शून्याची महती

नेहमी प्रमाणे मी आणि तानुली तिच्या स्कूलबसची वाट बघत ड्राईव्ह्वेवर येरझारया घालीत होतो.सहजच मी तानुला म्हणालो ” तानुली,”दोन” “एका”पेक्षा मोठा,” तीन ” “दोना ” पेक्षा मोठा असे करत करत “नवू”सगळ्यांपेक्षा मोठा मग “शून्याचे” काय?
तानुला “शून्याचे”खूप वाईट वाटले.ते मला तिच्या चेहरयावरून दिसले.ती म्हणालीच “पुअर झीरो” मी म्हणालो “तानु,”झीरोच” खरा “हिरो” आहे.संध्याकाळी तूं शाळेतून आल्यावर “झीरोवर”एक कविता करतो.ती वाच्ल्यावर तुला कळेल “शून्याची”महती.

शून्याची महती

एकदां “दोन” म्हणे “एकाला”
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे “तीनाला”
माहीत नाही का “एक” आणि “दोनाला”
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठला

दोन शिंगी “चार” होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकल कारे “एक” “दोन” आणि “तिना”
“पांच” “सहा” “सात” “आठ”आणि मीना
कबूल झालो आहे “नऊना”
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे

“शून्य” बिचारा कोपरयात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वत:शीच म्हणाला
ठाऊक नाही त्यांना माझी किंमत
घेऊन मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
व्रुद्धी होईल त्याची कळत नकळत

सूर्य,चन्द्र,तारयांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधीकार

नको स्वत:ची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असोतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून
त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढऊन
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला

“एकाने” केली तक्रार “शून्याकडे”
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
“शून्य”म्हणाला त्याला
करशील तूं व्रुद्धी बेरीज करताना
नंतर
“शून्य”पुसतो “एकाला”
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना

तात्पर्य काय?
म्हणे “शून्य”ईतर आकड्याना
“कमी लेखू नका कुणा
वेळ आली असताना
“शून्यसम”आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना
                       श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
 

Advertisements

3 Comments

 1. सुहास रमाकांत मराठे
  Posted ऑक्टोबर 10, 2013 at 11:26 सकाळी | Permalink

  मांडकुली गावात बारा वाडी आहेत. लिंगेश्वर मंदीर.पावणाई देवी मंदिर आहे.मराठ्यांचि कुलदेवता पाटेकर.मांडकुली गाव सुंदर आहे.

  • Posted ऑक्टोबर 10, 2013 at 6:46 pm | Permalink

   थॅन्क्स सुहास,
   मला मांडकूली गाव खूप आवडतो.माझी मावशी तीथे रहायची.माझ्या लहानपणीच्या आठवणी
   उजळून येतात.
   प्रतीक्रियेबद्दल आभार


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: