नोव्हेंबर 21, 2009 – 10:52 pm
“माझ्या दोन्ही भावंडांना लोकांना आकृष्ट करताना त्यात जोखिम संभव आहे हे माहित नसावं.माझ्या आकांक्षेप्रमाणे ते लोकांवर प्रेम करतात-सहजपणे उघडपणे आणि निडर होऊन.”
आमच्या बिल्डींगच्या मागे जी बिल्डींग होती त्याच्या दुसर्या मजल्यावर भांगले कुटूंब रहात होतं.श्री.भांगले दक्षिण मुंबईतल्या एका कॉलेजात प्रोफेसर होते.गणीत विषय शिकवायचे.
त्यांना तीन मुलं होती.मोठा उमेश लहानपणापासूनच वडलांसारखा फार हुशार होता. मात्र भांगल्यांचं एक दुःख [...]
नोव्हेंबर 18, 2009 – 9:13 pm
“माझ्या मुलीने कधीही न पाहिलेल्या तिच्या आजोबाबद्दल मी तिला सांगत असतो.त्यानी दिलेल्या सल्ल्याचे ती आणि मी वाटेकरी होतो.”
माझ्या अनुभवानुसार मला गोव्याचे लोक बरेचसे देवभोळे वाटतात.इकडे असलेल्या चर्चाच्या आणि मंदिरांच्या संख्येवरून त्याची कल्पना येते.
मग किरीस्तांव लोकांची निरनीराळी चर्च असोत,किंवा हिंदू लोकांची देवळं असोत. वर्षभरात बरेच उत्सव असतात.देवांच्या मंदिराबरोबर देवींची पण बरीच मंदिरं आहेत. किरीस्तांवांचा नाताळ हा [...]
नोव्हेंबर 4, 2009 – 10:48 सकाळी
“आणि खाली बघत बघत पुढे जाता जाता तुमच्या डोळ्याला एक चकचकीत गोल तांब्याचं नाणं दिसतं.ते तुमच्याकडे बघून जणूं हंसत असतं.ते वाकून उचलायला तुम्ही तुमच्यावर आंवर घालू शकत नाही.कारण तुम्हाला गत्यंतरच नसतं.”
आज बरेच दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर आले होते.त्यांना मध्यंतरी बरं नव्हतं. त्यांची गैरहजेरी मला जाणवायची.प्रि.वैद्य मधून मधून तळ्यावर भेटल्यावर त्यांची जागा ते भरून काढायचे.
मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“बरेच [...]
ऑक्टोबर 30, 2009 – 5:41 pm
मे महिन्याचे दिवस होते.उष्मा मी म्हणत होता.कोकणातून माझ्या मामाने मला देवगड हापूस आंब्याची एक पेटी पाठवली होती.त्या हापूस आंब्याचावास माझ्या घरभर दरावळला होता.आंबे पुर्णपणे पिकले आहेत हे वासाने ते आंबे आपल्याला समज देतात.अंमळ फ्रेश हवा घ्यावी म्हणून मीआमच्या बाल्कनीत आलो. समोरच्या बसस्टॉपवर मला राजेंद्र उभा असलेला दिसला.बहुदा तो बसची वाट पहात असावा.मला हाताने खूणावून येईन [...]
ऑक्टोबर 27, 2009 – 6:13 pm
“मला समजलं.तुझ्या डोक्यावरचे केस गेले तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल हातपाय धूवून ये आपण जेऊंया”.. इती भाग्यश्री.
चेरापुंजी नंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळा कभिन्न काळोख,काळे कुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला मजबूर करायचे.त्यातच [...]
ऑक्टोबर 23, 2009 – 6:01 pm
.”प्रेम—म्हणजे ज्यात माणसाचा दृढनिश्चय असतो,हानीत आणि मोठ्या नैराश्येतही हास्याचा अंतरभाव असतो” इती मकरंद
धाके कॉलनीतून लिंकरोडवर येऊन जुहूच्या दिशेने जात गेल्यास,अमिताभच्या बंगल्यावर उजव्या गल्लीत वळून पुढे जात गेल्यास हेमामालिनीचा बंगला लागतो, ती गल्ली संपता संपता आडवा रस्ता येतो तो जुहू चौपाटीला समांतर जातो.ह्या रस्त्यावर पेट्रोलपंपाच्या समोर आजगांवकरांचा बंगला आहे.
मी घरून रोज जुहूवर सकाळीच चालत जायचो.त्यादिवसात अगदी [...]
ऑक्टोबर 21, 2009 – 9:28 pm
अमेरिकन निवडणूकीत दोन्ही पार्टीचे उमेदवार प्रेसिडेन्टच्या अखेरच्या निवडणूकीसाठी निवडून आले की त्यांची नोव्हेंबरच्या अखेरच्या निवडणूकी पुर्वी तिन,चार डिबेट्स होतात.ही डिबेट्स न्युझमिडीयाचे लोक घडवून आणतात.प्रत्येक डिबेटला लाखो अमेरिकन फार महत्व देतात.सुरवातीला जरी टिव्हीवर तेव्हडी गर्दी नसली तरी शेवटच्या डिबेटला खच्चून गर्दी करून लोक प्रतिसाद देतात.
ओबामा आणि मेकेनच्या डिबेटमधे पहिल्या पासून ओबामाचीच सरशी होती. ओबामा बोलायला फाकडा [...]
ऑक्टोबर 19, 2009 – 6:30 pm
एक स्पष्टीकरण….
आम्ही हे लिहित आहो हे आमच्या विचारान्वये करीत आहो.ओबामा विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही.आम्ही रिप किंवा डेमोपार्टीचे नाही.इंडीपेन्डट आहो.उद्या डेमो पार्टीचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार. कुणाच्याही अंगातले चांगले गुण आम्हाला भावले तर सहाजीक आमचे मन आम्ही उघडे करतो.ह्यात कुणीही परसनल घेऊ नये.
कृपाकरून लेख वाचून आनंद घ्यावा.हिच वाचकाना विनंती आहे……
जॉन [...]
ऑक्टोबर 17, 2009 – 10:22 सकाळी
“माझ्या वाचकाना दिवाळीच्या शुभेच्छा”
सत्तरी ओलांडलेला बुड्डा जॉन मेकेन यापूर्वी दोनदा प्रेसिडेन्ट होण्यासाठी असफल प्रयत्न करून थकला होता.रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीच्या चढाओढीत मेकेन अगदी नगणतीत होता.पण निवडणुकीचे वारे कसे फिरतील हे सांगणं कठीण. व्हीएटनाम युद्धात ऍट्याक पायलटचं काम करीत असता युद्धकैदी म्हणून पाच एक वर्ष व्हीऍटनाममधे तुरंगात होता.कैद्याला टॉर्चर कसं करतात ते त्याने चांगलंच अनुभवलं होतं.त्याचे वडील [...]
ऑक्टोबर 15, 2009 – 5:21 pm
“आज ओबामाने व्हाईटहाऊसवर दिवे,पणत्या लावून दिवाळी साजरी केली.”
एका वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन सांगायचं तर,
“धर्म संस्थापना्र्थाय संभवा मी युगे युगे”
हे म्हणणं खरं करण्यासाठी ह्या “पंढरीच्या विठ्ठलाने ” -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय.
रि.प पक्षाच्या शंभर कौरवानी गेली आठ वर्ष अमेरिकेत आणि जगात धुमाकूळ घालून मनुष्यधर्म बुडवला.बुशरूपी दुर्योधनाने इराकच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करून लाखो [...]