त्यादिवशी मी दादरला एका मित्राकडे गेलो होतो.घरी परत येताना दादर स्टेशन जवळच्या दादर बुक डेपोत जाऊन नवीन पुस्तकं चाळत होतो. कवी बोरकरांच्या कवितेचा एक संग्रह घेतला.पावती देताना पावतीवर नांव काय लिहू असं मालकानी विचारल्यावर म्हणालो,
“श्रीकृष्ण सामंत”
माझ्या बाजूला एक गृहस्थ अशीच पुस्तकं चाळत असताना,माझं नांव ऐकून कुतूहलाने मला त्यांनी विचारलं,
“ते मिपामधे लिहिता ते तुम्हीच कां?”
सहाजीकच मला [...]
माझा भाऊ सुधाकर त्यादिवशी माझ्या घरी सहजच म्हणून मला भेटायला आला होता. त्याच्या बरोबर जी व्यक्ति आली होती तिला पाहून माझी स्मृती माझ्या तरूण वयात गेली. त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं.त्या हंसलेल्या त्याच्या चेहर्याकडे पाहून माझी स्मृती मला आणखी ताण द्यायला लागली.ह्यालापाहिलंय, पण कुठे ते आणि याचं नांव काय हे लक्षात येत नव्हतं.
“काय मला [...]
कोकणात खारीला-squirrel-चानी म्हणतात.हा तोंडाकडून उंदरासारखा दिसणारा प्राणी पूरा पाहिल्यास फारच मोहक वाटतो.पूर्वी परदेशात मोठ्या चान्यांच्या कातड्याच्या श्रीमंत स्त्रीया पर्स म्हणून वापरायच्या.प्रभू रामचंद्रांच्या लंकेपर्यंत सेतू बांधण्याच्या प्रयासात चानीचा वाटा होता.समुद्राच्या पाण्यात अंग भिजवून मग किनार्यावरच्या वाळूत लडबडून झाल्यावर अंगावरची वाळू पुलावर टाकायला मदत केल्याच्या प्रयत्नाबद्दल भावूक होऊन प्रभू रामचंद्रानी प्रेमाने तिच्या पाठिवरूनबोटं फिरवली. तिच ती बोटं [...]
ह्यावेळी जेव्हा मी वेंगुर्ल्याला भेट दिली तेव्हा कोळी वाड्यातल्या माझ्या जुन्या मित्रांना निक्षून भेटण्याचं ठरवलं होतं.समुद्रामार्गे बाहेरून आलेला व्यापार्यांचा माल मांडवीवर उतरवतात.ही मांडवी म्हणजे समुद्राला मिळणारी खाडीच असते.बरेचसे कोळीवाडे ह्या मांडवीच्या परिसरात विखुरलेले आहेत.
फास्कू फर्नांडीस आणि पावलू फर्नांडीस हे दोघे भाऊ माझे जुने दोस्त आहेत.फास्कू आता इंग्लंडला स्थाईक झाला आहे असं मला कुणीतरी सांगतलं होतं.निदान [...]
आज एक गंमतच झाली.ईंगळ्यांची यमी आमच्या घरी बसायला आली होती.तशी यमी मला लहानच.
आमच्या बालपणात कोकणात मृगनक्षत्रात पावसाच्यापहिल्या सरीत बाहेर अंगणात जाऊन पावसात न्हाऊन घ्यायची आमच्यात चढाओढ असायची.
“सर्वांत प्रथम तू सुरवात करायचीस होना यमे?”
असा मी प्रश्न केल्यावर यमी म्हणाली,
“हो एकदा मला आठवतं माझ्या अंगात एक ताप होता.ते ढगांचं गडगडणं,विजांचं चमकणं,पाहून मला अंथरूणात पडून रहायला कसंसंच वाटत [...]
“ते २००६ साल होतं.मी निवृत्त झालो होतो.निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा हा माझ्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता.हा प्रश्न मला एक आव्हान होतं.तशी आता पर्यंतच्या जीवनात मी अनेक आव्हानं स्विकारली आणि त्यातून बाहेर पण पडलो. पण हे आव्हान जरा जबरी होतं.मला हवी तशी आणि मला जरूरी आहे तशी एकही गोष्ट लक्षात येत नव्हती.मुंबईला माझ्या घरात [...]
अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता.
मी त्याला म्हणालो,
“अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?”
मला म्हणाला,
“तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधंघ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax [...]
बरेच वर्षानी मी माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आजगांवला जायला निघालो होतो.आजगांवला वेंगुर्ल्याच्या मार्गाने जाताना वाटेत शिरोडं लागतं.गोव्यात पण ह्याच नावाचं एक गांव आहे.ह्या शिरोड्या गावात वि.स.खांडेकर-प्रसिद्ध सिद्धहस्त लेखक,ज्ञानपीठ अवार्डचे मानकरी-राहत असायचे.वाटेत त्यांच घर लागतं.ह्या भागात येणारे टूरिस्ट वि.सं.च घर बघायला येतात.लांबून त्यांच्या घराला नमस्कार पण करतात. पण शिरोडं येण्यापूर्वी वेंगुर्ल्या मार्गे आजगांवला जायचं झाल्यास वाटेत [...]
“प्रतिसाद मनी धरोनी
कुणी लेख लिहित नसावे”
लेखांची वाचनं अनेक होत असतात.लेखांना प्रतिसाद मिळाला की लेखकाला निश्चीतच बरं वाटतं.मग तो प्रतिसाद कसाही असो.लेखन ही ज्याची त्याची निर्मिती आहे असं मला वाटतं.सर्वच वाचक लेखक नसतात,पण लेखकाला मात्र वाचक असावं लागतं.त्याशिवाय त्याला त्याच्या लेखनाच्या विषयांची कल्पना येणार नाही.मात्र एखादा उस्फुर्त लेख लिहिला जाणं निराळं.अनेक प्रसिद्ध लेखकांची वाचनं प्रचंड असतात.ही [...]
असा प्रश्न मी आज प्रो.देसायानां केला.मला खात्री होती की भाऊसाहेब मला ह्यावर काहीतरी समजावून सांगतील.थोडावेळ विचार करून मला म्हणाले,
“हा कायमस्वरूपी प्रश्न असून हा प्रश्न आपल्या अस्तित्वाबद्दल आणि आपल्या मुल्याबद्दल असलेल्या मुलभूत आकांक्षांचं ज्ञान प्रकट करतो.”
“तेच ज्ञान काय आहे हे मला तुमच्याकडून आज समजावून घ्यायचं आहे.”
असं मी म्हणताच,प्रो.देसाई म्हणाले,
“मी मला काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करीन,पण [...]