Monthly Archives: जुलै 2009

अन सारखा जीव माझा धडधडतो

रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो
त्याच्या कोमल किरणामधे तुला मी पहातो
अन सारखा जीव माझा धडधडतो
रात्रीचा तळहातावरी चंद्रमा झगमगतो
आलीस तू कोणीकडूनी जातीस तू कुणीकडे
विचार करीतो मी व्याकुळतेने
तू जणूं चंद्रमुखी अन कचपाश जणूं रजनी
जागवीले मला तुझ्या अभिलाषेने
नेत्रावर माझ्या नशेचा असर होतो
रात्रीच्या तळहातावरी चंद्रमा झगमगतो
एकान्ती माझ्या अन उदास मी असतां
दाखवीसी दिखावट तुझी
चिंता करितो आहेस तू खरोखरी
का फक्त असे परछाई तुझी
तुटलेल्या [...]

मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो.

“जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते.”
अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती. मला त्यांच्या कविता फारच आवडतात.आशा,लता आणि हृदयनाथानी गायिलेली गाणी तर अप्रतिम आहेत.त्यांच्या कवितेच पुस्तक प्रो.देसायानी त्यांच्याकडे आहे असं मला कधीतरी सांगितल्याचं [...]

आज मला असे का भासले?

आज असे मला भासले
अघडीत घडण्या सरसावले
आज असे ही मला भासले
मन माझे कुठेतरी हरवले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास का थांबले
झोपेतूनी का खडबडले
आज मला असे का भासले?
 
चेहरा करी कुणाच्या नजरेची छाननी
कुणी आता रोजच येई स्वप्नी
नव्या ऋतूमधे लालसा येई मनी
भ्रमर गुंजन करी फुला भोवती फिरूनी
आज असे मला भासले
मन माझे नशेमधे डुबले
आज असे ही मला भासले
शुद्धितूनी मी कुठेतरी विसावले
अन्यथा
चीत्त का धडधडले
श्वास [...]

“बट-शेवंतीची फुलझाडं.”

दादा कर्णिक रेल्वेत ऑडीटर म्हणून काम करून रेल्वेतूनच निवृत्त झाले.एक दिवशी मला भेटायला म्हणून माझ्या घरी आले होते.ऑडीटरचं मुळ काम म्हणजे हिशोब चोख तपासायचे,  आणि त्यात काही गफलत दिसली तर ती मॅनेजमेन्टच्या नजरेस आणायची.
मी कर्णिकांना म्हणालो,
“हिशोबातली वास्तविकता पडताळून पहात राहिल्याने खर्‍या आयुष्यात पण त्याच दृष्टीने पहाण्याची तुम्हाला संवय झाली असेल नाही काय?”
मला दादा कर्णिक म्हणाले,
“गेल्या [...]

सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आणि रात्री सूर्यास्ताबरोबर झोपावं.

गेली तीस-पस्तिस वर्षं भाई नेरूरकर एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत.रोज पहाटे पांचला ऊठून दिवसाची सुरवात करायचे ते रात्री सर्व कामं आटपून झोपायला त्यांना अकरा वाजायचे.आणि परत दुसरा दिवस उजाडल्यावर परत तेच.
समाजातले सर्वच जण असंच करतात म्हणा.
भाई नेरूरकाराना मी म्हणालो,
“मला नेहमीच वाटतं की सकाळी सूर्योदय झाला की उठावं आणि सूर्यास्त झाला की झोपी जावं.ह्या [...]

माणसाच्या ज्ञानाला मर्यादा.

“माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो.”
आज बाहेर फारच उष्मा होत असल्याने मी प्रो.देसायांना म्हणालो,
“भाऊसाहेब आज तळ्यावर जाण्याचं रद्द करून आपण इथे आमच्याच घरी चर्चा करूंया”
“तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.अहो, मी तुमच्या घरी येईपर्य़ंत मला इतकं गरम झालं की सहन [...]

दे वचन ह्या चंद्रमा समोर मला

दे वचन ह्या चंद्रमा समोर मला
ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला
दे हातात हात अलगद तुझा जरा
मिळेल आधार अपुल्या प्रीतिला खरा
 
हा चंद्रमा हे तारे छपतील ढगाआड
नाही ना तू छपणार माझ्या नजरेआड
बदलो दुनिया ना बदले अपुली प्रीती
राहू वचनबद्ध करूनी प्रीतिची स्वीकृति
 
दे वचन ह्या चंद्रमा समोर मला
ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला
 
रमणीय छायेत घेऊया हिंदोळे
विस्मरूनी दुःख जीवनातले सगळे
दुनियेतल्या दुःखाची काळजी कसली
करूनी प्राप्त [...]

देवा! मला रोज एक नवी चूक करू दे!

“म्हणजे त्या चुकेतून माझी सुधारणा होईल.कारण चूकच केली नाही तर सुधरायचं कसं?”
“जेव्हा पासून मी माझ्या आईवडीलाना मला एक मुलगी पसंत आहे आणि मी तिच्याशी लग्न करायचा विचार करतोय असं सांगितलं त्यापासून त्यांच्याकडून उपदेशाचा माझ्यावर सतत भडिमार होत राहिला.जास्त करून माझ्या वडीलांकडून उपदेश जास्त येत होता.मी आणि ते एकदा एका रात्री जवळ बसून त्यांनी जे मला [...]

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा

आज बे-एरियात अत्युतम हवा पडली होती.७०-७२ डि.-म्हणजे २१-२२ डि.सेंटीग्रेड- तापमान भर दुपारच्या उन्हात वाटायचं.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पॅसिफिक ओशन- निसर्गाचा एअरकंडिशनर- फुल-स्विंग मधे चालत होता.मिशन हिलच्या शिखरावर हायकिंग करीत जाऊन शिखरावरच्या ट्रान्समिशन लाईनच्या टॉवरावरच्या सिमेन्टच्या चौथुर्‍यावर बसून निसर्गाचा आनंद घ्यायची सकाळीच माझ्या मनात हुक्की आली होती.नेहमी प्रमाणे आयपॉड घेऊन कानाला इयरबड्स लावून मराठी गाण्यांची मेजवानी [...]

” मित्र हवा असल्यास एकच मार्ग आहे कुणाचा मित्र झालं पाहिजे.”

“मला वाटतं, लोक जोपर्यंत त्यांना जे वाटतं ते कसलीच भिडभाड न ठेवता बोलूं शकले तर  त्यांना भविष्याबद्दल आशावादि राहायला काहीच हरकत नसावी.”
माझ्या आईच्या जून्या घराची डागडूजी करायला मला माझ्या गावी जावं लागलं.पैसे आहेत म्हणून सरळ कॉन्टॅक्टरला बोलवून घर दुरस्त करता येत नाही.हे मला गांवात गेल्यानंतर कळलं.म्युनिसिपालिटीची परवानगी असावी लागते.प्लान पास करून घ्यावा लागतो.वगैरे वगैरे.मी घेतलेल्या [...]