वंय निघून गेले

वंय निघून गेले.
परवां प्रो.देसाईंचा चौरयाहत्तरावा जन्म दिवस.वंय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणारया चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या  आठवणीतल्या यादीत फरक असणे स्वाभावीक आहे.
भाऊसाहेब मला म्हणाले “माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतरा.गद्या पेक्शा पद्यात  ऐकाला मला बरे वाटेल” असे म्हणून त्यानी मला आपल्या आठवणी सांगीतल्या.त्या मी खलील कवितेत लिहील्या.त्यांना वाचून दाखवल्यवर बरं वाटलं.

ते दिवस निघून गेले

मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.

भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्शमा याचनाचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले

सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले

घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले

राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले

काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले

या यादीतील स्म्रुतीना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचे
नसे कसला खंत
श्रीक्रुष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: