नोव्हेंबर 23, 2009 – 7:29 pm
अनुवाद. (आँखें खुली थीँ आये थे वो भी नज़र मुझे…)
डोळे उघडे असता दिसला सजणा मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला
स्मृती हृदयामधे अन ओळख निजरेमधे
दिपकाचा प्रकाश असे स्मृतीच्या मार्गामधे
सोडून गेला तो ह्याच वळणावर मला
काय झाले तदनंतर नसे ठाऊक मला
अंधकाराशी आता माझी प्रीति जडली
नजरेला आता प्रतीक्षेची संवय जडली
न्याहाळू दे वाट तुझी जीवनभर मला
डोळे उघडे असता दिसला सजणा [...]
नोव्हेंबर 16, 2009 – 12:11 pm
(अनुवादीत. एक प्यार का नगमा है…..)
खरंतर प्रत्येकाचं जीवन हे एक कथाच असते.सागरातून येणार्या लाटेसारखा जीवन एक प्रवाह असतो.दोन पळ जीवनातून थोडं आयुष्य चोरी केल्यासारखं असतं.येणं आणि नंतर जाणं हा जीवनाचा आशय असतो.
हा तर आहे तराना प्रीतिचा
अन प्रवाह चंचल लहरीचा
काय म्हणू मी जीवनाला
आलेख तर हा अपुल्या कथेचा
मिळवूनी हरवते हरवूनी मिळते
जीवनाचा आशय येण जाणे असते
दोन पळ जीवनाची [...]
नोव्हेंबर 6, 2009 – 10:48 सकाळी
(अनुवाद. आज तुमसे दूर हो कर…)
मला वाटतं माणूस हताश परिस्थितीत निर्जीव गोष्टीना सजीव समजून त्यांची स्वतःशी न्यायसंगत सिद्ध करायला प्रवृत्त होतो.
देव,दैवावर दुषणे टाकतो.
गायक मुकेशने हे गाणं छान गायलं आहे.
जशी झालीस तू दूर दूर माझ्यापासून
तशीच रडली प्रीत माझी मुसमुसून
चंद्रमा पण रडला साथ मला देऊन
आक्रंद केला रात्रीने धाय धाय मोकलून
काही तुझे प्रतिबंध काही माझ्या सीमा
वैरी झाले जर [...]
नोव्हेंबर 2, 2009 – 10:24 सकाळी
(अनुवाद. मैने पिना सिख लिया….)
माझा मित्र वसंत फार पुर्वी पासून पितोय.वहिनीचं खूप प्रेशर आलं की मग काही दिवस प्यायचं सोडून देतो.आणि त्याचं हे असंच चालंय.परत कधीतरी प्यायला सुरवात करतो.बिचारी वहिनी मात्र ही त्याची संवय पाहून हिरमुसली होते.मला तिची किंव येते.त्या पलिकडे मी तरी काय करणार?अलीकडे त्याला कंटाळून वहिनी माहेरी जाऊन राहिली आहे.
योगायोग म्हणजे काल,
”मैने पिना [...]
ऑक्टोबर 25, 2009 – 7:31 pm
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
रोष करूनी जगले ते जीवन कसले
दोष अनेक घेतले अन दोष दिले
यापुढे मात्र नसेल काहीही सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
आपल्या प्रीतिची साथ आहे अमुच्या मनी
आपल्या दुःखाची व्यथा आहे अमुच्या जीवनी
यापुढे आपणा न लागो दुःखाला सहावे
लज्जेने तरी आज वाटते सांगावे
पदकमली आपल्या लागेल रहावे
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
shrikrishnas@gmail.com
ऑक्टोबर 11, 2009 – 4:40 pm
उंच उंच गगनात नेऊनी मजला
पुन्हा धरतीवर फेकणार का रे?
विराजूनी तुझ्या हृदयामधे
विसरशील मला अखेर का रे?
आजच्या रात्री ह्याच समयी
गगनात चमकती चांदण्या हजारो
एक एक चांदणी उचकून गगानातून
उधळीन सार्या कुणाच्या नजरेवर
ही रंगीत स्वप्ने अपुली असता
रंगवूनी ती भंगणार का रे?
संगतीत तुझ्या राहून सखया
जाऊ अपुल्या लक्षाकडे
जर साथ तू देशील मजला
लक्ष चालून येईल अपुल्याकडे
निश्चिंत माझे मन असता सखया
धोका तू मजला देणार [...]
सप्टेंबर 27, 2009 – 9:02 pm
(रिम-झिम गीरे सावन … मंझील)
ती….
बरसतो श्रावण रिम-झिम रिम-झिम
आनंदे उल्हासित होते माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
आनंदे उल्हासित होते माझे मन
बरसत होता घन हा असाच जेव्हा
भिजला होता पदर हा असाच तेव्हा
सांगशील सजणा का होते असे अजून
होते आनंदे उल्हासित माझे मन
आसमंत भिजले कसे पेटले हे रान
अशाचवेळी श्रावण देई दाह निराळा
अशाचवेळी आसमंत दिसे फार वेगळा
तृप्त वारा वाहे [...]
सप्टेंबर 13, 2009 – 10:54 सकाळी
ती…
हाव भाव माझे असु देत माझे अनुमान
का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान
सुंदर ललना चर्चाकरूनी देती मला अग्रस्थान
का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान
तो…
अरण्यातल्या वृक्षावरचा मी आहे पक्षी
प्रेमामधल्या गुजगोष्टीचा मी आहे साक्षी
मस्तकी प्रीतिचा चंद्रमा आहे विराजमान
का वाटावे इतरां आहे मी प्रेमात बेभान
ती…
फुलांवरचा भ्रमर तू आहेस खरा सौदागर
जाणून आहे मी तुझाच सर्व कारभार
कसा समजू प्रेमी तुला [...]
ऑगस्ट 14, 2009 – 6:48 सकाळी
तुला मिळवूनी मिळविले सार्या जगताला
फुलाला खुलवूनी खुलविले सार्या बगिच्याला
तू सूर्य अन मी सूर्यमुखी रे सजणा
कसा जाईल दिवस माझा तुझ्याविणा
सहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला
तुला मिळवूनी मिळविले सार्या जगताला
विलक्षण असती हे अनुबंध सजणा
बंध बांधले तुझे न माझे धाग्याविणा
हातात घेऊनी हात जाऊया फिरायला
तुला मिळवूनी मिळविले सार्या जगताला
न होवो कधीही अपुली ताटातूट रे
तू माझा दिवा तर मी तूझी वात [...]
हलवूं कशी नजर तुझ्या चेहर्यावरूनी
येऊं कसा शुद्धीवरती शुद्ध माझी हरपूनी
मेघासम कचपाशाची मेहक तुझी दरवळे
पाजती तुझी लोचने पीत राहिलो पिणे
सांगू कसे सदैव त्या कैफात राहूनी
येऊं कसा शुद्धीवरती शुद्ध माझी हरपूनी
भिती तशीच प्रीति दिसेल माझ्या नेत्रातूनी
लालसा अन मोनोकामना दिसतील निक्षूनी
छपवूं कशी ही सारी वादळे माझ्या लोचनी
हलवूं कशी नजर तुझ्या चेहर्यावरूनी
हे तीक्ष्ण कटाक्ष तुझे चंचल होऊनी
कधी रूसतील अन [...]