माझ्या बद्दल थोडं
मी कॅलिफोरनीया मधे स्थाईक झालो आहे.मी माझी पत्नी कुंदा आणि दोन मुलं यांच्या सोबत रहातो.
आता निवृतीच्या जीवनात आयुष्यातले अनुभव,आणि वाचनात आलेले ईतरांचे अनुभव याचा संग्रह आठवणीत आणून तो “कृष्ण ऊवाच” म्हणून लेखात,कवितेत,विचार, चर्चा,वर्णन,टिका आणि गम्मत म्हणून,ह्या Blog मधे लिहून ईतरांशी जणू हितगूज केल्याचे समाधान मिळेल या आशाने केलेला एक प्रयत्न.
श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)

shrikrishna samant said,
January 8, 2007 at 12:34 am
I am an ordinary citizen of usa and my original country is India.
I am retired and like to spend my time in peace
I like to write poems and some short stories and some experince of life.
वाचून बघा said,
March 20, 2008 at 10:33 am
नमस्कार !
आपला ब्लॉग ज़रा उशीराच गवसला, अर्थात नुकसान आमचंच आहे ! थोडं फार वाचलं ते बहुतेक आवडलं , यथावकाश इथे भेटी होतीलच . अनुवादित गीतांबरोबर मूल रचनांचा उल्लेख केलात तर बरं होईलसं वाटतं.
कृपया असंच लिहित रहावे, शुभेच्छा !
प्रा.डॊ.दिलीप बिरुटे said,
May 4, 2008 at 2:23 am
नमस्कार,
आम्हालाही आपल्या अनुदिनीवर यायला जरा उशीरच झाला.
उत्तम लेखन वाचण्यासाठी इथे नियमित यावेच लागणार आहे.
पुढील लेखनासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच !!!
shrikrishnasamant said,
May 4, 2008 at 10:08 am
नमस्कार,
आपल्या दोघांच्या comments वाचल्या.आपल्याला माझा blog वाचायला आवडला हे वाचून बरं वाटलं.
“अर्थात नुकसान आमचेच आहे! ”
आणि
“आम्हालाही आपल्या अनुदिनीवर यायला जरा उशीरच झाला.
उत्तम लेखन वाचण्यासाठी इथे नियमित यावेच लागणार आहे.”
असं आपण म्हणणं हा आपला मोठेपणा आहे आणि माझा आदर आहे,आणि त्याबद्दल आभार.
आपला अनुवादित गीताबद्दलचा विचार वाचला.आपली सुचना चांगली आहे.आणि सुचना अंमलात आणण्यापुर्वी research म्हणून आपल्याला कांही प्रश्न विचारावेसे वाटतात.
१ मूळ रचनांचा उल्लेख केल्यावर अनुवादित रचनेचा charm कमी होईल असं आपल्याला नाही का वाटत?
२ काही प्रसिद्ध रचनेची आठवण,अनुवादित रचना वाचताना कळत नकळत होत राहीली तर मजा नाही का येणार?
उदा.
“हा चंद्रमुखी चेहरा
केसाचा रंग सुनेहरा
हे नीळसर नीळसर डोळे
हे लक्षण असे वेगळे
तारिफ करू का त्याची
कलाकृती ही ज्याची”
ही माझी अनुवादित रचना आपण वाचून पहावी.हे कोणते मूळ गाणे आहे हे आपले आपल्याला समजल्यावर (हुडकून काढल्यावर) नक्कीच आनंद होईल असं मला वाटतं.
“काश्मीर की कली”ह्या चित्रपटातलं गाणं
“तारीफ करूं का उसकी,
जिसने तुम्हे बनाया”
हे उदाहरण म्हणून देतो.
“ये चांदसा मुखडा तेरा
ये जुल्फोका रंग सुनहरा
ये नीली नीली आंखें …..वगैर,वगैरे.
काही गाणी तितकी प्रसिद्ध नसतात त्यामुळे मूळ रचना देवून वाचकाचा (अनुवादित) कविता वाचतानाचा आनंद फिका पडतो असं मला वाटतं.
“यादे माझी आहेत तुझ्याजवळी
श्रावणमासी ओलेते दिवस मात्र
अन माझ्या कोऱ्या कागदावरची
लिपटलेली ती काळोखी रात्र
जा विसरून ती यादे या क्षणी
अन परतव माझ्या त्या आठवणी”
हा एका प्रसिद्ध गाण्याचा अनुवाद”परतव माझ्या आठवणी” असे शिर्षक असलेली माझी कविता(अनुवाद ह्या categories मधे आहे.) वाचून आपण मूळ गाणं अवश्य (हुडकून) शोधून काढा आपल्याला आनंद होईल असं मला वाटतं.आशा भोसले हे गाणं गातात आणि संगीत रचना R.D.Burman याची आहे.एव्हडीच hint देतो.
“बुगडी माझी सांडली गं
जाता सातारला”
हे गाणं कवी माडगुळकर यानी त्याचा अनुवाद
“झुमका गीरा रे
बरेलीके बाझार मे”
ह्या गाण्यावरून केला हे मला अलिकडेच कवियत्री शांता शेळके यांच्या तोंडून “नक्षत्राचे देणे”ह्या कार्यक्रमात ऐकायला मिळालं.आणि माझ्या मनात जरा फिकेपण आलंअर्थात अनुवाद म्हणजे word to word copy नसते हे आपल्याला माहित असावं ह्याची मला नक्कीच खात्री आहे.
आपली वाचनाची आवड आणि चिकीत्सा करण्याची उत्सुक्ता वाखाणनीय आहे असं मला वाटतं.
आपल्या दोघांचे फिरून एकदा आभार.
सामंत