझं मला त्या कसोटीतून पार पडण्यात उपयोग झाला “
काण्यांच्या नलूला सर्व नेहमीच धट्टिंगण म्हणायचे.कारण मुलींपेक्षा ती मुलांतच जास्त वेळ घालवायची.पण त्यावेळी जरी सर्व असं म्हणत असले तरी ते तिचं वागणं धीटपणाचं होतं [...]
फेब्रुवारी 20, 2009 – 9:13 pm
आज तळ्यावर प्रो.देसायांबरोबर त्यांचे पूर्वीचे सहकारी प्रो.गंगाधर तेंडूलकर पण आले होते.ह्यांच नांव मी फार पूर्वी ऐकलं होतं.पण त्यांचा शिकवण्याचा विषय जरा मला जटिलच वाटायचा.पण आता एव्हड्या वर्षानी त्यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना सरळच प्रश्न केला,
“तेंडूलकरजी,ऍनथ्रुपोलॉजीस्ट म्हणजे काय हो? त्याला मानव-वैज्ञानीक असं म्हणतात एव्हडं मला माहित आहे.तुमची जर हरकत नसेल तर जरा विस्ताराने सांगाल काय?”
“सांगाल [...]
फेब्रुवारी 18, 2009 – 10:04 pm
नेहमी प्रमाणे मी आणि तानुली तिच्या स्कूलबसची वाट बघत ड्राईव्ह्वेवर येरझारया घालीत होतो.सहजच मी तानुला म्हणालो,
तानुली,”दोन” “एका”पेक्षा मोठा,” तीन ” “दोना ” पेक्षा मोठा असे करत करत “नऊ”सगळ्यांपेक्षा मोठा मग “शून्याचं” काय?
तानुला “शून्याचं”खूप वाईट वाटलं.ते मला तिच्या चेहरयावरून दिसलं.ती म्हणालीच “पुअर झीरो” मी म्हणालो,
“तानु,”झीरोच” खरा “हिरो” आहे.संध्याकाळी तूं शाळेतून आल्यावर “झीरोवर”एक कविता करतो.ती वाचल्यावर तुला [...]
फेब्रुवारी 16, 2009 – 8:26 pm
एकदां जिभली बोले दातांस
मी अशी (बिचारी) एकटी
तुम्ही मात्र आहांत पुरे बत्तीस
मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले ईकडे तिकडे
तुम्ही करता माझा चोळामोळा
करिती ते (लोक) तुमचा उपयोग
म्हणती बोललो आम्ही जिभ “चाऊन”
ऐकून हे जिभलीचे संभाषण
दातं म्हणती तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला
बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
म्हणती ते (लोक) वैतागून
गप्प रहाण्या काय [...]
फेब्रुवारी 14, 2009 – 11:34 pm
सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देयी निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सुर्याला
ऐकुनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सुर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा
ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोश नको देऊं तूं सुर्याला
दोष असे हा प्रुथ्वीचा
गर,गर फिरुनी सुर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना
पाणावल्या डोळ्याने
म्हणे प्रुथ्वी सुर्याला
भलेपणाचे “दिवस”संपले
जन्म देऊनी ह्या [...]
फेब्रुवारी 12, 2009 – 9:47 pm
आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला “फारमात” दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले,
“मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर “चर्वीचरण” करायला हूक्की आली आहे”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.? मला जरा फोकस होऊं दे”
मला म्हणाले,
“भिंगरी,भोंवरा”ज्याला इंग्रजीत “स्पायरल” म्हणतात.”
“म्हणजे,भाऊसाहेब [...]
फेब्रुवारी 10, 2009 – 8:47 pm
मी एका ओढ्याच्या कडे-कडेने जात होतो.दोन्ही बाजूला सर्व प्रदेश एकदम नागवा दिसत होता.मैल दोन मैल तरी उंच उंच वाढलेलं गवत आणि रानटी फुलं सपाट करून टाकली होती.ओढ्यातल्या पाण्याची खळखळ -आता पाणी तळाला गेल्याने- कमी झाली होती.सगळीच तळातली मातीच-माती होती.कुठेतरी मधून मधून पाण्याचं डबकं दिसे.काही डबक्यात अगदी लहान मासे चिखलात डोकं रूतून पाण्याचा शोश करून घेत [...]
फेब्रुवारी 8, 2009 – 8:58 pm
बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो.
आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो. आता [...]