कविता, कविता म्हणजे तरी काय

कविता


कविता म्हणजे काय? असा प्रश्न खूप लोक विचारतात.कधी कधी काही लोक आपल्या कडून सुचना वजा उपदेश पण करतात.पण जो कविता लिहीतो त्याला ते ऐकून खूप मजा वाटते असेल कारण “असाच”विषय घेऊन तूं कविता लिही असे कोणी सांगितल्यास ते शक्य होणार नाही.आणि जे तसे लिहू शकतात त्यांचे खरोखरच कौतुक केले पाहिजे.

कविता करणे आणि “सुग्रास”जेवण करणे ह्या दोन गोष्टीची मी सांगड घातली तर अतिशयोक्ती होणार नाही.जेवणा साठी सामुग्री लागते.सामुग्री सर्वांकडे असू शकते पण म्हणून “गाजराचा हलवा”कर म्हणून कोणी सांगितल्यास सुग्रास चटकदार हलवा करायचा झाल्यास प्रथम तो करणाराल्या त्याची (करण्याची) आवड पाहिजे नसल्यास तो त्याचे “घोळ”करून ठेवील.

तसेच शब्दांची सामुग्री असली म्हणून कुठचेही शब्द वापरून  कविता लिहीता येणार नाही असे मला वाटते.लिहीणारयाला त्यावेळी आवड निर्माण झाली पाहिजे.खाण्याची डिश पुस्तक वाचून करता येते,पण उत्तम डिश बनवावयाची झाल्यास करणारयाला त्यामधे स्वत:ची “क्रियेटिविटी” दाखवावी लागते.त्याशिवाय ती डिश सुग्रास होणार नाही.कवितेचा विषय घेऊन सुधा “क्रियेटिविटी”नसेल तर कविता पण तितकी आवडली जाणार नाही.

थोडक्यांत आपल्या जवळ असलेल्या शब्दभांडारातून योग्य ते शब्द घेऊन विषयाला धरून त्यांची नीट जुळणी करता आली तर सुंदर कविता लिहीता येऊ शकेल.ह्या कलाकृतित थोडा निसर्गाचा हात असावा असे पण मला वाटते.कारण स्व अनुभवातून मी सांगेन की कधी कधी डोक्यात विषय आला की शब्द आपोआप जुळून येतात आणि त्या दोन ओळी कागदार वर लिहील्या शिवाय चैन पडत नाही.कधी कधी ती शब्दाची जुळणी डोकयात कायम बसते आणि कागदावर लिहून काढता येते.

कुणाला आनन्द देणारी कविता आवडते तर कुणाला निसर्गावरच लिहीलेली कविता आवडते.पण खरं सामजायचे झाल्यास मला वाटते दु:खी मनातून कवितेची निर्मीती जास्त होते त्यामुळे ह्र्दयाला हलवणारया कविता जास्त वाचणारे लोक असतात.तसेच विनोदी कविता लिहीणारे कवी पण असातात पण बरेच वेळेला तुम्ही पहाल की त्या कविता वाचेपर्यंन्तच आवडतात नंतर विसरून जायला होतं. त्या उलट अखादी चटका देणारी कविता वाचल्या नंतर त्या कवितेचे शब्द आपल्या मनात घोळत असतात.जशी एखादी चटकदार डिश खाल्यावर त्याची चव तोंडात टिकून रहाते तशीच काही.

सर्व आनंद देणारया गोष्टी यातनेतून निर्माण होतात उदाहरणार्थ “जन्म”.बाळाची निर्मीती होत असताना आईला किती यातना होत असतात पण एकदा बाळ जन्माला आले की मग तिला किती आनंद होतो.घनदाट काळोखा नंतर प्रकाशाची थोडीशी पण तिरीप किती सुखदायक वाटते.आगितून पोळून काढलेले सोने किती चमकदार आणि पिवळे धमक दिसते.अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

डोक्यात,निर्मीती होत असताना जशी होते तशी होवूं द्यावी. निर्मीती हा निसर्गाचा नियम आहे.त्याला कोणी काय ही करू शकणार नाही.

म्हणून म्हणतो मनातल्या भावना प्रदर्शीत करायल कविते सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही.कविता ह्रुदयातील कळा प्रदर्शीत करते.मग त्या आनंदाच्या असो दु:खाच्या असो वा विनोदाच्या असो.त्या तशाच येणार.त्यावर कुणाचा कंट्रोल नाही.
कविता एक दोन वेळा नीट वाचली की त्यामधला मतीतार्थ कळतो

                            श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

4 Comments

 1. आल्हाद alias Alhad
  Posted जून 7, 2009 at 2:22 सकाळी | Permalink

  नमस्कार,
  पॉटलक आणि ही पोस्ट आवडली. आपण जर बरहा वापरून मराठी लिहीत असाल तर दोन सूचना करतो.
  कलाकृती kalaakRutI व सॅन होझे s~en hojhe असं लिहीता येऊ शकेल.
  धन्यवाद

  आल्हाद

 2. Posted जून 7, 2009 at 10:37 सकाळी | Permalink

  आल्हादजी,
  आपल्याला पॉटलक आणि ही पोस्ट आवडल्याचे वाचून बरं वाटलं.
  हो मी बरहाच वापरून मराठीत लिहितो.
  आपण बरोबर म्हणता kalaakRutI असं बरहा मधे लिहिल्यास त्याचं मराठीत कलाकृती असं लिहिलं जातं.फक्त कृतीतली ती र्‍हस्व असल्याने शब्द “कलाकृति” kalaakRuti असा बदल करीत आहे. मराठीत पोस्ट लिहिण्याची त्यावेळी माझी सुरवात होती म्हणून “कलाक्रुती” असं चुकीने लिहिलं गेलं.आपल्या सुचनेबद्दल आभार.
  दुसरी आपली सुचना सॅन होझे बद्दल आहे.हा शब्द इंग्रजी मधे San Jose असा लिहिला जातो आणि पहिला शब्द syan असा उच्चारला जात असल्याने-अगदी “सियान” असा- syan म्हणजेच “स्यान” असा मी लिहित होतो.लिहायला सोपं जातं एव्हडच. आपण म्हणता तसं लिहिल्यास s~en hojhe म्हणजे “सॅन” होझे हे पण जास्त समर्पक होईल.
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि सुचनेबद्दल आभार
  सामंत

 3. Posted जुलै 21, 2009 at 6:43 सकाळी | Permalink

  mala aaple vichar far aawadale . te me nehame lakshat thevin.

  • Posted जुलै 21, 2009 at 11:11 सकाळी | Permalink

   नमस्कार अतिश,
   माझे विचार आपल्याला आवडले हे वाचून मला आनंद झाला.आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: