सप्टेंबर 30, 2009 – 10:06 pm
(अनुवादीत. दो नैनों में आंसू भरे है..)
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी
अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत
जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र
अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र
भरावी नीज कशी कळेना मात्र
कशी सामावू नीज माझ्या नयनी
दोन्ही माझे नेत्र [...]
सप्टेंबर 27, 2009 – 9:02 pm
(रिम-झिम गीरे सावन … मंझील)
ती….
बरसतो श्रावण रिम-झिम रिम-झिम
आनंदे उल्हासित होते माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन
बरसत होता घन हा असाच जेव्हा
भिजला होता पदर हा असाच तेव्हा
सांगशील सजणा का होते असे अजून
होते आनंदे उल्हासित माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
अशाचवेळी श्रावण देई दाह निराळा
अशाचवेळी आसमंत दिसे फार वेगळा
तृप्त वारा वाहे [...]
सप्टेंबर 24, 2009 – 9:31 pm
आता पर्यंत अमेरिकेत सोन्याचा धूर जळत होता.साधारण २००७ पासून सर्व धूर जळून गेला.अमेरिकन कफल्लक झाला.आणि त्याला तोच जबाबदार आहे. त्याची हांव,ग्रीड,नडली. आहे त्यापेक्षा अधिक हवं,दोन माणसांना पाच बेडरूमचंघर हवंच. मॉलमधे जायचं, दिसेल ते खरेदी करायचं, आणि घरी आणायचं.कालांतराने ते अर्धवट वापरून किंवा न वापरूनघरात झालेल्या वेअरहाऊसमधे दामटून टाकायचं.कां तर अमेरिकन एकॉनॉमी “अर्न ऍन्ड स्पेन्ड” वर [...]
सप्टेंबर 19, 2009 – 9:18 सकाळी
माझा मित्र रघुनाथ खाडिलकर अगदी सुरवातीपासून बेफिकीर वृत्तिचा पण तोलूनमोजून निर्णय घेणारा असा होता.
काल त्याची आणि माझी गाठ एका सायन्स सेमिनारमधे पडली.
“अरे,परत तू ह्या विषयात भाग घ्यायला सुरवात कशी केलीस.तू तर सर्व सोडून जवळ जवळ संन्यास घेतलास असं मला मागे भेटला होतास त्यावेळी म्हणाला होतास ते मला आठवलं.सोन्यासारखी कंपनी सोडून तू कसलंच काम न करण्याचा [...]
सप्टेंबर 16, 2009 – 6:19 pm
“जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून मी बराच प्रभावित होतो.”
कमलाकर धारणकर हा माझा शाळकरी दोस्त.आपल्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.म्हणून लाडावलेला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशार आणि शिस्त बाळगून होता.हे गुण त्याच्या अंगात उपजतच आले होते.कधी कधी आम्ही भेटलो की बालपणाच्या आठवणी काढून गप्पा मारतो.आणि आता ह्या [...]
सप्टेंबर 13, 2009 – 10:54 सकाळी
ती…
हाव भाव माझे असु देत माझे अनुमान
का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान
सुंदर ललना चर्चाकरूनी देती मला अग्रस्थान
का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान
तो…
अरण्यातल्या वृक्षावरचा मी आहे पक्षी
प्रेमामधल्या गुजगोष्टीचा मी आहे साक्षी
मस्तकी प्रीतिचा चंद्रमा आहे विराजमान
का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान
ती…
फुलांवरचा भ्रमर तू आहेस खरा सौदागर
जाणून आहे मी तुझाच सर्व कारभार
कसा समजू प्रेमी तुला [...]
सप्टेंबर 10, 2009 – 6:30 pm
“मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं ह्या विषयावर लिहित असते.”
कमला पेंडसे यांचे बरेचसे लेख मी काही मासिकात वाचले आहेत.निरनीराळ्या विषयावरचे त्यांचे लेख वाचायला मला आवडतं.कधी तरी त्यांना प्रत्यक्ष भेटून हे विषय त्यांना कसे सुचतात म्हणून विचारावं असं माझ्या मनात नेहमी यायचं.
माझा मित्र नाना पेंडसे ह्याला मी एक दिवस सहज विचारलं,
“काय [...]
सप्टेंबर 6, 2009 – 6:18 pm
“मी कुणालाही सर्व दुःख विसरून पुढे चला असं सल्ला देत नाही.कुणालाही तुमच्या वागणुकीत आता बदलाव आणा असं सांगत नाही.किंवा तुमच्या लक्षात येत असेल ते दुःख् दूर ठेवा असंही सांगत नाही.कारण दुःखाला त्याचा समय दिला गेला पाहिजे. असं मला वाटतं.”
मी आणि माझी पत्नी बरेच दिवसानी गोव्याला गेलो होतो,माझ्या वहिनीचं माहेर गोव्याचं.माझ्या लहानपणी मी तिच्याबरोबर गोव्याला जायचो.त्यांच्या [...]
सप्टेंबर 3, 2009 – 6:03 pm
विभा आणि तिचा नवरा ज्ञानेश कर्णिक हे जोडपं त्यावेळी अंधेरी वेस्टला सातबंगल्याला रहात होतं.सातबंगल्याच्या फिशरीज इन्स्टिट्युटमधे ज्ञानेश रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत असायचा.जवळच्या एका बिल्डिंगमधे तेराव्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट होता.माझी त्यांची ओळख वर्सोवाच्या चौपाटीवर सकाळीच फिरायला जात असताना झाली.विभाला त्यावेळी दोन लहान मुलं होती.आणि विभा जवळच्या वर्सोवा वेल्फेअर शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची.ही मंडळी आंध्रप्रदेश [...]