“आई असं मी पून्हा करणार नाही”

आई मी असं पुन्हा करणार नाही.देसायांचा नातू तसा उनाड होता.तसा तो वयाने लहान होता.त्यांच्या घरावर एका खोबणीत एका पक्षाने घरटं बांधलं होतं.गम्मत म्हणून नातवाने एक्दा खेळता खेळता तो हातातला चेंडू त्या घरट्यावर फेकला,आणि नंतर झाले ते रामायण.“लहान आहे तो,ह्या वयात हातून घडलेल्या गोष्टी कळत नाहीत बाल मनाला.आपले ते खरं करतात ही मूलं.” वैतागून पण नातवाची बाजू घेत बोलत होते भाऊसाहेब.

“सामंत, त्याच्या बाल मनाला चटका लागेल असं वाचून दाखवण्या सारखं काही तरी लिहाल का? कधीतरी मी त्याला वाचून दाखवीन”मला प्रो.देसाई विनंती करून सांगत होते.

हे ऐकून मी त्यांच्यासाठी अशी एक गोष्ट लिहीली.

गोष्टीचं शिर्षक होतं,

“आई असं मी पुन्हा करणार नाही”

एक होता चिमुकला बाळ.त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करायची.त्याला रोज झोपताना काऊ चिऊची गोष्ट सांगायची.त्या गोष्टी त्या मुलाला खूप आवडायच्या.एकदा आईने त्याला एका पक्षीणीची आणि तिच्या चिमुकल्या पिल्लाची गोष्ट सांगीतली.ती सांगत होती “एकदा एका पक्षीणीने घराच्या कौलावर एक घरटं बांधलं होतं.आपल्याला बाळ झाल्यावर कुणी त्याला त्रास देऊ नये म्हणून तिने खूप काळजी घेतली होती .सकाळ झाल्यावर ती घरट्या मधून बाहेर जायची,ह्या झाडावरून त्या झाडवर ऊडून बसायची.आकाशात खूप उंच उंच उडायची.संध्याकाळ झाली की परत आपल्या घरट्यांत परत यायची.आपल्या अंड्याला उब मिळावी म्हणून त्यावर रात्रभर बसायची.एक दिवस आपल्याला पिल्लू होणार,रोज आपल्याला ते सकाळी चिव,चिव करून उठवणार.त्याच्यासाठी कोवळे कोवळे दाणे आणण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागणार. अशा आणखी खूप खूप गोष्टी मनात आणून ती आनंदी व्हायची.

आई गोष्ट सांगता सांगता बाळाचे डोळे पेंगू लागलेले पाहून, आई त्याला लवकर झोप यावी म्हणून त्याच्या कानाजवळ गाणे गुणगुणू लागली

पक्षिण फिरते आकाशी

परि लक्ष तीचे

अपुल्या बाळाशी

कोवळे कोवळे दाणे टिपूनी

परत येतसे ती घरट्याशी

दाणे गिळूनी चटदिशी

बाळ झोपी जाई पटदिशी

पक्षिण फिरते आकाशी

परि लक्ष तिचे

अपुल्या बाळाशी

झोपी गेलेल्या आपल्या बाळाला पाहून आई आपले गाणे संपवते.झोपेत त्या बाळाला एक छान स्वप्न पडतं.आई साठी चिव,चिव करणाऱ्या त्या पक्षीणीच्या पिल्लाचा आवाज ऐकून त्याची झोप मोड होते.चिडून तो पक्षीणीच्या घरट्यावर चेंडू फेकतो.पक्षीण घाबरून उडून जाते.घरट्यातलं अंड खाली पडून फूटतं.बाळ घाबरं गुबरं होवून ,माझी आई अशीच उडून गेल्यावर मला गोष्ट कोण सांगणार?,गाणं कोण म्हणणार?,मला झोप कशी येणार?,मग मला स्वप्न कसं पडणार?आणि झोपेतून बाळ जागा होतो,आणि मोठ्याने ओरडतो

“आई मी पुन्हा असं नाही करणार”

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

shrikrishnas@gmail.com

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: