Monthly Archives: जून 2009

दुःखाचे दुसरे नामकरण

क्षणो क्षणी क्षय होते संध्या
तसेच जणू असावे हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन
तेच असे नभांगण
तिच असे ही धरती
गैर असे हे ठिकाण
का? गैर आहो आपण
अनोळखी नजेरे सम
दिसे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन
का राहू उभा ह्या वाटेवरी
ही वाटच माझी पहूडली
आपुली मन कामनाही
का?आपुल्याशी रुसली
भटक्या विहंगा सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू [...]

मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.

“हातात हात घेऊन रस्त्याच्या कडेकडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं.”
मी त्यादिवशी अरविंदाला म्हणालो,
“तुझे मी खूप लेख वाचले.मला माहित आहे की लहानपणापासून तुला लेखनाचं वेड होतं. तुझ्या त्या वह्या मी उघडून वाचल्या होत्या.तुझ्या एकदोन कथेवर आपण चर्चा पण केली होती.”
मला अरविंद म्हणाला,
“तू ज्याला वेड म्हणतोस त्याला मी प्रेम म्हणतो.वेड तेव्हड्यापुरतंच असतं पण [...]

त्या पायलटचं नांव काय?

“आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो.”
अरविंद चिटणीस ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला.सुरवाती पासून त्याला कुणालातरी शिकवायची आवड होती.वर्गात मॉनिटर म्हणून राहिल्यास मुलांना कसली ना कसली तरी गोष्ट सांगण्यात स्वारस्य घ्यायचा.माझ्या वर्गात असताना हा त्याच्या अंगचा गूण मी पाहिला होता.
आमचे क्लासटिचर नंतर [...]

ती तात्या अभ्यंकरांची भयंकर ओळ.

“बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!”
 आई आणि मुलांत जसे भावबंध असतात, तसे बाप मुलांत का निर्माण होत नाहीत. बापाबद्दल कायम भीती का वाटत राहाते?
 त्याचं काय झालं मंडळी,सौ. अनुराधा सचिन म्हापणकर ह्यांनी ही खालील सुंदर कविता लिहिलेली माझ्या वाचनात आली,
आज तू आमचं सारं ऋण फेडलंस..
वा.. बेटा .. वा..!!
आज तू आमचं [...]

लहान लहान विचार.

लहानपणी आम्ही मुंबईहून न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आंबे,गरे,बोंडू खाण्यासाठी आणि विश्रांती आणि मजा मारण्यासाठी जात असूं.
आता संसाराच्या रग्याड्यात,तसंच ऑफिसच्या कामाच्या व्यापात कोकणातल्या आमच्या खेपा त्यामानाने कमीच झाल्या आहेत.
पण कधी कधी उलटं होतं.अलीकडे कोकणातून उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची मित्रमंडळी आणि नातेवाईक मुंबईला येतात.त्यांना मुंबईला येऊन मजा करायची असते. हल्ली कोकणात पैशाचे व्यवहार वाढल्याने आणि धंदापाणी करण्याचं [...]

मोटरसायकलसाठी रदबदली.

काल प्रो.देसायांचा नातू माझ्या जवळ येऊन आजोबांची तक्रार करीत होता.कारण काय तर त्याला मोटासायकल घ्यायची आहे आणि कसंतरी त्याने आपल्या आईबाबांना समजूतीने पटवून दिलं.पण त्याचे आईबाबा म्हणाले की आजोबांचा होकार मिळे पर्यंत काही खरं नाही.
मला म्हणाला,
“काका,तुम्ही जर का आजोबांची समजूत घातली तरंच हे शक्य आहे.कारण तुमचं ते कसंतरी ऐकतात.”
मी त्याला म्हणालो,
“बाबारे,असल्याबाबतीत ते माझं कसं ऐकतील? [...]

प्रोफेसरांचा लेख आणि माझी लेट प्रतिक्रिया

“जेणूं काम तेणूंच थाय
बीजा करे तो गोता खाय”
(मंडळी,हे आमचे नेहमीचे प्रो.देसाई नव्हेत.)
मला आठवतं तो १९४० चा काळ होता मी सात वर्षाचा होतो.
त्या दिवसात मराठीत बिगरी,पहिली,दुसरी, तिसरी आणि चौथी झाल्यावर, इंग्रजी १ली ते ७वी म्हणजे मॅट्रिकची परिक्षा.म्हणजेच आता १२वीतून कॉलेजात जातो तसं होतं. माझ्यात आणि माझ्या थोरल्या भावात दहा वर्षांचा फरक होता.”फरक होता” म्हणायचं कारण  माझा [...]

दुःखाचे दुसरे नामकरण

क्षणो क्षणी क्षय होते संध्या
तसेच जणू असावे हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन
तेच असे नभांगण
तिच असे ही धरती
गैर असे हे ठिकाण
का? गैर आहो आपण
अनोळखी नजेरे सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू असावे हे जीवन
का राहू उभा ह्या वाटेवरी
ही वाटच माझी पहूडली
आपुली मन कामनाही
का?आपुल्याशी रुसली
भटक्या विहंगा सम
असे का हे जीवन
दुःखाचे दुसरे नामकरण
तसेच जणू [...]

समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.

वनिता शर्मा माझ्या मुलीची शाळकरी मैत्रीण.कॉलेज संपून नंतर लग्न झाल्यावर ह्या मैत्रीणी आपआपल्या निर्माण केलेल्या जगात संसार करायला निघून गेल्या.पण पृथ्वी गोल आहे आणि जग लहान होत चालंय.परवां तिच्या ह्या मैत्रीणीचा फोन आला.घरी मी एकटाच होतो.माझ्या मुलीची तिने चौकशी केली.
कुणीतरी तिला पत्ता आणि फोन नंबर दिला होता. मी तिला म्हणालो,
” तू एक दिवस आमच्या घरी [...]

नका देवू कुणी दोष मला

अंग तुझे चंदनासम
नजर तुझी चंचल
हळुच तुझे खुदकन हंसणे
नका देवू कुणी दोष मला
झालो जर मी हिचा दिवाना
तुझी देहयष्टी भावलेली
तुझे नयन काजळलेले
सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरती
लाल निखारे ओठावरती
पडे कुणावरी तुझी छाया
दुःख मनातले जाईल वाया
तू सुंदर तनाची सुंदर मनाची
मुर्ती असे तुझी सुंदरतेची
वाण असो कुणा कदापी 
परि जरुरी आज मला तुझी
केव्हाचा असे मी बेचैनलेला
नको बेचैन करू तू आता मला
 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे [...]