तड्जोड

प्रो.देसायांना कळून चुकले होते की आयुष्यात शांती मिळवीण्यासाठी कुठेतरी तडजोड करावी लागते.
कर्तव्य आणि भावना या मधला फरक वेळोवेळी समजून घ्यावा लागतो.आपले आणि परके या मधला
फरक वेळेवर लक्षात आला नाही तर मनःस्ताप होवू शकतो.स्वतःच्या मनाची
समजूत करून घेताना देसायाना काय वाटले ते खालील कवितेत सांगितले आहे.
कवितेचे शिर्षक आहे

तडजोड

रे मना समज लवकरी
बघसी अंतरी
करी तड्जोड सत्वरी
मनःस्तापाशी,मानहानीशी,अन्यायाशी

रे मना नको करू तू डोळे ओले
अन विसर तू झाले गेले
जाऊनी भावनेच्या आहारी
मानीलेस तू ज्याना आपुले
झिडकारीले त्यानी त्वरेने
समजुनी तुला कुचकामी

तेच खरे तुझे आपुले
आधार दिला ज्यानी
करी तडजोड सत्वरी
प्रेमाशी,त्यागाशी,आग्रहाशी.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: