“तूमको भेजा नही”या वरून वाद

“तुमको भेजा नही” वरून वाद

असंच एकदा मी आमच्या धाके कॉलनीच्या बिल्डींग मधून आमच्या फ्लॅट्च्या बाल्कनीतून
पाहिलं की खाली खूप गर्दी जमली होती आणि एका पोस्ट्मन बरोबर एक अनोळखी माणूस
हुज्जत घालत होता.मुंबईला अशा प्रसंगी गर्दी जमायला वेळ लागत नाही.
सहज कुतुहल म्हणून मी पण खाली उतरून काय चाललं आहे म्हणून आणखीन
एक बघ्याची भर असे समजून ऐकायला गेलो.
“भेजा” या शब्दावर वाद चालाला होता.पोस्टमन ही व्यकती नेहमी प्रमाणे लोकल मराठी,
ज्याला भुमी पुत्र म्हणातात तशी होती.बहूतेक कोकणातून आलेला पक्या वेन्गुर्लेकार किंवा
सोन्या धारणकर सारखी असावी.दुसरी तवातावाने हातवारे करणारी आगांतूक उत्तरप्रदेशची
सुशिक्षीत भय्या म्हणण्या सारखी व्यक्ती होती.
बघ्यातला एखादा नक्कीच “क्या हूवा ?”हे चर्चा चालु ठेवण्याचं परवलीचं वाक्य उद्गारून चर्चा सुरू ठेवतो तसे झाल्यामूळे संभाषण ऐकण्याच्या कुतुहलाने मी मान पुढे करून कान थिखट करत ऐकू लागलो.
“तुमकू क्या करनेका है?”
हा वाद न वाढवण्यासाठी रागाने उच्चारलेलं नेहमीच्या प्रश्नाला दोघातल्या एका वाद घालणाऱ्याने,
डोळे मोट्ठे करून आणि रागाने नाक फेंदारून उत्तर दिलं,
अशावेळी प्रतीवादी नेहमीच हिरीरीने पुढे येऊन सांगतोच ते माहित असल्याने
सगळे, मी धरून, क्षणभर शांत होतो.लगचेच तो पोस्टमन जाणून बुजून हिन्दीतून म्हणाला
“ह्याने विचारलं, हमारा खत आया क्या?तो मैने बोला “तुमकू भेजा नही,
तो उसकू घुस्सा आनेका क्या कारण है? ”
हे ऐकून तो आगांतूक लगेचच म्हाणाला
“ये खूद्कु क्या समजता है मै क्या पागल हू जैसे मेरेकू भेजा नही है?
इसकू भेजा है तो पोस्ट्मनका काम क्यूं करता है?”
त्यावर “साब इसमे मेरा क्या गलती है बोलो.उसकू भेजा नही तो मै क्या करू?
खत काहासें लाऊ? बोलो?”.असे अगदी साळसूद होवून पोस्ट्मन सांगत होता.
“फिर ऐसा बोलो ना, तुम्हारा खत नही है करके,हमको भेजा नही ऐसा गलत क्युं बोलता है?”
आता ह्या बघ्या मधे जरा हिरोगिरी करणारा पुढे सरसाऊन त्यांचा वाद त्याला आताच जणू काय
कळला सारखे करून दोघा मधे स्पष्टीकरण्याच्या उद्देशाने पुढे सरसाऊन म्हणाला
’ऐसा है क्या ?”
त्याची ट्युबलाईट जर उशिराच पेटलेली दिसली.त्या दोघाना बाजुला करत तो म्हणाला
“खाली पीली तुम दोनो झगडा करके राई का पर्बत करता है.”
“राई का पर्बत ?हा वाक्प्रचार न समजून
“ये राई का पर्बत क्या हो ता है? ऐसे हमने क्या किया ?”
असा त्या आगांतूक भय्याने लगेचच प्रश्न केला.

एव्हड्यात तो पोस्ट्मन हळूच त्या गर्दीतून सटकला.पुढच्या एका दुकानदाराचे पत्र त्याला देत म्हणाला
“साले कुठून खोगीर भरती करून मुंबईला येतात.भेजा या शबदाचे दोन अर्थ आहेत ते आम्हाला
कुठे ठाऊक आहेत.भेजा म्हणजे “पाठवणे “आणि दुसरा अर्थ “मेंदु” हे कसं कळणार? ”
आगांतूकाची इतरानी समजूत घातली आणि गर्दी विखरून गेली.
वर आल्यावर मला
“काय समजलं तुम्हाला?”
ह्या तिच्या प्रश्नाला मी फक्त म्हणालो ” फोव ना कातळी फक्त सुको काजर”
हे ऐकून तिने माझ्यावर जो कटाक्ष टाकला त्याने माझ्या चटकन लक्षात
आलं की आता ह्या शब्दावरून घरात भांडण होणार.
(“गैर समजामुळे भांडण” हा कोकणीतून त्या वाक्याचा अर्थ हे तिला कुठे माहित आहे?)

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: