दुसरी बाजू ऐकली पाहिजे

December 18, 2007 at 5:07 pm (कविता)

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

ताई म्हणे बाळूला
जावून सांगते आईला
तुच मारीलेस मला
ऐकून हे
आई म्हणे ताईला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

कोकरू म्हणे लांडग्याला
जावून सांगते मर्कटाला
तुच खाणार मला
अन
करीशी नुसता बहाणा
ऐकून हे
मर्कट  म्हणे कोकराला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

प्रवीण मारे प्रमोदला
पोलीस सांगती कोर्टाला
ऐकून हे
जज्ज सांगे कोर्टाला
दुसरी बाजू ऐकली पाहिजे

अपराधी अन निरपराधी
बाजू मांडती अपुली
आईची प्रीती
मर्कटाची भीती
अन
जज्ज्याची कार्यपद्धती
वापरूनी ते ते मध्यस्थी
अपुल्या निर्णयास येती
शेवटी
योग्य निर्णय मात्र
ठरवित असते नियती

     श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
      shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

ईज्जत

November 6, 2007 at 6:25 am (कविता)

ईज्जत

जिथे नाही कुणाला ईज्जत
तिथे जाण्यात कसली लज्जत

जीवनासाठी लागते अन्न
श्वासासाठी लागते हवा
तान्हेसाठी लागते पाणी
लाजेसाठी लागते वस्त्र
जिथे नाही कुणाला ह्याचे भान
तिथे कसाला आला सन्मान

चांगल्या वागण्याकरिता असावा सदाचार
चांगल्या निर्णयाकरिता असावा सुविचार
जिथे अति होतात आचारविचार
त्यालाच नाही का म्हणत लाचार

  श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
   shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

पडूं आजारी मौज हिच वाटे भारी

October 14, 2007 at 5:34 pm (कविता)

निरोगी मौज

पडूं आजारी
मौज हिच वाटे भारी
सेवा करणाऱ्या व्यक्तीचे
कष्ट मात्र वाढतात भारी
स्वतःची कामे ऊरकून
रुग्ण सेवा नशिबी सारी

मौजच असेल करायची
जरी सर्वांनी मिळूनी
आहे एक गुरुकिल्ली
घ्यावी सर्वांनी समजूनी

खाणे,पिणे अन जेवण्याची
असावी हेल्धी स्टाईल
व्यायामाची संवय ठेवून
म्हणावे असाच दिवस जाईल
विश्रांतीची आवशक्यता
विसरून कसे चालेल

करून हे एव्हडे सारे
कुणी पडे आजारी
सेवेचे कर्तव्य वाटे न्यारे

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
           shrikrishnas@gmail.com                  

Permalink No Comments

बालपणाची याद

September 28, 2007 at 2:52 am (कविता)

बालपणाची याद

फिरून आली मला याद
त्या निघून गेलेल्या जमान्याची
त्या माझ्या बालपणाची
अरेरे,एकटेच सोडून जाणाऱ्या
अन पुन्हा कधीच
न येणाऱ्या त्या बालपणाची

ते लुटुपुटुचे खेळणे
ते लुटुपुटुचे संवगडी
ते धावत पळून जाणे
अन शीव मला असे ओरडणे
विसरपडेना अजुनही
त्या सुखदेयी स्वप्नाची
त्या आनंददायी बालपणाची
फिरून आली मला याद
पुन्हा कधीच न येणाऱ्या त्या बालपणाची

सर्वांनाच ते आठवेल असे नाही
ते काही दोन दिवसाचे क्षण नाही
कठीण आहे खुपच इतके काही सोपे नाही
विसरून जाणे प्रेम त्या चित्तचोर बालपणाचे
फिरून आली मला याद
पुन्हा कधीच न येणाऱ्या त्या बालपणाची

रडावे जमून अन पुन्हा आठवून
त्या गतदिवसांच्या बालपणाची
काश मिळेल का एखादा
जुना संवंगडी बालपणाचा
फिरून आली मला याद
त्या निघून गेलेल्या जमान्याची
त्या बालपणाची

                        श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
                                 shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

मागे वळून पाहता

September 22, 2007 at 6:22 pm (कविता)

मरण मला पाहून हंसले

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय  कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता

असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून तो गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील

खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम

जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य

                श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
                      shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

उद्वेग विसरून कसं चालेल?

July 29, 2007 at 6:26 pm (कविता)

उद्वेग विसरून कसं चालेल?

आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात

मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?

कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?

अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणाऱ्याला
विसरून कसं चालेल?

गेले ते गेले
आणि राहीलेले पण जाणार
असे म्हणताना
आपण पण राहील्यातले आहो
हे विसरून कसं चालेल?

जो तो आपल्या अक्कलेने बोलतो
पण मग अक्कलच गहाण ठेवली
तर मग
मुर्खपणाचं बोलणं होतं
हे विसरून कसं चालेल?

लहानानी मोठ्यासारखं वागावं
अन
मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं
पण मग

मोठेच लहानासारखे वागले
तर मग
मोठेपणाचे महत्व
विसरून कसं चालेल?

शेवटी काय?

जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?

