माझी सुंदर आई

एकदां प्रो.देसाई मला तळ्यावर भेटले.मला म्हणाले “सामंत,खूप दिवसानी बघा मला अलिकडे माझ्या आईची आठवण येते.ह्या वयांत असं होतं.माझे आजोबा मला मी लहान असताना असंच म्हणायचे.आता मला ते पटलं.
देवाचे अस्तीत्व आपण प्रथम आपल्या आई कडून शिकतो.मला आठवते माझी आई सांगायची की “देव खूपच सुंदर दिसतो”खरं तर कुणी पाहिले आहे हो त्याला?”

त्या निरपराध बाळाला आई असं सांगत असताना वाटत असणार की “आई मी काही देवाला पाहिले नाही पण खरं सांगू तुच मला त्याच्या पेक्षां सुंदर दिसतेस” ह्या भाऊसाहेबांच्या बोलण्यावर मला एक हिंदी सिनेमातले गाणे सुचले आणि भाऊसाहेब मला कविता लिहीण्याला सांगण्यापुर्वीच त्या गाण्याचा अनुवाद करायची कल्पना सुचली.

मॉं (ऊली)

पाहीले नसेल मी त्या “देवाला”जरी
त्याला पहाण्याची मला
असे काय जरूरी?
अगे,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

मानव कुठले?देव देवताही
फुलती तुझ्याच पदरी
दुनियेत ह्या स्वर्ग असे
पायतळी तुझ्याच तो वसे

ममतेने भरती नयन जिचे
देवमुर्ती पहाण्याची काय जरुरी?
अगे,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

कधी दु:खाचे ऊन असे
कधी नैराशाचे मेघ बरसे
हे कमल हस्त तुझ्या दुवांचे
सर्सावती मम माथ्यावरती
अगे,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

तूं असतां असे अंधार जरी
तरी सूर्य नारायणाची काय जरुरी
अगे,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

तुझ्या स्तुतीसुमनांनाच्या शब्दापुढे
कुठल्याही शब्द थोर नसे
देवा जवळी सर्व माया
तुझ्या ममतेला मोल नसे
अगे,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

असता जवळी दुनियेतली दौलत जरी
तुझ्या पुढे आम्हां त्याची काय जरुरी
अगे,आई
कमलमुखी तूं सुंदर असतां
रुप “देवाचे “कसे वेगळे?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

5 Comments

 1. mangal dhanu
  Posted ऑक्टोबर 23, 2009 at 4:56 सकाळी | Permalink

  agadi hridayala shivanari kavita ahe ho.
  aaaiiii agadi ashich asate.tiche prem kuthalya hetu purvak nasate.
  mazi aaiii agadi tashich ahe. pan sangu ka maze baba hi tasech ahet. jashi apali aai asate.
  sagale jan fakta aai var kavita lihitat ekhadi kavita babanvar keli tar khup abhar hotil. aai che prem he tichya dolya tun disun yete. te ti vyakta karate. pan babache kay? te suddha titkech prem karatat na???????????

  • Posted ऑक्टोबर 23, 2009 at 11:20 सकाळी | Permalink

   नमस्कार मंगल,
   आपल्याला माझी आईवरची कविता आवडली हे वाचून खूप बरं वाटलं.
   आपल्या आईबाबाबद्दलच्या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे.
   बाबासुद्धा आईसारखेच चांगले असतात.”आईवडील” असा एकच शब्द आई आणि बाबांना संबोधण्यासाठी लिहिला जातो.आईचं हृदय आईसारखं असतं आणि बाबांचं हृदय बाबांसारखं असतं.पण जेव्हा बाबांचं हृदय आईसारखं होतं ना, त्यावेळी बाबा आईसारखे भासतात. त्यांचेही डोळे पाणवतात.जसे आपले बाबा आहेत.ते आपल्याला आईसारखेच प्रेमळ वाटतात.

   आईचं हृदय निसर्गानेच मुळात अळकुळं केलं आहे.तिचं हृदय पटकन पिरगळलं जातं.आणि मग ते हृदय तिच्या डोळ्यातून अश्रूंना वाट देतं.तिच्या जीभेतून शब्द येण्याऐवजी तिचे डोळे बोलके होतात. म्हणून आपण म्हणता,
   “ती ते व्यक्त करते”

   “पण मग बाबांचं काय? ते सुद्धा तितकंच प्रेम करतात ना?”

   हो! बाबासुद्धा तितकंच प्रेम करतात.त्यांच हृदय तितकंच पिरगळलं जातं,पण ते डोळ्यातून येणार्‍या अश्रूंना बांध घालू शकतात.कदाचीत असं पण निसर्गानेच केलं असावं.
   आणि ह्या दोन्ही प्रकारात डोळे हेच सूचक असतात.
   मी आपल्या सुचने प्रमाणे बाबांवर पण एखादी कविता लिहिण्याचा ज्र्रूर प्रयत्न करीन.
   मध्यंतरी,
   माझी जून 14, 2008 ची “फादर्स डे” कविता अवश्य वाचा.

 2. nitin
  Posted मे 12, 2010 at 5:27 सकाळी | Permalink

  Best mother Poetry

 3. Shankar Rawool
  Posted फेब्रुवारी 18, 2012 at 3:32 सकाळी | Permalink

  Sir,
  nice poem…

  jai maharashtra,

  regards, shankar Rawool


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: