Monthly Archives: ऑक्टोबर 2009

“अमृताहूनी गोड नाम तुझे आंबा”..देवगडचा हापूस आंबा.

मे महिन्याचे दिवस होते.उष्मा मी म्हणत होता.कोकणातून माझ्या मामाने मला देवगड हापूस आंब्याची एक पेटी पाठवली होती.त्या हापूस आंब्याचावास माझ्या घरभर दरावळला होता.आंबे पुर्णपणे पिकले आहेत हे वासाने ते आंबे आपल्याला समज देतात.अंमळ फ्रेश हवा घ्यावी म्हणून मीआमच्या बाल्कनीत आलो. समोरच्या बसस्टॉपवर मला राजेंद्र उभा असलेला दिसला.बहुदा तो बसची वाट पहात असावा.मला हाताने खूणावून येईन [...]

“गाथनी होयेत गेsss?”

“मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेऊंया”.. इती भाग्यश्री.
चेरापुंजी नंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळा कभिन्न काळोख,काळे कुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला मजबूर करायचे.त्यातच [...]

पदकमली आपल्या लागेल रहावे

लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
रोष करूनी जगले ते जीवन कसले
दोष अनेक घेतले अन दोष दिले
यापुढे मात्र नसेल काहीही सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
आपल्या प्रीतिची साथ आहे अमुच्या मनी
आपल्या दुःखाची व्यथा आहे अमुच्या जीवनी
यापुढे आपणा न लागो दुःखाला सहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com

प्रेम काय आहे ते आता मला कळलं.

.”प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो” इती मकरंद
धाके कॉलनीतून लिंकरोडवर येऊन जुहूच्या दिशेने जात गेल्यास,अमिताभच्या बंगल्यावर उजव्या गल्लीत वळून पुढे जात गेल्यास हेमामालिनीचा बंगला लागतो,  ती गल्ली संपता संपता आडवा रस्ता येतो तो जुहू चौपाटीला समांतर जातो.ह्या रस्त्यावर पेट्रोलपंपाच्या समोर आजगांवकरांचा बंगला आहे.
मी घरून रोज जुहूवर सकाळीच चालत जायचो.त्यादिवसात अगदी [...]

पंढरीचा विठोबा…ओबामा.माझा प्रेसिडेन्ट भाग चवथा.शेवटचा.

अमेरिकन निवडणूकीत दोन्ही पार्टीचे उमेदवार प्रेसिडेन्टच्या अखेरच्या निवडणूकीसाठी निवडून आले की त्यांची नोव्हेंबरच्या अखेरच्या निवडणूकी पुर्वी तिन,चार डिबेट्स होतात.ही डिबेट्स न्युझमिडीयाचे लोक घडवून आणतात.प्रत्येक डिबेटला लाखो अमेरिकन फार महत्व देतात.सुरवातीला जरी टिव्हीवर तेव्हडी गर्दी नसली तरी शेवटच्या डिबेटला खच्चून गर्दी करून लोक प्रतिसाद देतात.
ओबामा आणि मेकेनच्या डिबेटमधे पहिल्या पासून ओबामाचीच सरशी होती. ओबामा बोलायला फाकडा [...]

पंढरीचा विठोबा…ओबामा.माझा प्रेसिडेन्ट. भाग तिसरा.

एक स्पष्टीकरण….
आम्ही हे लिहित आहो हे आमच्या विचारान्वये करीत आहो.ओबामा विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही.आम्ही रिप किंवा डेमोपार्टीचे नाही.इंडीपेन्डट आहो.उद्या डेमो पार्टीचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार. कुणाच्याही अंगातले चांगले गुण आम्हाला भावले तर सहाजीक आमचे मन आम्ही उघडे करतो.ह्यात कुणीही परसनल घेऊ नये.
कृपाकरून लेख वाचून आनंद घ्यावा.हिच वाचकाना विनंती आहे……
जॉन [...]

पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग दुसरा.

 
“माझ्या वाचकाना दिवाळीच्या शुभेच्छा”
सत्तरी ओलांडलेला बुड्डा जॉन मेकेन यापूर्वी दोनदा प्रेसिडेन्ट होण्यासाठी असफल प्रयत्न करून थकला होता.रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीच्या चढाओढीत मेकेन अगदी नगणतीत होता.पण निवडणुकीचे वारे कसे फिरतील हे सांगणं कठीण. व्हीएटनाम युद्धात ऍट्याक पायलटचं काम करीत असता युद्धकैदी म्हणून पाच एक वर्ष व्हीऍटनाममधे तुरंगात होता.कैद्याला टॉर्चर कसं करतात ते त्याने चांगलंच अनुभवलं होतं.त्याचे वडील [...]

पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग पहिला

“आज ओबामाने व्हाईटहाऊसवर दिवे,पणत्या लावून दिवाळी साजरी केली.”
एका वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन सांगायचं तर,
“धर्म संस्थापना्र्थाय संभवा मी युगे युगे”
हे म्हणणं खरं करण्यासाठी ह्या “पंढरीच्या विठ्ठलाने ” -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय.
रि.प पक्षाच्या शंभर कौरवानी गेली आठ वर्ष अमेरिकेत आणि जगात धुमाकूळ घालून मनुष्यधर्म बुडवला.बुशरूपी दुर्योधनाने इराकच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करून लाखो [...]

माझे 125 वर्षाचे आजोबा.

 
“कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही.”
आज माझे आजोबा जीवंत असते तर ते 125 वर्षाचे असते.माझ्या दहाव्या वर्षी ते गेले.त्यावेळी ते साठ वर्षाचे होते.त्यावेळी माणसाला आयुर्मान कमीच असायचं.
माझ्या आजोबांवर माझं खूप प्रेम होतं.आणि त्यांचं प्रेम आम्हा सर्व नातवंडावर [...]

विसरशील मला अखेर का रे?

 
उंच उंच गगनात नेऊनी मजला
पुन्हा धरतीवर फेकणार का रे?
विराजूनी तुझ्या हृदयामधे
विसरशील मला अखेर का रे?
आजच्या रात्री ह्याच समयी
गगनात चमकती चांदण्या हजारो
एक एक चांदणी उचकून गगानातून
उधळीन सार्‍या कुणाच्या नजरेवर
ही रंगीत स्वप्ने अपुली असता
रंगवूनी ती भंगणार का रे?
संगतीत तुझ्या राहून सखया
जाऊ अपुल्या लक्षाकडे
जर साथ तू देशील मजला
लक्ष चालून येईल अपुल्याकडे
निश्चिंत माझे मन असता सखया
धोका तू मजला देणार [...]