Category Archives: विचार

“आपण सर्वानी उड्या मारीत असावं.”… इति वासंतीची पणजी.

“उड्यां मारण्यांचा प्रयत्न करा,आनंदात असताना उड्या मारा,उदास असताना उड्यामारा,आजारी, रागात,आशाजनक,उत्तेजीत,थकलेले,बेचैन,विफल,भुके,आणि थंडीने कुडकुडले असतानाही उड्या मारा.”
 
वासंतीला आजी पण आहे आणि पणजी पण आहे.
मी वासंतीला म्हणालो,
“तुझी पणजी आजीपेक्षा प्रकृतिने उत्तम आहे.तेव्हा सगळं काही वयावर असतं असं नाही.माणसाची लाईफ-स्टाईल पण बरेच वेळा महत्वाची असते.”
“अगदी बरोबर” वासंती म्हणाली.
“मी माझ्या आजीपेक्षा पणजीकडून जास्त शिकत आहे.आजीकडून शिकण्याचे आता आमचे दिवस संपले.कारण [...]

विज्ञानशास्त्र, आपलं मन आणि जीवन विकसित करतं.

 
आज प्रो.देसाई बरेचसे मुडमधे दिसले.तळ्यावर जाता जाता ते मला वाटेतच भेटले.तिथूनच आम्ही अशा विषयावर बोलायला सुरवात केली,की मला वाटलं भाऊसाहेब आपल्या कॉलेज मधल्या जुन्या आठवणी न काढता काही तरी नवीन माहिती देतील.पण झालं उलटंच.
मी त्याना म्हणालो,
“भाऊसाहेब,आजकाल मुलांना नुसतं वर्गात शिकवत नाहीत.त्यांना जे वर्गात शिकवतात,त्याचं प्रॅक्टीकल दाखवण्यासाठी बाहेरपण घेऊन जातात. आणि अलीकडे सायन्स म्युझीयम,प्लॅनेटेरीयम,मुलभूत संशोधन करणार्‍या [...]

प्रो.देसायांबरोबर Q & A

 
काल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला,
“भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत?”
ते म्हणाले,
“तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला आश्चर्य,मनातला संदेह आणि कसल्यातरी विषयाचं [...]

आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.

 
काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं  वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो.
संध्याकाळी त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ आल्यावर म्हणाला,
“भाऊसाहेब [...]

बालपण देगा देवा!

 
“जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो”,
असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं.
प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते.
ते पुढे म्हणाले,
“त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली.
एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास   असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत करण्याच्याइराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने [...]

चांगल्या बातम्याही वाईट बातम्या सारख्या प्रसारित होऊ शकतात.

 
पूर्वी एकदा मी कंपनीच्या कामाकरिता राजकोट मधे गेलो होतो.कामाच्या जरूरीमुळे मला काही दिवस तिकडे मुक्काम करायची जरूरी भासली होती.संध्याकाळी काम आटोपून झाल्यावर बाहेर कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंट मधे जेवायला जाताना चालत जायला मी जास्त पसंत करायचो.आणि रस्त्यावर एव्हडा ट्रॅफिक असायचा की छोटे छोटे मॉपेड चालवणारे नेहमी एकमेकाला आपटायचे,घासायचे,पडायचे.म्हणजे अगदी छोटासा अपघात व्हायचा.पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी [...]

द्दावं,द्दावं आणि द्दावं

 
“हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे”
माणसांची आयुष्ये खरोखरंच  गोष्टींचा “एनसायक्लोपीडाया” आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही.
प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा निराळाच असणार.
मंजूचे अनुभव ऐकून मला वाटलं ही पण [...]

यश आणि अपयश

 
” आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती. “
प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशीशाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं.
भेटल्यावर मला म्हणाले,
” थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू [...]

पन्नास टक्के थेअरी

 
“ही तुझी पन्नास टक्के थिअरी प्रत्येकाला उमेद ठेवून जीवन जगण्यासंबंधी एक प्रकारचा संदेशच देते नाही काय?”
त्यावर तो एव्हडंच म्हणाला,
“मला तरी त्याचा फायदा होतो.”
नरगुंदकरांचा मुलगा खूप वर्षानी मला भेटला.त्याचे आईवडील त्याच्याचकडे हल्ली राहायला गेले होते.म्हणून मी त्यांनाभेटायला गेलो होतो.घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर काही गप्पागोष्टी झाल्या.बोलता बोलता त्यांचा मुलगा म्हणाला,
“मला चांगलच लक्षात आलं की नंतर येणार्‍या सर्व [...]

विचाराच्या पलिकडले.

 
प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.माझीत्यांची पहिलीच ओळख झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही.
मी त्यांना सहजच म्हणालो,
“कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा”
थोडासाचा विचार करून ते म्हणाले,
“मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो.
एकोणीशे सत्तरच्या दर्म्यान मी कॉलेज मधे प्रवेश केला.देवाच्या [...]