आजाचे गुपीत

प्रथमच तानुली आज आजा,आजीला सोडून सियरा मौन्टनवर बर्फ़ावरची मौजमजा करायला गेली होती.आजा,आजी तिच्याबरोबर येणार नाहीत म्हणून ती खूप उदास झाली होती.”तुम्हाला थंडीचा त्रास होत असेल तर डबल डबल कपडे का नाही घालत म्हणून मागे लागली होती.प्रेमळपणा हा तानुचा उपजत गूण आहे.तानुच्या गैरहजेरीत रात्री ती स्वपनात आली.स्वपनात तिला पाहून आणि तिचा चौकसपणा पाहून तिच्या आईची बालपणाची  आठवण आली.त्यानंतर जे विचार मनात आले ते कवितेच्या रुपाने देत आहे.

आजाचे गुपीत

एक होती तानुली
तिचं वय होत सहा
आणि गम्मत पहा
तिचा एक होत आजा
त्याचे वय होते सहा वर सहा
तानुली आजावर खूप प्रेम करायची
आजा पण तानुली वर खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
तिचे अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि डोळे मिटून गप्प बसायचा
तानुली म्हणायची थ्यान्क्यू  आजा
आणि आजा म्हणायचा वेल्कम तानु
कधी कधी तानुली पण आजाला मदत करायची
आजा म्हणायचा थ्यान्क्यु तानु
आणि तानु म्हणायची वेल्कम आजा
आणि आजा डोळे मिटून गप्प बसायचा
एकदा तानुली म्हणाली
आजा तू डोळे का मिटतोस?गप्प का रहातोस?
आजा म्हणाला ते आहे एक गुपीत
मला गुपीत सांगशील का?
असं विचारलं तानुने
ओके तानु असं म्हटलं आजाने
ऐक
एक होती मुलगी
तिचं वय होत सहा
आणि तिचा एक होत डयाडी
त्याचे वय होत तिनावर सहा
ती डयाडीवर खूप प्रेम करायची
तिच्यावर डयाडी खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि उघडया डोळ्याने
तिच्या कडे बघत बसायचा
मग ती खूप खूप हसायची
आणि डयाडी तिला जवळ घ्यायचा
हे ऐकून तानुली हसली
अन
आजाला त्या मुली सारखी दिसली
आजाने तानुलीला जवळ घेतलं
आणि तानुलीला गुपीत कळलं
गुपीत फ़ोडताना आजाला झाली घाई
कारण ती मुलगी होती तानुलीची आई.

                           श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

One Comment

  1. Madhavi
    Posted जानेवारी 30, 2007 at 8:31 pm | Permalink

    Mhanje mee.. I don’t remember reading this poem.. It is very nice and emotional.. good job aja.. mp


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: