कढी,सार,ताक असात तां

कढी,सार,ताक असात तां (असेल ते)
आईला नेहमी काळजी वाटायची की तिसरया भातावर काय वाढायचे?ताक ,कढी की सार?त्याचे असे झाले की रोज जेवताना भाजी,लिंबाची फोड,  थोडं मीठ,भात,वरण आणि त्यावर तूप असायचं. त्यानंतर दुसरया भातावर आमटी आणि तीसरया भातावर कधी ताक तर कधी ताकाची कढी तर कधी सार (सोलाची कढी)असायची
“आई ताक वाढ”असे दाजीने म्हटल्यावर “आज मी ताकाची कढी केली आहे,तुला आज ताकच हवं असणार”असे आई वैतागून म्हणायची.परत दुसरया दिवशी असाच वाद असायचा आणि ह्या वेळेलाही मागलेल्या मेनू ऐवजी आईने दुसराच मेनू केलेला असायचा.आणि असे हे रोजच चालायचे

दह्यात पाणी घालून चिनी मातीच्या बरणीत आई रवीने ताक घुसळत असताना “आई तूं कसला विचार करतेस?”असे मी विचारल्यावर म्हणायची “अरे, मी आज ताक केल्यावर तुझा दाजी आज सोलाची कढी जेवतान मागणार बघ” 

आईचा जीव तो आपण आवडीने केलेले पदार्थ मुलानी आवडीने खाल्यावर कोणत्या आईला आनंद होणार नाही?आणि मग तसेच व्हायचे दाजी नक्की नसेल तेच मागायचा आणि आई त्याला हवे ते केले नाही म्हणून कष्ठी हौऊन सांगायची.मी तिच्या कडे बघीतल्यावर मिस्कील हंसायची आणी त्याला हवे ते देता येत नाही म्हणून दु:खी हौऊन डोळ्यात आलेली दोन टिपे पदराने पुसायची.मी मनांत म्हणायचो “बिचारी आई”
आणि मग पुढे तोच प्रकार चालायचा.

आनंद असो वा दु:ख असो,आईचे डोळे सदैव पणावळलेले असतातच.प्रेमाच्या पाण्याने ओथंबलेले तीचे ह्रुदय दु:ख किवा आनन्दाच्या हाताने पिरगळल्यावर ते प्रेमाचे पाणी डोळ्या वाटे वाहू लगले नाही तर नवलच म्हणावे लागेल.
आईच्या अशा प्रेमळ वागण्यावर मी  एक कविता पण लिहीली आहे ती तुम्ही कुठेतरी वाचालच.

अण्णा आमचे वाद जास्त न वाढता कसा मिटवावा यात मोठे वाकबगार.त्यानी उपाय सुचवीला.उद्या पासून आपण सर्वानी तीसरया भाताच्या वेळी असे म्हणायचे “आई,कढी,सार,ताक असात तां.”त्यापासून आई असेल तेच वाढायची आणि दाजी असेल तेच जेवायचा
नंतर आम्ही गमंतीत म्हणत असूं.

“कढी,सार, ताक असात तां” 

                                     श्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)    

Advertisements

One Comment

  1. Madhavi
    Posted फेब्रुवारी 5, 2007 at 6:01 pm | Permalink

    I have heard this from you couple of times. It is nicely written.
    This reminds me of Mana who would ask for chappati when I made rice. The above story is so true in my case!! – mp


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: