Monthly Archives: जून 2007

छळकुटा देव

छळकुटा देव तानुलीला खेळता खेळता पडून  हाताला दुखापत झाली.त्याच हातावर ती परत पडली. शेवटी तिचा हात प्लास्टर मधे ठेवावा लागला.हे तिला सर्व नवीनच होतं. तिन आठवडे हात प्लास्टरमधे असणार हे तानुलीला खरंच वाटत नव्हतं. एका जाग्यावर निमुट न बसाणारी तानु,सतत बागेत फुलांबरोबर स्वगत करणारी  तानु,हिरमुसली होवून बसलेली पाहून खालील कविता सुचली. छळकुता देव किती छळसी […]

नातीच्या ग्र्याड्यूएशन पार्टीला आजोबांचे भाषण

अंकिताचे ग्र्याड्युएशन  अठरावर्षापुर्वी हे छकुलबाळ आजोबा आजीच्या हाताच्या घडीवर झोपायचं. ते बाळ आता एक सुंदर युवती,एक सॉकर खेळाच्या टिम मधली अप्रतीम  खेळाडू,भावी डॉक्टर,आणि अतिशय मधूर वाणिने सम्पर्क ठेवणारी अशी ही  प्रियंका  लवकरच युसीअर्वाईन मधल्या अतिउत्तम वातावरणात आपली पुढली चार वर्ष सत्कारणी व्यतीथ करणार आहे. मी अंकिताला प्रियंका म्हणालो का? एव्हडा मी वयस्कर झालो आहे का? खरं सांगू […]

नातवाच्या ग्र्याड्यूएशन पार्टीला आजोबांचे भाषण

 आजी,आजोबांची दोन नातवंडे,लवकरच कॉलेजमधे जायच्या तयारीत आहेत. नातू लवकरच यूनिव्हरसीटी ऑफ कॅलिफोरनीया स्यानट्याकृझ म्हणजेच “यूसीएससी” मधे जाणार. त्याच्या ग्र्याड्यूएशन पार्टीला अर्थातच बरेचजण भाषण करणार.त्या प्रसंगी आजोबांचे भाषण झाले त्याचा हा उतारा.  नमस्कार मंडळी ,   कवितेच्या, दोन ओळीने मी सुरवात करतो. ओळी अशा आहेत, “जेथे आजीआजोबा वसती तेथे नातवन्डे, आनंदे बागडती” आजीआजोबा, आणि नातवंडं,ही जेव्हा […]

खऱ्या यशाची व्याख्या.

खऱ्या यशाची व्याख्या   यशस्वी होणे म्हणजे स्वतःचे उद्देश साध्य करणे. हंसत राहणे खूप प्रेम करणे विद्वानाकडून आदर प्राप्त करणे लहानांकडून प्रेम संपादन करणे प्रामाणिक माणसाकडून शाबासकी घेणे. खोट्या मैत्रीतून झालेला गैरविश्वास सहन करणे सौंदऱ्याची स्तुती करणे. इतरा मधले चांगले तेव्हडेच पहाणे. “मीपणा” सोडून देणे उत्साही राहून हंसणे,गाणे , खिदळणे आणि शेवटी आपल्यामुळे जगातला एक प्राणी […]

बालपण देगा देवा

बालपण देगा देवा “जेव्हा वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची “याद”मी तुम्हाला सांगतो”, असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं. प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते. ते पुढे म्हणाले, त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली. एका मोठ्या हॉलमधे, वयाने  पंचाहत्तरीच्या आसपास   असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून    आमचे […]

भावंडांची गुप्त भाषा

भावंडांची गुप्त भाषा अण्णा,आबा,दादा,आते आणि आप्पा ह्या चार भावंडांची एक गुप्त भाषा होती. लहान असतानाच त्या सर्वानी तयार केली होती.जशी एक “चकारी” भाषा आहे आणि बहुतेक सर्वांना ती माहित असावी.उदा.”तुला माहीत आहे का?”  हे वरील “चकारी”भाषेत म्हटलं जाणार “चलातू चहीतमा चहेत का?” अशाच प्रकारची थोडी वेगळी भाषा होती.आणि हे सर्व त्यानी त्यांच्या आईला आणि वडिल, […]

कॉर्नींगचे भांडे

प्रो.देसाई मला म्हणाले “सामंत, आज मला तुमच्या बरोबर एका विषयावर चर्च्या करायची आहे” मी म्हणालो “भाऊसाहेब, त्यानंतर मग तुम्ही मला नक्कीच एखादी कविता लिहायला सांगणार खरं ना?”  ते फक्त हंसले.”बरं सांगा काय तुम्हाला सांगायचे आहे ते”मी म्हणालो. “सामंत,काय झालं आता वयोमानामुळे पुर्वी सारखी आपल्याला कामं होत नाहीत. तरी पण शरिराची हालचाल ही झालीच पाहिजे. नाही […]

सहज सूचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून वाचता वाचता वाचनात आलं तेव्हां “असं शिकून वागता आलं तर”? निसर्गाकडून खूप काही शिकता येतं. दुसऱ्याला काही देताना गर्वाने अथवा घमेंड करून देऊ नये.उलट आदराने व प्रेमाने द्यावं. सूर्य सर्वांना प्रकाश आणि जीवन देतो.असं देताना कोलाहाल आणी गर्मी देतो. चंद्र थंड प्रकाश देताना प्रेम आणि सद्भावनेची आठवण करून देतो. हा फरक का […]

फादरस डे

 कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले “मूड” संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे. फादरस डे वाटेत एका अनोळख्याला जवळ जवळ आपटलो “माफ करा”असे […]

वृध्द्त्व एक शाप केव्हा ठरते.

वृध्दत्व शाप केव्हा ठरते.(अनुवादीत) वाचता वाचता वाचनात आले म्हणून वृध्द व्य्कतींचे सर्व साधारण दोन भाग पाडले जातात. जे वृध्द ६० ते ७० वयोगटात असतात,त्याना तरुण वृध्द म्हणतात, तर जे सत्तर पेक्षा अधीक वयाचे असतात त्याना जास्त वृध्द असे म्हणतात. ही वृध्द मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात.त्यांचे जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असते. त्यांना आपले वृध्दत्व वरदान किंवा […]