       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

अळकुळी तनु

July 28, 2007 at 4:10 am (कविता)

सकाळी तनुली माझ्या स्वपनात आली.मला म्हणाली ” आजा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे”. तिच्या आईशी झालेला संवाद असा होता.

weekend दिवशी
चिमुकली तनुली
आईला म्हणाली
weekdays दिवशी
असता मी सकाळी उठलेली
पाहुन तुला घरात नसलेली
होई मी किंचीत अळकुळी

मग
घेई मज आज्जी जवळी
पाहुनी माझ्या डोळी
म्हणे मला ती
“नको होवू तू अळकुळी
तुजसम तुझी आई असता
अशीच घेही मी पण
जवळी तिला त्यावेळी
पण जवळी असे मी
तिच्या वेळी अवेळी”

“पक्षिण उडे आकाशी
परी लक्ष असे पिल्लाशी
आहे ना मी तुझ्या जवळी
मग का होतेस तू  अळकुळी
येइल तुझी आई संध्याकाळी”

      श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Permalink No Comments

लफंगा भूंगा

July 20, 2007 at 1:38 am (कविता)

रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर गुणगुण
 करणाऱ्या भुंग्याला पाहून मनात आलं की एखाद्या लफंग्याला
(पी यु एन “पन” ईज ए कोईन्सीडन्स बरं का!)
जसं ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाण्याची मौज वाटते तसंच ह्या भुंग्याला
 पण एका फूलावरून दुसऱ्या फूलावर जाऊन गुंजन करावं असं वाटत असणार
त्या विचारातून आलेली
 कल्पना कवितेच्या माध्यमातून.

लफंगा भूंगा

रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर
जाई हा बिचारा भूंगा
गुंजन करुनी काय सांगे कळ्याना
हा बावरा लफंगा

देइ का हा कुणाचा निरोप
का ठेवी  हा कुणाची खूण
गुंजन करूनी काय सांगे कळ्याना
हा बिचारा भूंगा 

देइ का हा गतऋतुची याद
का सांगे काही पुराणी बात
असेल कसली पुराणी कथा
का दूसरी कसली व्यथा
गुंजन करुनी काय सांगे
हा बिचारा भूंगा

आठवे हा कसले पुराणे वचन
आली असेल ह्याला कसली स्फुर्ती
करावया त्याचीच वचनपुर्ती

रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर
जाई हा बिचारा भूंगा
गुंजन करुनी काय सांगे कळ्याना
हा बावरा लफंगा

            श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com
 

Permalink 1 Comment

दूर तूं परी जवळी तुझ्या मी

July 8, 2007 at 11:17 pm (कविता)

सेल फोनचा अलिकडे इतका वापर होत आहे की आपल्याला हवं असलेल माणूस केव्हांही आणि कुठेही
 आपल्या संपर्कात आणू शकतो.
त्यामुळे कुठलीही व्यक्ती दूर जरी असली तरी ती ह्या सेलफोनमुळे जवळच असते.
हे लक्शात आल्यावर “माझा होशील का” ह्या गाण्यातल्या दोन ओळी चटकन मनात आल्या.
“दूर तू परी, जवळी तुझ्या मी नाम गुंफीते, तुझीया नामी”आणि त्यानंतर
 ”दूर तू परी, जवळी तुझ्या मी” हे जणू सेल्फोनचे दुसरे नांव आहे असे मनात येऊन ही कविता सुचली.

ओळखा पाहूं!

घणघणलो की मजं
मग  जवळी घेशी
अन म्हणशी तिला
माझ्या कानाशी
“दूर तू परी
जवळी तुझ्या मी”
वदते ती मग
तुझीया कानी
“नांव गुंफीते
तुझीया नामी”

करूं किती मी
तुमची मध्यस्थी
आणुनी तुम्हा
एकमेकां जवळी

पुसतां तुम्ही मला
असे मी कोण?
नाही का? म्हणता
तुम्हीच मला “सेलफोन”

   श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com
 

Permalink No Comments

छळकुटा देव

June 29, 2007 at 6:16 pm (कविता)

छळकुटा देव

तानुलीला खेळता खेळता पडून  हाताला दुखापत झाली.त्याच हातावर ती परत पडली.
शेवटी तिचा हात प्लास्टर मधे ठेवावा लागला.हे तिला सर्व नवीनच होतं.
तिन आठवडे हात प्लास्टरमधे असणार हे तानुलीला खरंच वाटत नव्हतं.
एका जाग्यावर निमुट न बसाणारी तानु,सतत बागेत फुलांबरोबर स्वगत करणारी
 तानु,हिरमुसली होवून बसलेली पाहून खालील कविता सुचली.

छळकुता देव

किती छळसी रे तू देवा
का करिसी तानुलीचा हेवा?
करिते ती सर्वांची सेवा
का पाडीसी तिला पुन्हा पुन्हा
कसली शिक्षा
अन कसला गुन्हा

बागेत बागडणारी
ती तानुली
फुलाना खुडणारी
ती तानुली
पक्षा संगे गाणारी
ती तानुली
फुल पाखरासवे पळणारी
ती तानुली
बसे होवूनी हिरमुसली
घरी दिवसभरी
समजून घे रे देवा
पाडू नको तिला पुन्हा पुन्हा
करी झटकन उपाय
तिच्या दुखापतीला
ऋणी होवू आम्ही
तुझ्या ह्या मेहरबानीला
पुन्हा आणिल ती घरी चैतन्याला
आनंदी होवू आम्ही फिरूनी
बघुनी तिच्या मधुर हास्याला

                 श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Permalink No Comments

« Previous entries · Next entries »