प्रोफेसर देसाई आज जरा खुषीत दिसले.मला म्हणाले,
“सामंत, तुम्हाला मी एक गंमत सांगतो.तुम्ही हे पाहीले आहे की नाही माहीत माही.पण मी तुमच्या काव्याच्या भाषेत सांगतो की ह्या अमेरिकन लोकांच्या आयुष्याच्या कवितेत “फन” चं “पन” जास्त आहे बघा.
तुम्ही कदाचीत म्हणाल की मला आज काही विषय नाही म्हणून त्यांच्यावर टिका करतो पण विचार केल्यावर जरा मनोरन्जक वाटतं बघा.
त्या [...]
”अलका आमोणकरला मी एक सुसंस्कृत शिक्षीका म्हणून मानतो.कोकणातल्या एका खेड्यात ती तन्मयतेने एका शाळेत शिक्षीका म्हणून काम करायची.आणि अजूनही करते.ती एकदा आमच्या घरी आली होती.मी तिला सहजच म्हणालो,
“काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?”
अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी [...]
आज प्रो.देसायांच्या आयुष्यातला सुंदर दिवस उजाडला. महिन्याला शेकडो डॉलर देऊन दोघांसाठी खाजगी विम्याचा हाप्ता द्दायला पैसा खूपच खर्च व्हायचा.आज पासून सरकारने त्यांना मोफत विमा द्दायचा निर्णय कळवला.नवीन कायदा पास करून हेल्थ स्कीममधे सिनियर सिटीझनना ही सवलत दिली गेली.
भाऊसाहेब मला फोन करून म्हणाले,
“आमचे जुने दिवस आता भुलायला पाहिजेत.आता काळजी वाचून जगायला हरकत नाही.”
उद्दा जेव्हा तळ्यावर भेटू [...]
हेमंत माहात्मे काल बाजारात भेटला.थोडा चिंतेत दिसला.त्याच्या थोरल्या मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने डॉक्टरने तो काढून टाकण्याचा सल्ला दिला.
हेमूच्या पंचवीस वर्षे वयाच्या नातवाला,आईची मनस्थिती पाहून दया येत होती.ह्या विषयाकडे तो भावनाप्रधान होऊन विचार करीत होता.
“डॉक्टरने जरी आईची समजूत घातली होती तरी आपल्या शरिरातला एक अवयव निखळला जाताना तिला मनस्वी दुःख होत होतं.स्त्रीला निसर्गाच्या निर्मितीची मिळालेली निसर्गाचीच [...]
“अमेरिकेत प्रथमच येणार्यांनी आपले जुने संस्कार न विसरता रहावं.तसंच इथल्या चांगल्या गोष्टी शिकून आपल्यात सुधारणा करून घ्यावी.इकडच्या गोष्टीचं अंधानूकरण करून राहिल्यास आपलीच आपण पंचाईत करून घेत असतो. नंतर खंत करणं हे काय बरोबर नाही.अहो गाईचं मांस,डुकराचं मांस मिळालं म्हणून आपण खायचं काय?ते न खाता इकडे जगतां येत नाही काय?दुसरं इकडे ऋण काढून सण करण्याची प्रथा [...]
”सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे.”
माझा हा वकिल मित्र पहिल्यापासून त्याच्या डोक्यामधे सत्याची सणक ठेवून आपल्या केसीस लढवायचा.मला वाटतं त्याच्या लहानपणापासून ही त्याच्यात म्हटलं तर खोड होती.तिचा फायदा त्याला त्याचा वकिली धंदा चालवताना बरेच वेळां उपयोगाला यायचा.
त्या [...]
केशभार तू असा सोडून
नको बागेत येऊस
फुलांच्या त्या सांवल्याना
नको लज्जीत करूस
प्रीतिच्या महतीचे गुणगान
नको तू ही बागेत गाऊस
ऐकून ते गीत भ्रमराकडून
नको हंसे करून घेऊस
प्रेमाच्या गोडव्याचे भ्रमराला
कुठून असावे ज्ञान
मी तुला काय सांगू
त्या कळ्यांना तू विचार
शिकवील तो मग तुला
त्याचीच नकली कला
लफंगा असे हा भूंगा
घेशील मग तू माझाच पंगा
नच शोभते रे तुला
असे भ्रमराला बोलणे
पावित्र्य त्या प्रीतिचे
असे झडकरी विटवीणे
देशील का रे [...]
”मला वाटतं,कुठच्याही नवीन समस्येला जूनं उत्तर असतं.त्या जुन्या आणि होऊन गेलेल्या अक्कलवंत कानगोष्टी आपल्या बरोबरच असतात त्या आपल्याला आश्वासन देतात,
”आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो”
श्रीधर आणि मी एकाच गावात वाढलो आणि शिकलो.मी शिक्षण पुरं केल्यावर जास्त शिक्षणासाठी परदेशी गेलो.आणि या वयात परत आपल्या गावात येऊन उर्वरीत आयुष्य लेखन करण्यात वापरायचं ठरवलं आहे.पण श्रीधरने माझ्या [...]
कोण बरे आले माझ्या मनी
छ्न छ्न घुंगरू वाजवीत पायी
नयन न जाणे,अंतरंगा ओळखणे
मुद्राच तिची जर का अशी
स्मृतीत आणून येई ना कशी
वेडे मन माझे चिंतनात डुबले
स्वपना मागे स्वप्न घेऊनी
कोण बरे आले माझ्या मनी
पळभर करिता चिंतन मनी
ही आशा रूप बदलून येई
दुसर्या क्षणी भासे मजला
असेल का तिचीच परछाई
एक विलक्षण प्रीति घेऊनी
अनोळख्याच्या दारी येऊनी
कोण बरे आले माझ्या मनी
छ्न छ्न घुंगरू [...]
तात्यांच्या वेबसाईटवर अलिकडे खूपच सभासदत्व वाढलं आहे.इतकं म्हणाल तर तोबा तोबा.
तात्यानी रोपटं लावलं आणि त्याचा प्रचंड वटवृक्ष झाला.आता वटवृक्ष झाल्यावर मैना,साळूंकी कोकिळे बरोबर गिधाडं आनि घुबडं पण त्या वटवृक्षावर येऊन बसायला लागली.
तात्यांची व्यथा होती की ह्या गिधाडांना आणि घुबडांना मज्जाव कसा करायचा.
तात्या म्हणाले,
“ओळख द्दा आणि सभासद व्हा” असा नियम करावा असा विचार येतो.
नेहमी प्रमाणे लागलीच [...]