जिवन खरोखरच सुंदर आहे.

देवाशी सुसंवाद माय बोलीतून (अनुवादीत)

“जिवन खरोख्ररच सुंदर आहे”

कृष्ण आणि अर्जुना मधे झालेला संवाद

पार्था, तू काही म्हणालास का?

होय गोविंदा, मला तुला हे विचारायचे आहे की मी कामात व्यग्र असतो
 तश्या किड्मुंग्या पण कामात व्यग्र असतात,मग दोघांच्या कामात फरक
 तरी काय? ह्या कामामुळे माझी पुरे आयुष्य गुंतून रहाते.

अर्जुना, काम तुला व्यग्र ठेवते,ते काम कर्मफलातून निर्णयास येते.
काम समयाला ग्रहण करते.
पण कर्मफलातून समय मोकळा होतो,असे नाही क तुला वाटत.?

हे मुकुंदा, मला कळते पण वळत नाही.पण आयुष्य गुंतागुंतीचे का असते?

पार्था, आयुष्याचे विश्लेषण करू नकोस ते तसेच असू दे.
विश्लेषणाने आयुष्य जास्त गुंतागुंतीचे होत असते.

हे देवकीनंदना, मनुष्य दुःखी का बरं असतो?

अर्जुना, नीट लक्ष देऊन ऐक.तुझा आजचा “आज” हा कालचा “उद्या” होता.आणि
त्याची तू चिंता करीत होतास.तू चिंता करतोस कारण तू विश्लेषण करतोस.
चिंता करणे ही तुझी संवयच झाली आहे.

हे श्रीरंगा,सभोवती इतकी अनिश्चीतता आहे,मग मी चिंता करू नकोस असे तू कसे
म्हणतोस?

पार्था,अनिश्चीतता अपरिहार्य आहे.पण चिंता करणे मर्जीवर असते.

हे मिलींदा,अनिश्चीततेमुळे होणारे दुःख कमी का असते?

पांडवपुत्रा,अनिश्चीतता अपरिहार्य आहे हे मी तुला मगाशीच म्हणालो हे तुला आठवत
असेल.पण हाल करून घेणे हे आपल्या म्रर्जीवर आहे.

हे नंदलाला,हाल करून घेणे हे जर मर्जीवर आहे तर सज्जनांचे एव्हडे हाल का बरे होतात?

पार्था,हिरा घर्षणाने चमकतो,आणि सोने अग्निपरीक्षेनेच शूद्ध होते,तद्वत सज्जन परिक्षा देत
देत असतो त्या अनुभवातून त्याचे आयुष्य सुखकर होत,दुःखकर नाही.

हे दयाघना,ह्याचा अर्थे हे अनुभव आवश्यक असतात.असे तुला म्हणायचे नां?

होय अर्जुना,सर्वार्थाने अनुभव आवश्यक असतात.अनुभव हा एक कडक गुरू आहे.तो प्रथम
परिक्षा घेतो आणि मग धडे देतो.

हे घनःशामा,ह्या दिव्यातून जायलाच हवं का?आयुष्य अडचण विरहीत नसतं का?

अरे घनुर्घ्ररा,अडचणी ह्या आयुष्याच्या मार्गात मुद्दाम घातलेले अडथळे आहेत,आणि
मानसिक शक्तीची व्रुद्धी होण्यासाठी दिलेले हे धडे आहेत.आंतरीक मनोव्रुद्धी ही संघर्षातून आणि
सहनशीलेतून निर्माण होते.अडचण विरहीत राहून होत नाही.

हे गोपीनाथा,खरं सांगायचं झालं तर अडचणीच्या भोंवऱ्यात मी कुठे भरकटत चाललो आहे
हे कळतच नाही.
हे शामसुंदरा, तुच मार्ग दाखव.

अरे द्रौपतीवरा, माझे ऐक,बाह्यद्रुष्टीने तुला मार्ग दिसणार नाही.आंतद्रुष्टीने ते बघ.बाह्यद्रुष्टीने
तू फक्त स्वपनाळू रहाणार,आंतरद्रुष्टीने तुला जाग्रुती येणार.डोळे द्रुष्य प्रदर्शीत करतात.
ह्रदय आंतर द्रुष्टी दाखवते.

हे मनमोहना,योग्य दिशेने जाऊन आणि खूप प्रयत्न करून सुद्धा यश लवकर प्राप्त होत नाही.
ह्याचं दुःख होतं अशा वेळी मी काय करू?

पार्था,यशाचा मापदंड दुसरे ठरवतात.समाघानीचा मापदंड तुझा तू ठरवतोस.पुढचा मार्ग
किती आहे हे समजण्यातील समाधान,किती मार्ग चालून आलो हे समजण्यात मिळत नाही.
तू होकायंत्रा बरोबर काम कर.इतराना घड्याळावरोबर राहू दे.

हे मुरलीघरा,कठिण प्रसंगी उत्साहीत कसे रहावे?

अर्जुना,किती मार्ग काटलास या ऐवजी किती मार्ग काटायचा आहे याचा विचार कर.
काय गमवीलेस या ऐवजी काय कमवीलेस याचा विचार कर.

हे शामसुंदरा, माझी तुला किंव केव्हा येते?

पार्था, तू दुःखी झाल्यावर. “हे दुःख मलाच का?” असे तू मला विचारतोस,आणि सुख
मिळाल्याव्रर  “मलाच का?” असं मला विचारायला विसरतोस तेव्हा
नेहमी सत्याला तुझी बाजू घ्यायला सांगतोस,तू मात्र सत्याच्या बाजुला येत नाहीस तेव्हा
ह्या तुझ्या मागण्याचा मला नेहमी अचंबा वाटतो.किंव पण येते.

हे ब्रिजलाला,कधी कधी मी मलाच विचारतो मी कोण?मी इथे का आहे?
मला याचे उत्तर मिळत नाही.

अरे सुभद्रावरा,तू कोण आहेस हे कळण्या ऐवजी,तुला काय व्हायचे ठरवलेस याचा
विचार कर.तुझा ऊपयोग काय हे पहाण्याऐवजी तू ऊपयोगी कसा होशील याचा विचार कर.
जिवन ही संशोधनाची क्रिया नव्हे तर ती निर्मीतीची क्रिया आहे.

हे राधेशामा,अत्युतम जिवन मी कसे जगू?

पार्था,भुतकाळाला पश्चातापवीणा सामोरा जा.वर्तमानकाळ विश्वास पुर्वक हाताळ.आणि न
 घाबरता भविष्यकाळासाठी तयार हो.

हे प्रभू, हा मी तुला अखेरचा प्रश्न करतो.तु माझ्या प्रार्थनेला कघी कधी प्रतीसाद देत नाहीस
असं का बरं?

अर्जुना,प्रार्थनेला सदैव साथ मिळतेच असं नाही.माझ्यावर श्रद्घा ठेव.भिती मनातून काढून
टाक,तुझ्या तर्कावर विश्वास ठेऊ नकोस.तुझ्या विश्वासावर संशय ठेऊ नकोस.जिवन हे एक
चमत्कार आहे,आणि तो समजून घेतला पाहिजे.जिवन ही काही समस्या नसून ती उकलण्या
ची जरूरी नाही.विश्वास ठेव माझ्यावर.जिवन कस मजेत जगायचं ही कला तुला जर आली
तर तुच म्हणणार “जिवन खरोखरच सुंदर आहे”

              श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

2 Comments

  1. Posted जून 3, 2011 at 10:07 pm | Permalink

    Mother Is my
    life Ithink mother is very Important in our family
    my dear mummy
    Happy mothers day


टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: