Monthly Archives: एप्रिल 2009

नको करूस तू दूरावा

मनातल्या माझ्या दाहाला
सख्या तू विझवावा
नको करूस तू दूरावा
विसरून जा आता विरहाला
तू जरा भिजावे अन मी भिजावे
तुषारानी कारंजातून गीत गावे
तू न बोलावे अन मी न बोलावे
इशार्‍यातून अपुले भाव समजावे
ह्या रात्री वाट दे तुझ्या संकोचाला
विसरून जा आता विरहाला
हा केशभार अन पदर माझा
सख्या सर्वस्वी आहे तुझा
बाहूत तुझ्या मी पहुडले
भीतीचे विचार आता कसले
ह्या रात्री वाट दे तुझ्या दुःखाला
विसरून जा [...]

श्रेष्ठतम मैत्री.

पुरूषोत्तम आणि मी एकाच गावात वाढलो.शाळेत एकत्र शिकलो.हायस्कूलची परिक्षा पास झाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला शहरात आलो.
मला आठवतं आमच्या सर्व मित्रमंडळीत शरद आणि पुरुषोत्तम यांची पहिल्या पासून गाढी दोस्ती होती.
अलिकडे मी सुट्टीत गावाला गेलो होतो. पुरुषोत्तमची आणि माझी खूप दिवसानी भेट झाली. तो पण आपल्या म्हातार्‍या आईवडलाना भेटायला म्हणून आला होता. एकदा फिरत फिरत आम्ही दोघे [...]

असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं.

आज प्रो.देसाई फिरायला येणार नाहीत म्हणून निरोप द्यायला आलेली त्यांची मुलगी वृंदा आणि तिची मैत्रीण मालिनी मला तळ्यावर भेटल्या.मालिनीची माझ्याशी ओळख करून देत वृंदा म्हणाली,
“तुमच्याशी गप्पा मारायला बरं वाटतं.आमचे भाऊसाहेब तर तसं नेहमीच सांगतात.”
हे ऐकून मला अंमळ बरं वाटलं.
“ही माझी मैत्रीण मालिनी.हिला दोन मुलं आहेत एक मुलगी कॉलेजात जाते.”
मी वृंदाला म्हणालो,
“तू म्हणालीस की मालिनीला दोन [...]

झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे

आज सकाळी ट्रेड्मीलवर व्यायाम करीत होतो.कानाला इयरबड्स लावून आयपॉडवर हिंदी सिनेमानतली गाणी ऐकत होतो.
“झुमका गिरा रे बरेलीके बाजार मे”हे गाणं कानावर पडून मनात दुसरेच शब्द गुणगुणायला लागले “झुणका खाल्ला रे “
आणि नंतर त्या मुळ गाण्याचं विडंबन केल्यावाचून मला राहावेना.मग म्हटलं लिहायचंच.लिहिता लिहिता शब्द सुचत गेले.आणि गाणं तयार झालं.
झुणका खाल्ला रे
हाय
झुणका खाल्ला रे बोरीवलीच्या हाटलामधे
झुणका खाल्ला [...]

जेव्हा डोळे पाणावतात.

मनोहरच्या आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा चालल्या होत्या.
“अलिकडच्या मुलांना शाळा कॉलेजात इतका अभ्यास असतो,की मान वर काढायला वेळ मिळत नाही.कारण तशी समाजात जिकडे तिकडे चूरस चालली आहे.मग लाखोनी शिकणार्‍या मुलांच्या परिक्षेत आणि पुढच्या करिअरमधे तशीच चूरस कायम राहिली तर त्यात नवल काय.?”
असं मनोहर मला म्हणाला.
मनोहरचं म्हणणं अगदी खरं वाटलं मला.जसजसं जग पुढे चाललं आहे तसतसं बदल [...]

तारीफ करू का त्याची

हा चंद्रमुखी चेहरा
केसाचा रंग सुनेहरा
हे नीळसर नीळसर डोळे
हे लक्षण असे वेगळे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
 
कथा पुराणी तुझी
जाते ऐकवीली सदाची
तुला पाहूनी मानिले
योग्य असे जे ऐकले
 
ते मुरडत मुरडत चालणे
ते जादू टोणा करणे
शतःदा मी संभाळणे
मन काबूत ते नसणे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
 
लाली सकाळच्या किरणाची
रंगीत शोभा गालावरची
संध्याकालीन  अंधाराची
जणू छाया ही केसाची
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची
 
तू तूडूंब [...]

मरण्यातही कौशल्य आहे,अगदी अतिरिक्त गोष्टी असतात तसंच.

प्रो.देसायांना थोरला भाऊ आहे हे मला हल्लीच कळलं.काल प्रो.देसाई मला म्हणाले,
“माझा थोरला भाऊ माधव काही दिवस माझ्याकडे राहायला येणार आहे.आल्यावर मी त्याला नक्कीच तळ्यावर घेऊन येतो.”
कीडकीडीत शरिरयष्टीचे,काठीचा आधार न घेता चालणारे भाऊसाहेबांचा जुळाभाऊ वाटणारे माधव, भाऊसाहेबांपेक्षा दहा वर्षानी मोठे होते.पंचायशी वर्षावर त्यांची ठणठणीत प्रकृती पाहून मी त्यांना म्हणालो,
“तुमचं वय तुम्ही सांगितल्यावर मला कळलं. नाहिपेक्षा तुम्ही [...]

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”

पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा,
“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”
(चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन)
आता मुंबईहून अमेरिकेत जाणारी  तिच होकाल मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर म्हणतो,
गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान
घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत
ते का गो,कसला ‘घो’ पान
गो चेडवा,मोटारीतून विमानात [...]

एकाच रंगातून मिळणारी भरपूर समझ-ऊन्हाचा चष्मा.

 
काही लोकांचं जीवनच दुःखदायी असतं.बरेच वेळां त्याना वाटत असतं की आपण दुःख घेऊनच जन्माला आलो आहो.माझा चुलत भाऊ गिरीश ह्याचं जीवन काहीसं असंच आहे.आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात बिचार्‍याची दहा वर्षाची मुलगी एका अपघातात गेली.त्याच्याच हलगर्जीपणामुळे वीणा गेली हे त्याच्या मनाला लागलं होतं.वीणा गेल्याचा धक्का गिरीशला एव्हडा बसला की त्याला जीवनच नकोसं झालं होतं.पण निसर्गाची गंमत [...]

कृतज्ञतेवर माझा विश्वास आहे.

आज मी व प्रो.देसाई आमच्या एका सामूहिक मित्राच्या घरी गेलो होतो.खरं तर हा आमचा मित्र आता ह्या जगात नव्हता.पण त्याची एकूलतीएक मुलगी त्या घरात राहात होती.तिलाच भेटायला म्हणून गेलो होतो.
अलिकडे आमचा हा मित्र-अनिल धायगुडे- वरचेवर आजारी पडायचा.आता वयोमानामुळे आजार येत राहणं क्रमपात्र होतं,पण अनिलला जरा जास्तच त्रास होत होता.मुळात त्याला मधूमेहाची बाधा होती.हा छूपा रोग [...]