Category Archives: कविता

पुष्टावलेला तो उंच ऊस

माझ्या त्या (अजून आणखी एक इडंबन केलं आहे.) मधल्या “पुष्टावलेल्या ऊसाच्या” विडंबनाचा जन्म असा झाला. मुळ कवितेतल्या पहिल्या ओळीत “कोसळणारा तो धुंद पाऊस” ह्यातला “पाऊस” ह्या शब्दावरून “ऊस”हा शब्द आठवला. आणि नंतर उसाचं शेत,ऊस खेचणं, चीर काढणं,रस थेंब थेंब पडणं,हात चिकट होणं-ऊसाचा रसच तो चिकट असणार- ऊचकणं आणि ऊस म्हटल्यानंतर मुळासकट खाणं हे सगळं माझ्या [...]

मी एक क्षुल्लक फूल आहे.

नयनातून तुझ्या आलेला अश्रू समजून तू मला कां बरं ठिपकू दिलीस तुझ्या प्रेमाचा मी मोती कां बरं मातीमोल केलीस फुलबागेत न फुललेलं मी एक क्षुल्लक फूल आहे कसं असलं तरी बहरलेली मी एक भूल आहे तू मला फुलवून स्वतःच कां बरं विसरून गेलीस अश्रू समजून तू मला कां बरं ठिपकू दिलीस नजरचुकीने मी इथे आलो [...]

निःशब्द राहूनी सांगे झोपडी कहाणी.

होती ती एकच झोपडी नजर कुणाची त्यावर पडली होते त्यावर एक मोडके छ्प्पर त्यामधून दिसे आतले लक्तर उजाड आगगाडीच्या फाट्यात त्याने बांधली झोपडी थाटात नजरेला त्याच्या वाटे तो महाल ती झोपडी असेच तुम्ही म्हणाल जर असता तो त्या महालाचा राजा त्यजीला असता न करता गाजावाजा पण ओतले त्याने त्याचे त्यात सर्वस्व कसा सहन करील कुणाचे [...]

सुगंधाची धुंद.

आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा कधीतरी आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन मला आनंद देणार असं नेहमीच वाटणार्‍याला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग….. हरवलेले फूल आणून देताना जेवढा तुला आनंद झाला दुप्पटीने झाला आनंद मला फुल ते हातात घेताना सुगंध त्याचा दरवळला उजळूनी जुन्या आठवणी पाकळ्यावरचे ते थेंब दवांचे आणिती [...]

वाचक हो, तुमच्यासाठी

(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन) आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर पाच शतके लेखनाची लिहूनी अमुच्या ब्लॉगवर येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी वाचक हो, तुमच्यासाठी लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी वाचक हो, तुमच्यासाठी आराम विसरलो आम्ही आळसा मुळी [...]

दिवस ते गेले कुठे

कुणाच्या तरी आयुष्यात कधीकधी असे ही दिवस येतात की प्रश्नावर प्रश्न विचारून सुद्धा एक ही उत्तर मिळत नाही.कारण उत्तर देण्यासारखं जीवनात काही ही राहिलेलं नसतं. दिवस ते गेले कुठे सांग ना! दिवस गेले कुठे नजर सांगत होती प्रीतिच्या अनंत कथा तरूण विश्व अन नव्हत्या कसल्या व्यथा घरटे ते जळले कसे सांग ना! घरटे जळले कसे [...]

“प्रतिसाद मनी धरोनी,कुणी लेख लिहित नसावे”

“प्रतिसाद मनी धरोनी कुणी लेख लिहित नसावे” लेखांची वाचनं अनेक होत असतात.लेखांना प्रतिसाद मिळाला की लेखकाला निश्चीतच बरं वाटतं.मग तो प्रतिसाद कसाही असो.लेखन ही ज्याची त्याची निर्मिती आहे असं मला वाटतं.सर्वच वाचक लेखक नसतात,पण लेखकाला मात्र वाचक असावं लागतं.त्याशिवाय त्याला त्याच्या लेखनाच्या विषयांची कल्पना येणार नाही.मात्र एखादा उस्फुर्त लेख लिहिला जाणं निराळं.अनेक प्रसिद्ध लेखकांची वाचनं [...]

“गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान”

पूर्वी होकाल(नवरी) कोकणातून मुंबईला जाताना बंदरावरून पडावातून जाऊन आगबोटीत बसायची.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला बंदरावर म्हणायचा, “गो चेडवा,पडावातून आगबोटीत जपान” (चाल:- गो चेडवाsss, पडावाssतून आगबोटीत जपाssन) आता मुंबईहून अमेरिकेत जाणारी  तिच होकाल मोटारीतून उतरून विमानात जाऊन बसते.तिला पोहचवायला जाणारा तिचा बाप तिला विमान-तळावर म्हणतो, गो चेडवा,मोटारीतून विमानात जपान घो तुझो र्‍हंवतां बॉस्टनच्या चाळीत ते [...]

देवाने मुलींना असं का बनवलं?

(विडंबनाच्या विडंबनाचं विडंबन) प्रेरणेतून प्रेरणा मूळ कविता कुणा कवीची होती.फारच सुंदर कविता असावी. मुलीला पाहून ती आपली प्रेयसी व्हावी,असं कवीच्या मनात आलं असावं. परंतु,ती मात्र दुसर्‍यालाच निवडते असा काहीसा आशय त्या कवितेचा असावा.त्या कवितेचं विडंबन केलेली कविता माझ्या वाचनात आल्यावर,माझ्या मनात आलं की पुढे कधीतरी ती मुलगी कुणाची आई होणार मग ती आपली आई असावी [...]

तात्यांची व्यथा

  तात्यांच्या वेबसाईटवर अलिकडे खूपच सभासदत्व वाढलं आहे.इतकं म्हणाल तर तोबा तोबा. तात्यानी रोपटं लावलं आणि त्याचा प्रचंड वटवृक्ष झाला.आता वटवृक्ष झाल्यावर मैना,साळूंकी कोकिळे बरोबर गिधाडं आनि घुबडं पण त्या वटवृक्षावर येऊन बसायला लागली. तात्यांची व्यथा होती की ह्या गिधाडांना आणि घुबडांना मज्जाव कसा करायचा. तात्या म्हणाले, “ओळख द्दा आणि सभासद व्हा” असा नियम करावा [...]

Follow

Get every new post delivered to your Inbox.