Category Archives: चिंतन

जर,तर,पण,परंतु.

 
“माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.”
आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला.
मी म्हणालो,
भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं.
ग्लास अर्ध भरलं आहे की ग्लास अर्ध रिकामं आहे?.आशावाद्याची बाजू घेतल्यास, “काहीही होणं [...]

मनुष्याची जागृकताच मनुष्याचं विधिलिखीत नियंत्रीत करतं.

आज तळ्यावर प्रो.देसायांबरोबर त्यांचे पूर्वीचे सहकारी प्रो.गंगाधर तेंडूलकर पण आले होते.ह्यांच नांव मी फार पूर्वी ऐकलं होतं.पण त्यांचा शिकवण्याचा विषय जरा मला जटिलच वाटायचा.पण आता एव्हड्या वर्षानी त्यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना सरळच प्रश्न केला,
“तेंडूलकरजी,ऍनथ्रुपोलॉजीस्ट म्हणजे काय हो? त्याला मानव-वैज्ञानीक असं म्हणतात एव्हडं मला माहित आहे.तुमची जर हरकत नसेल तर जरा विस्ताराने सांगाल काय?”
“सांगाल [...]

भिंगरी

आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला “फारमात” दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले,
“मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर “चर्वीचरण” करायला हूक्की आली आहे”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.? मला जरा फोकस होऊं दे”
मला म्हणाले,
“भिंगरी,भोंवरा”ज्याला इंग्रजीत “स्पायरल” म्हणतात.”
“म्हणजे,भाऊसाहेब [...]

दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.

 
“ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात”
आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले,
“ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे.”
तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला म्हणालो,
“वृंदा, मला एक तू [...]

विनम्रता

आज प्रो.देसाई ज्यावेळेला तळ्यावर आले त्यावेळी मी एक पुस्तक वाचण्यात गर्क झालो होतो.ते माझ्या जवळ येवून केव्हा उभे राहिले आहेत ते मला कळलंच नाही.
मला म्हणाले,
“कसल्या विषयात एव्हडे मग्न झाला आहात?”
मी त्यांना म्हणालो,
“भाऊसाहेब,मी एका प्रसिद्ध लेखकाचं विचार चिंतन वाचत आहे.हे पुस्तक हातातून सोडवत नाही.”
प्रो.देसाई मला म्हणाले,”काय विषय आहे असा?”
मी म्हणालो,
“विषय तसा साधा आहे.पण तुम्ही नक्कीच तुमचा [...]

“खेळ खेळूया सारे आपण”

 
आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं.
मला म्हणाले,
“संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही.”
मी म्हणालो,
“भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला मी तुम्हाला वाचून दाखवीन.”
भाऊसाहेब म्हणाले,
“आज [...]

प्रो.देसायांच्या नातवाचं तत्वज्ञान

“पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं.”
आज जरा गम्मतच झाली.आज प्रो.देसाई आपल्या नातवाबरोबर तळ्यावर फिरायला आले होते.रोजच्या ठिकाणी मी भाऊसाहेबांची वाट पहात बसलो होतो.
गम्मत झाली हे म्हणण्याचे कारण, आजोबा आणि नातू तावातावाने बोलत येत होते.दोघांचा कोणत्या विषयावर वाद चालला होता,ह्याचं [...]

सैनिक हो! तुमच्या साठी….

अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर आहे आणि हा मुलगा सायकॉलॉजीस्ट आहे.
गप्पा मारता मारता मुलगा म्हाणाला,
“आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति”
ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया.
मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली.
सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी [...]

प्रो.देसायांना वाटतं……..

आज मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.बरेच दिवस तळ्यावर त्यांची भेट झाली नाही तेव्हां म्हटलं बरं तर आहे ना त्याना!.
भाऊसाहेब वाचत बसले होते.मला पाहून त्याना बरं वाटलं असावं.
मी म्हणालो,
“भाऊसाहेब काय वाचता?विशेष काही तरी विषय असणार.”
भाऊसाहेब म्हणाले,
“खूप दिवस टी.व्ही वर ग्रीनहाऊस इफेक्ट, एनव्हायरनमेंट, ग्लोबलवारमींग असे मोठे मोठे शब्द कानावर येतात.म्ह्टलं काय आहे प्रकरण म्हणून जरा  इंटरनेटवर गेलो [...]

बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?

अमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो.
बाबारे,
कुणी तरी म्हटला हा,
“सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां.”
तुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे!),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा.
माणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक [...]